Virat Kohli & Anushka Sharma Son Akaay Kohli : विराट कोहली (Virat Kohli) आणि अनुष्का शर्माच्या (Anushka Sharma)  घरी नव्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. विराट आणि अनुष्काने सोशल मीडियाद्वारे  ही आनंदाची बातमी शेअर केली आहे.  त्यानंतर विराट आणि अुष्कारवर शुभेच्छांचा वर्षाव झाला आहे. 15 फेब्रुवारीला विराट आणि अनुष्काच्या घरी लाडक्या पाहुण्याचे आगमन झाले. भारतात हिंदू समाजात बाळाचा जन्म झाल्यावर ज्योतिषाकडून बाळाची जन्मपत्रिका बनवून घेतली जाते. अनेकांना पत्रिकेत काय माहिती असते, याविषयी उत्सुकता असते. विराट आणि अनुष्काच्या बाळाचा ज्या दिवशी जन्म झाला त्या दिवशी ग्रहांची स्थिती कशी होती? तो दिवस कसा होता? या विषयी जाणून घेऊया.  


ज्योतिष शास्त्रामध्ये ग्रह, नक्षत्र आणि जन्मकुंडली यांना खूप महत्व मानले जाते. हिंदू धर्मात जेव्हा बाळाचा  जन्म होतो तेव्हा त्याची वेळ आणि ग्रह नक्षत्राची स्थिती अत्यंत महत्त्वाची मानली जाते.ज्योतिषांनी दिलेल्या माहितीनुसार 15  फेब्रुवारी हा दिवस अतिशय शुभ होता आणि याच दिवशी अनुष्का शर्माने मुलाला जन्म दिला. 15 तारखेला शुक्ल पक्षातील सप्तमी तिथी होती.विरुष्काच्या बाळाने जन्म घेतला त्या दिवशी  गुरुवार होता आणि या दिवशी नक्षत्राचा स्वामी शुक्र होता. तसेच या दिवशी गजकेसरी योग होता. ज्योतिषशास्त्रनुसार जेव्हा मेष राशीत गुरु आणि चंद्राची युती होते त्यावेळी गजकेसरी योग होतो. हा योग अतिशय शुभ मानला जतो. ज्या मुलांचा जन्म गजकेसरी योगात होतो ती मुले अतिशय बुद्धीमान असतात. तसेच ते आपले करिअरमध्ये देखील मोठी प्रगती करतात. 


विराट कोहलीपेक्षा जास्त मिळणार प्रसिद्धी (Virat Kohli Son Akaay Kohli Kundli)


15 फेब्रुवारी, शुक्ल पक्षाच्या सातव्या दिवशी, गुरुवारी, नक्षत्राचा स्वामी शुक्र आहे आणि राशीचा स्वामी मंगळ आहे . अनुष्का शर्माचा मुलगा खूप हुशार असेल. आपल्या बुद्धिमत्तेने आणि विवेकाने विरोधकांचा पराभव करेल. आई-वडिलांसह देशाचे उज्जवल करेल. तसेच आई वडिलांचे नाव काढेल. तसेच अकाय विराट कोहलीपेक्षा जास्त प्रसिद्ध होईल आणि देशाचे नाव मोठे करेल. 


'अकाय'चा अर्थ काय? (Akaay Meaning)


विरुष्काने 'अकाय' हे नाव खूप विचार करुन ठेवलं आहे. हिंदी शब्दकोशानुसार, 'अकाय' म्हणजे 'निराकार'. कोणताही आकार, रूप नसलेल्याला निराकार म्हणटलं जातं. 'अकाय'चा एक अर्थ चंद्राचा प्रकाश असाही होतो. एकंदरीतच विरुष्काचं आयुष्य प्रकाशमय करणारा 'अकाय' आहे. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


हे ही वाचा :


Virat Kohli Anushka Sharma : 'अकाय'च्या जन्माच्या पाच दिवसांनी विरुष्काने दिली गुडन्यूज; बाळाची तब्येत कशी?