Pitru Paksha 2026: गणेशोत्सव संपताच पितृपक्षाला सुरूवात! योग्य तिथीनुसार 'हे' महत्त्वाचे श्राद्ध कमी लोकांना माहित, संपूर्ण यादी जाणून घ्या...
Pitru Paksha 2026: यंदा पितृपक्ष कधी सुरू होत आहे? श्राद्धासाठी महत्त्वाच्या तारखा कोणत्या आहेत? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया, तारखांची संपूर्ण यादी जाणून घेऊया..

Pitru Paksha 2026: सध्या गणेशोत्सव सुरू आहे, यंदा अनंत चतुर्दशी होताच पितृपक्षाला सुरूवात होणार आहे. पितृपक्ष असा काळ आहे, जेव्हा आपण आपल्या पूर्वजांचे आदर आणि कृतज्ञतेच्या भावनेने स्मरण करतो. या दिवसांमध्ये, पूर्वजांच्या नक्षत्रानुसार श्राद्ध केले जाते. या प्रथेमागील धार्मिक श्रद्धा अशी आहे की यामुळे पूर्वजांना शांती मिळते. पितृपक्षात, पूर्वजांचे श्राद्ध दुपारी केले जाते. या वर्षी पितृपक्ष कधी सुरू होणार आहे? त्याच्या महत्त्वाच्या तारखा कोणत्या आहेत. जाणून घ्या...
पितृपक्ष 2026 कधी सुरू होईल? (Pitru Paksha 2026)
वैदिक पंचांगानुसार, या वर्षी पितृपक्ष शनिवार, 26 सप्टेंबर 2026 रोजी पौर्णिमेच्या दिवशी श्राद्धाने सुरू होईल. यानंतर, पुढील तारखांनुसार पूर्वजांचे श्राद्ध केले जाईल. पिज्या पूर्वजांच्या श्राद्धाची तारीख ज्ञात नाही, त्यांचे सर्वपित्री अमावस्येला श्राद्ध करण्याची प्रथा आहे. पितृपक्षाच्या तिथीनुसार श्राद्ध जाणून घेऊया.
पितृपक्षाच्या तिथी आणि श्राद्ध
- पौर्णिमा तिथी श्राद्ध - 26 सप्टेंबर 2026, शनिवार
- प्रतिपदा तिथी श्राद्ध - 27 सप्टेंबर 2026, रविवार
- द्वितीया तिथी श्राद्ध - 28 सप्टेंबर 2026, सोमवार
- तृतीया तिथी श्राद्ध - 29 सप्टेंबर 2026, मंगळवार
- चतुर्थी आणि पंचमी तिथी श्राद्ध - 30 सप्टेंबर 2026, बुधवार
- षष्ठी तिथी श्राद्ध - 1 ऑक्टोबर 2026, गुरुवार
- सप्तमी तिथी श्राद्ध - 2 ऑक्टोबर 2026, शुक्रवार
- अष्टमी तिथी श्राद्ध - 3 ऑक्टोबर 2026, शनिवार
- नवमी तिथी श्राद्ध - 4 ऑक्टोबर 2026, रविवार
- दशमी तिथी श्राद्ध - 5 ऑक्टोबर 2026, सोमवार
- एकादशी तिथी श्राद्ध - 6 ऑक्टोबर 2026, मंगळवार
- द्वादशी तिथी श्राद्ध - 7 ऑक्टोबर 2026, बुधवार
- मघा नक्षत्र श्राद्ध - 7 ऑक्टोबर 2026, बुधवार
- त्रयोदशी तिथी श्राद्ध - 8 ऑक्टोबर 2026, गुरुवार
- चतुर्दशी तिथी श्राद्ध - 9 ऑक्टोबर 2026, शुक्रवार
- सर्वपित्री अमावस्या - 10 ऑक्टोबर 2026, शनिवार
हेही वाचा :
आज गौराई येणार! ज्येष्ठागौरी आवाहनाचा 'हा' शुभ मुहूर्त चुकवू नका! गौराईचा आवडता नैवैद्य कोणता? गौरी विसर्जन कधी आहे? धार्मिक महत्त्व...
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)



















