Pitru Paksha 2024 : आजपासून पितृ पक्षाला सुरुवात झाली आहे. हिंदू धर्मात पितृ पक्षाला (Pitru Paksha) खूप महत्त्व आहे. अशी मान्यता आहे की, या दिवसांत आपल्या प्रियजनांना भेटण्यासाठी पूर्वज यमलोकातून पृथ्वीतलावर येतात. त्यामुळे त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पितृपक्षात तर्पण आणि श्राद्ध केले जाते. हिंदू धर्मानुसार असे मानले जाते की, जर पितरांसाठी श्राद्ध केले तर पितर आपल्या वंशजांना आशीर्वाद देतात, ज्यामुळे घरात सुख-समृद्धी नांदते.


मात्र, श्राद्धाची तिथी कशा प्रकारे करावी? तसेच, कोणत्या दिवशी कोणाचं श्राद्ध करावं? या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. 


कोणी करावं श्राद्ध कर्म?


पितृ पक्षात आपल्या पितरांच्या संतुष्टीसाठी श्राद्ध करणं गरजेचं आहे. अन्यथा जे लोक आपल्या पितरांच्या संपत्तीचा वापर करतात पण त्यांचं श्राद्ध करत नाहीत त्यांना पितृ दोष लागतो. आणि जीवनात अनेक संकटांचा सामना करावा लागतो. 


आता प्रश्न असा पडतो की श्राद्ध नेमकं कोणी करावं? तर, ज्या घरातील व्यक्ती मृत झालेली आहे. त्या घरातील सर्वात मोठ्या पुत्राने श्राद्ध कर्म करावे. श्राद्ध कर्म करताना पूर्व 3 पिढ्यांचे करावे. यामध्ये वडील, भाऊ, आजोबा, आजी, भाऊ, काका, मामा, बहीण, गुरु, शिष्य इ. यांचा देखील समावेश होतो. 


श्राद्धाची तिथी कशी ठरवावी?



  • ज्या दिवशी आपल्या प्रियजनांचा मृत्यू झाला त्या तिथीपासून श्राद्धाची तिथी करावी. म्हणजेच ज्या दिवशी व्यक्तीने शेवटचा श्वास घेतला आणि त्यावेळेला पंचांगानुसार जी तिथी असेल पितृ पक्षात त्याच तिथीला श्राद्ध करावे. जर ती तिथी लक्षात नसेल तर पितृ अमावस्येच्या दिवशी श्राद्ध करावे. 

  • ज्या लोकांचा मृत्यू नैसर्गिक झाला असेल आणि त्या दिवशी चतुर्दशी तिथी असेल तर त्याचं श्राद्ध पितृपक्षाच्या त्रयोदशी तिथी किंवा अमावस्येच्या दिवशी करावे. ज्यांचा मृत्यू नैसर्गिक झाला आहे त्यांनी चतुर्दशीच्या दिवशी श्राद्ध करु नये. 

  • एखादी दुर्घटना, साप चावला असल्यास, आत्महत्या किंवा हत्या किंवा अकाली मृत्यू झाला असल्यास त्या व्यक्तीचं श्राद्ध चतुर्दशी तिथीलाच करावे.अशा व्यक्तीचं श्राद्ध त्यांच्या मृत्यूच्या तिथीला कधीच करु नये. 

  • सुवासिनी महिलांचं श्राद्ध पितृ पक्षाच्या नवमी तिथीला करावं. 

  • ब्रह्मचारी किंवा संज्ञासी लोकांचं श्राद्ध पितृपक्षाच्या द्वादशी तिथीला करावं. 

  • आजी-आजोबांचं श्राद्ध अश्विन शुक्ल प्रतिपदेला करावं.  


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा: 


Chandra Grahan 2024 : आज लागलं वर्षातलं शेवटचं चंद्र ग्रहण; दुष्परिणामांपासून वाचण्यासाठी ग्रहणानंतर करा 'हे' उपाय