Pitru Paksha 2022 : पितृ पक्ष चालू आहे. पितृ पक्षात काही उपाय केल्याने सुख-समृद्धी प्राप्त होते असे मानले जाते.  पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी या दिवशी पितरांसाठी तर्पण आणि श्राद्ध केल्याने पितर प्रसन्न होतात आणि त्यांचा आशीर्वाद मिळतो, असा समज आहे. पण पितृपक्षात केलेल्या काही खास उपायांमुळे पितरांची विशेष कृपा मिळू शकते. धार्मिक ग्रंथांमध्ये पितृ पक्षातील दानाचे महत्त्व सांगितले आहे. पितृ पक्षात पितरांच्या नावाने दान केल्यास पितर प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देतात


1. जर तुम्ही आर्थिक समस्यांनी त्रस्त असाल तर सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी पितरांना खीर अर्पण करा. त्यांना दूध आणि तांदळाची खीर आणि पुरी अर्पण करा. चांदीच्या भांड्यात जेवण दिल्यास ते अधिक शुभ होईल.


2. पूर्वजांना खीर-पुरी अर्पण केल्यानंतर, 21 मुली आणि सात मुलांना खीर-पुरी खायला द्या. असे केल्याने पितृ प्रसन्न होतात. यासोबतच घरात पैसा आणि धान्य येते. यामुळे कुटुंबातील सदस्यांच्या उत्पन्नाचे स्रोतही वाढतात.



3. जर कोणाचे लग्न होत नसेल, नातं पुन्हा-पुन्हा तुटत असेल, तर या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी पितृ पक्षात नारळाचे उपाय करून पाहा. नारळाचे तीन गोळे मुंग्यांच्या बिलाजवळ जमिनीत गाडा, यामुळे समस्या दूर होईल.



4. तुमचे एखादे काम पूर्ण होत नसेल किंवा कोणतीही इच्छा पूर्ण होत नसेल तर तुम्ही पितृ पक्षात त्यावर उपाय करू शकता. या अंतर्गत तुम्हाला सव्वा पाव कच्चे दूध घेऊन कडुनिंब, पीपळ आणि वडाच्या त्रिवेणीमध्ये अर्पण करायचे आहे. दूध अर्पण केल्यानंतर झाडाला सात वेळा प्रदक्षिणा घालायची आहे. या दरम्यान तुम्ही ''ओम नमो भगवते वासुदेवाय'' मंत्राचा जप करावा.


5. जर तुमच्या घरात कोणी खूप आजारी असेल तर पितृ पक्षातील चतुर्दशीच्या दिवशी रुग्णाच्या डोक्यावर लाल रंगाची पोटली ठेवावी. 100 ग्रॅम गव्हाच्या दाण्यांसोबत एक रुपयाचे नाणे आणि एक खिळा पिशवीत ठेवा. आता दुसर्‍या दिवशी सकाळी पोटली घेऊन पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी खिळा मारावा. येताना कोणाला काही बोलू नका. असे केल्याने लवकरच आरोग्यास लाभ होईल.



6. मनोकामना पूर्ण होण्यासाठी पितृपक्षात दररोज दुपारी पिंपळाच्या झाडावर पाणी, फुले, अक्षता, दूध, गंगाजल, काळे तीळ अर्पण करा आणि स्वर्गीय नातेवाईकांचे स्मरण करा. असे केल्याने पितर प्रसन्न होतात.


7. जर एखाद्याच्या कुंडलीत पितृदोष असेल तर पितृ पक्षाच्या सोमवारी सकाळी स्नान करून अनवाणी पायांनी शिव मंदिरात जावे लागले. आता शिवलिंगावर कच्चे दूध आणि बेलपान, 21 फुले अर्पण करा. यामुळे दोष दूर होईल.


8. जर तुमचे काम बिघडत असेल आणि लाख प्रयत्न करूनही यश मिळत नसेल तर पिंपळ आणि वडाची झाडे लावा. तसेच भगवान विष्णूच्या मंत्राचा जप करावा. असे केल्याने कामातील अडथळे दूर होतील.


9. पितृ अमावस्येला बाभळीच्या झाडाखाली पितरांसाठी अन्न ठेवल्याने पितर प्रसन्न होतात. हे वाईट नजरेपासून देखील संरक्षण करते.


10. नोकरी-व्यवसायात यश मिळवण्यासाठी सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी कच्चे दूध, दोन लवंगा, थोडे बताशे आणि काळे तीळ अर्पण करा. असे केल्याने तुमच्या सर्व समस्या दूर होतील.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.) 


महत्वाच्या बातम्या