Pitru Paksha 2022 : हिंदू पंचागानुसार, यावर्षी 10 सप्टेंबर 2022 पासून पितृपक्ष सुरू होत आहे. 25 सप्टेंबर 2022 रोजी पितृ पक्षाची समाप्ती सर्वपित्री अमावस्येला होईल. या दरम्यान पितरांसाठी तर्पण, श्राद्ध, पिंड दान केले जाते. पितृ पक्षात पितरांना जल अर्पण करणे विशेष मानले जाते, यामध्ये कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात, जाणून घेऊया-



पितरांना पाणी देताना काय म्हणावे?
पाणी देताना ध्यान करावे आणि म्हणावे वसूच्या रूपाने माझे पिता पाणी घेऊन तृप्त व्हावे. त्यानंतर पाणी द्यावे. तसेच तुमच्या गोत्राच्या नावासोबत गोत्र अस्मात्पितामह (पित्याचे नाव) वसुरूपत् त्रिप्यतामिदं तिलोदकं गंगा जलम् व तस्मै स्वधा नमः, तस्मै स्वधा नमः, तस्मै स्वधा नमः असे म्हणा. या मंत्राने पितरांना तीनदा जल अर्पण करा.


पितृपक्षात पितरांना पाणी कसे द्यावे?
श्राद्ध करताना पितरांना अंगठ्याद्वारे जलांजली अर्पण केली जाते. पितरांना अंगठ्याने जल अर्पण केल्याने त्यांच्या आत्म्याला शांती मिळते असे मानले जाते. पौराणिक ग्रंथानुसार तळहाताच्या ज्या भागावर अंगठा असतो, त्या भागाला पितृतीर्थ म्हणतात.


पितरांना पाणी कोणत्या वेळी द्यावे?
पितरांना जल अर्पण करण्याची वेळ सकाळी 11.30 ते 12.30 पर्यंत आहे. पितरांना जल अर्पण करताना पितळेचे भांडे किंवा तांब्याचे भांडे वापरावे.



पितरांना पाणी कोण देऊ शकेल?
वडिलांव्यतिरिक्त, आई आणि त्या सर्व वडिलांचा देखील पितृ ऋणामध्ये समावेश केला जातो, ज्यांनी आम्हाला आमचे जीवन जगण्यास आणि विकसित करण्यास मदत केली. पितृ पक्षात मन, कृती आणि वाणी यांचा संयम ठेवावा.



पितरांना तर्पण कसे अर्पण करावे?
तर्पण साहित्य घेऊन दक्षिणेकडे तोंड करून बसावे. यानंतर हातात जल, कुश, अक्षत, फुले व काळे तीळ घेऊन हात जोडून पितरांचे ध्यान करून त्यांना आमंत्रण द्यावे आणि जल ग्रहण करण्याची प्रार्थना करावी. यानंतर 5-7 किंवा 11 वेळा पाणी पृथ्वीवर टाकावे.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.) 


महत्वाच्या बातम्या