Pisces July Horoscope 2024 : मीन राशीसाठी नवीन महिना वरदानाप्रमाणे; कुटुंबात नांदणार सुख-शांति, वाचा मासिक राशीभविष्य
Pisces July Horoscope 2024, Monthly Horoscope : मीन राशीच्या लोकांसाठी जुलै महिना नेमका कसा असणार? तुमची आर्थिक स्थिती, कौटुंबिक स्थिती कशी असणार? जाणून घ्या
Pisces July Horoscope 2024, Monthly Horoscope : मीन राशीच्या लोकांसाठी जुलै महिना लाभदायक ठरू शकतो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणं भविष्यात चांगलं सिद्ध होऊ शकतं. या महिन्यात कायमस्वरूपी मालमत्ता मिळण्याचीही शक्यता निर्माण होत आहे. पार्टी, पिकनिकचा आनंदही घ्याल. या महिन्यात नक्षत्रं पैशाच्या दृष्टीने अनुकूल आहेत, परंतु तरीही सावधगिरी बाळगणं अत्यंत आवश्यक आहे. व्यापारी वर्गासाठी हा महिना अनुकूल आहे. या दिवसात वैवाहिक जीवनात काही अडचणी येऊ शकतात, ज्यामुळे नातं आणखी बिघडू शकतं. मीन राशीच्या (Pisces Horoscope) लोकांसाठी जुलै महिना नेमका कसा असणार? या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊया.
कसा असेल पहिला आठवडा? (Pisces July Month Horoscope)
महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये महत्त्वपूर्ण यश मिळेल. डोळ्यांशी संबंधित समस्यांनी त्रस्त व्हाल. व्यावसायिक संबंध सुधारतील. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पूर्ण पाठिंबा आणि उत्कट प्रेम मिळेल. पालकांच्या आरोग्याबाबत अस्वस्थता राहील. गोड शब्द मदत करतील. कामाच्या ओझ्यातून किरकोळ आराम मिळेल. कुटुंबात भांडणं टाळा. मित्र ढालीसारखा उभा राहील. तुम्हाला सहकाऱ्याकडून पाठिंबा आणि तणाव दोन्ही मिळेल. अनेक महत्त्वाची कामं कमी मेहनत करता पूर्ण होतील.
कसा असेल दुसरा आठवडा? (Pisces July Month Horoscope)
दुसऱ्या आठवड्यात कुटुंबात आनंद राहील. निष्काळजीपणामुळे समस्या उद्भवू शकतात. ग्राहक स्नेह आणि क्षमा याद्वारे विजय प्राप्त होईल.प्रतिस्पर्ध्यांकडून तुम्हाला मानसिक त्रास होईल. खर्च वाढतील. अचानक झालेल्या नुकसानीमुळे रात्री झोप लागणार नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी वाद घालू नका. इतरांना मदत करा, पण कर्ज देऊ नका.
कसा असेल तिसरा आठवडा? (Pisces July Month Horoscope)
तिसऱ्या आठवड्यात तुमचा अध्यात्मिक विचारांकडे झुकाव असेल. लव्ह लाईफसाठी हा काळ चांगला नाही. कौटुंबिक वाद टाळा, अन्यथा तणाव वाढू शकतो. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून सहकार्य मिळेल. बुद्धीचा योग्य वापर होईल. गुडघेदुखी, पाठदुखी वाढेल. पालकांशी संबंध अधिक घट्ट होतील. वरिष्ठ सहकारी आणि गुरूचा सल्ला तुम्हाला मदतीचा ठरेल. मित्रासोबत झालेल्या वादामुळे तुम्हाला वाईट वाटेल. जास्त विचार करणं हानिकारक असू शकतं, म्हणून ते टाळा. अचानक प्रवास होण्याचीही शक्यता आहे.
कसा असेल चौथा आठवडा? (Pisces July Month Horoscope)
चौथ्या आठवड्यात आर्थिक जोखीम घेऊ नका, अन्यथा नुकसान होण्याची शक्यता आहे. आनंदात वाढ होईल. करिअरमधून चांगली बातमी मिळेल. व्यवसायात यश मिळेल. कोणताही करार किंवा व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. जुने बिघडलेले नाते सुधारेल. आरोग्याच्या दृष्टीने वेळ फारसा चांगला नाही. प्रेमसंबंधांसाठी काळ चांगला आहे. कौटुंबिक वाद टाळा, अन्यथा तणाव वाढू शकतो. राग वाढण्याची शक्यता आहे. बोलण्यावर नियंत्रण ठेवावं लागेल. गोड बोलणं लाभदायक ठरेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :