एक्स्प्लोर

Pisces Horoscope Today 24 October 2023: मीन राशीच्या लोकांनी आज सावध राहावं, राग नियंत्रणात ठेवावा, अन्यथा...; आजचं राशीभविष्य

Pisces Horoscope Today 24 October 2023: मीन राशीच्या लोकांनी आज राग नियंत्रणात ठेवावा, आज तुम्हाला अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

Pisces Horoscope Today 24 October 2023: मीन राशीच्या (Pisces Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस (Horoscope Today) चांगला जाईल. परंतु आजच्या दिवशी तुम्हाला सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. मीन राशीच्या लोकांनी आजच्या दिवशी सावध राहावं. एखादी व्यक्ती आज तुम्हाला त्रास देऊ शकते, एखाद्या गोष्टीसाठी तुम्हाला पिडू शकते, ती घरातलीही असू शकते किंवा कोणी बाहेरची. त्यामुळे आजच्या दिवशी राग थोडा नियंत्रणात ठेवा. आज तुम्हाला तुमचा संयम वाढवावा लागेल. सामाजिक जीवनात आज तुम्ही दिखावेगिरी करू शकता. आजच्या दिवशी तुम्ही जास्त पैसे खर्च करू शकता. आज तुम्हाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

मीन राशीचं आजचं व्यावसायिक जीवन

व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल सांगायचं झालं तर, जर आज तुमच्या व्यवसायात प्रगती होईल आणि तुम्हाला आर्थिक लाभही मिळेल. तुमचा व्यवसाय चांगला होईल. आज तुमच्या व्यवसायात कोणतेही बदल करण्याचा प्रयत्न करू नका. तुमचा व्यवसाय आहे तसा चालू द्या, कशाचीही जास्त काळजी करू नका.

मीन राशीचं आजचं कौटुंबिक जीवन

आज तुमच्या घरी पाहुणे येण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुम्हाला खूप खर्च करावा लागू शकतो आणि तुमचं घर व्यस्त असू शकतं. आज तुमच्या वागण्यात संयम ठेवा, तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा आणि समोरच्या व्यक्तीशी बोलताना कोणतेही चुकीचे शब्द वापरू नका, अन्यथा समोरच्या व्यक्तीला तुमच्या बोलण्याचं वाईट वाटू शकतं. 

आज तुमच्या कुटुंबात एखादी मोठी समस्या येऊ शकते, ज्यामुळे तुमचं मन खूप उदास आणि अस्वस्थ राहील. आज तुम्हाला तुमच्या मित्रांकडून पूर्ण सहकार्य मिळेल, ज्यामुळे तुमचं मन समाधानी राहील आणि आज तुम्ही तुमच्या कुटुंबियांसोबत कुठेतरी बाहेर जाण्याचा बेत आखू शकता.

मीन राशीचं आजचं आरोग्य

तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर आज तुम्हाला तुमच्या आरोग्याबद्दल थोडं जागरूक राहावं लागेल. तुम्हाला आज तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल, अन्यथा काही समस्या निर्माण होऊ शकतात. आज तुम्हाला डोळ्याशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. तुमचं एखादं जुनं ऑपरेशन झालं असेल तर तीच आरोग्याशी संबंधित समस्या पुन्हा जाणवू शकते.

मीन राशीसाठी आजचे उपाय

आजचा दिवस चांगला जावा यासाठी तुम्ही हनुमानाची पूजा करा, यामुळे तुमचं मनही प्रसन्न राहील.

मीन राशीसाठी आजचा शुभ रंग आणि अंक

मीन राशीसाठी आजचा शुभ रंग लाल आहे. हा रंग तुमच्यासाठी अधिक शुभ राहील. आज तुमचा लकी नंबर 2 असेल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 29 July 2026 : आज बुधवारचा दिवस 5 राशींसाठी आव्हानात्मक; संध्याकाळच्या वेळी 'ही' चूक टाळा, वाचा आजचे राशीभविष्य
आज बुधवारचा दिवस 5 राशींसाठी आव्हानात्मक; संध्याकाळच्या वेळी 'ही' चूक टाळा, वाचा आजचे राशीभविष्य
Guru Purnima 2026: आजची गुरूपौर्णिमा दुर्मिळ! अनेक शुभ योगांचा महासंगम, पूजेचा शुभ मुहूर्त, पूजा पद्धत, महत्त्व, भाग्यशाली राशी...
आजची गुरूपौर्णिमा दुर्मिळ! अनेक शुभ योगांचा महासंगम, पूजेचा शुभ मुहूर्त, पूजा पद्धत, महत्त्व, भाग्यशाली राशी...
Guru Purnima 2026: गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! गुरुंना पाठवा प्रेम, आदर, कृतज्ञता व्यक्त करणारे संदेश, शेअर करा 'या' हृदयस्पर्शी शुभेच्छा...
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! गुरुंना पाठवा प्रेम, आदर, कृतज्ञता व्यक्त करणारे संदेश, शेअर करा 'या' हृदयस्पर्शी शुभेच्छा...
Horoscope Today 29 July 2026: आज गुरूपौर्णिमेचा दिवस 7 राशींसाठी भाग्याचा! अत्यंत दुर्मिळ शुभ योग जुळले, दत्तगुरूंच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आज गुरूपौर्णिमेचा दिवस 7 राशींसाठी भाग्याचा! अत्यंत दुर्मिळ शुभ योग जुळले, दत्तगुरूंच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...

व्हिडीओ

Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report
Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
Sharad Pawar On NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis: नीट पेपरफुटी आंदोलनातील विद्यार्थ्यांना राज्य सरकारचा दिलासा; विद्यार्थ्यांवरील गुन्हे तात्काळ मागे घेण्याचा मुख्यमंत्री फडणवीसांचे गृह विभागाला निर्देश
NEET पेपरफुटी आंदोलनातील विद्यार्थ्यांना राज्य सरकारचा दिलासा; विद्यार्थ्यांवरील गुन्हे तात्काळ मागे घेण्याचा मुख्यमंत्री फडणवीसांचे गृह विभागाला निर्देश
Rajapur Anuskura ghat Land Slide: राजापूरच्या अणुस्कुरा घाटात मध्यरात्री धडकी भरवणारं दृश्य, दरड कोसळताच मोठे दगड गडगडत खाली आले अन्...
राजापूरच्या अणुस्कुरा घाटात मध्यरात्री धडकी भरवणारं दृश्य, दरड कोसळताच मोठे दगड गडगडत खाली आले अन्...
Maharashtra Rain News :अरबी समुद्रात चक्राकार वारे घोंगावणार, राज्यभरात धुव्वाधार पाऊस बरसणार, 22 जिल्ह्यांना अलर्ट; हवामान खात्याचा अंदाज काय?
अरबी समुद्रात चक्राकार वारे घोंगावणार, राज्यभरात धुव्वाधार पाऊस बरसणार, 22 जिल्ह्यांना अलर्ट; हवामान खात्याचा अंदाज काय?
Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीच्या समर्थनार्थ रविचंद्रन अश्विन मैदानात, थेट रिकी पाँटिंगचा दाखला देत म्हणाला...
वैभव सूर्यवंशीच्या समर्थनार्थ रविचंद्रन अश्विन मैदानात, थेट रिकी पाँटिंगचा दाखला देत म्हणाला...
Chief Minister Wealth : देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे?
देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे? 
Karja Mafi Scheme : पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
Arvind Sawant : जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
Embed widget