Astrology , Zodiac Sign : मित्र राशी आणि शत्रू राशीचे वर्णन ज्योतिषशास्त्रात आढळते. जीवनात खऱ्या मित्राची भूमिका खूप महत्त्वाची मनाली जाते. चाणक्य नीतीनुसार खरा मित्र संकटाच्या वेळी कळतो. जीवनातील यश-अपयशामागेही मैत्री महत्त्वाची मानली जाते. जेव्हा आयुष्यात चांगले मित्र असतात, तेव्हाच माणसाला मोठे यश मिळते. ज्योतिष शास्त्रानुसार, राशीच्या ज्ञानाच्या मदतीने तुम्ही एक चांगला मित्र देखील निवडू शकता. राशीनुसार कोणाशी खरी मैत्री करावी, हे जाणून घेता येऊ शकते. 



  • मेष (Aries) : मिथुन आणि धनु राशीच्या लोकांमध्ये चांगली मैत्री होऊ शकते. कारण या राशीचे लोक त्यांच्या वागण्यात मेष राशीच्या लोकांसारखे असतात.

  • वृषभ (Taurus) : सौंदर्य, प्रेम आणि संपत्तीचा ग्रह शुक्र हा वृषभ राशीचा स्वामी आहे. कर्क आणि कन्या या राशीच्या लोकांमध्ये चांगली मैत्री होऊ शकते.

  • मिथुन (Gemini) : चपळ, जिज्ञासू, आणि मोहक मिथुन राशीचे लोक मेष आणि सिंह राशीच्या लोकांसारखे असतात.

  • कर्क (Cancer) : संवेदनशील, स्व-संरक्षणात्मक आणि प्रेमळ कर्क राशीच्या लोकांची वृषभ आणि मीन राशीच्या लोकांशी चांगली जुळते. 

  • सिंह (Leo) : सूर्याची राशी सिंहला मिथुन आणि तूळ राशी असलेल्या लोकांचा सहवास आवडो.

  • कन्या (Virgo) : परफेक्शनिस्ट, जे आरोग्याबाबत जागरूक असतात, कन्या राशीच्या लोकांसाठी वृषभ आणि मकर राशीशी चांगले जुळवून घेऊ शकतात.

  • तूळ (Libra) : प्रेम, सौंदर्य आणि संपत्तीचा ग्रह शुक्राचे अधिपत्य आहे. तूळ, सिंह आणि कुंभ राशीशी घट्ट मैत्री होण्याची शक्यता असते.

  • वृश्चिक (Scorpio) : वृश्चिक राशीच्या लोकांना मकर आणि मीन राशीचे लोक आवडतात, त्यांच्याशी मैत्री फलदायी ठरू शकते.

  • धनु (Sagittarius) : धनु राशीच्या लोकांची उत्तम मैत्री ही मेष आणि कुंभ राशीच्या लोकांशी होऊ शकते.

  • मकर (Capricorn) : करिअर ओरिएंटेड मकर राशीच्या लोकांना मैत्रीसाठी कन्या आणि वृश्चिक राशीच्या लोकांची निवड करायला आवडते.

  • कुंभ (Aquarius) : भविष्याचा विचार करणारे कुंभ राशीचे लोक तूळ आणि धनु राशीच्या जवळ येतात.

  • मीन (Pisces) : स्वप्नात राहणारे लोक मीन राशीशी संबंधित असतात. या राशीच्या बहुतेक लोकांना कर्क आणि वृश्चिक राशीच्या लोकांची साथ मिळते. त्यांना या राशीच्या लोकांना आपले चांगले मित्र बनवायला आवडते.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.)