Papamochani Ekadashi 2024: प्रत्येक व्यक्ती ही शंभर टक्के बरोबर नसते. कळत नकळत आपल्याकडून काही चुका होतात किंवा आपल्याकडून पाप होते, त्या पापांचे प्रायश्चित करण्यासाठी किंवा त्या पापांपासून मुक्ती मिळण्यासाठी पापमोचनी एकादशीचे व्रत केले जाते. होळीनंतर येणारी आणि पाडव्याच्या अगोदर म्हणजे फाल्गुन महिन्यात येणाऱ्या एकादशीला पापमोचनी एकादशी म्हणात. कळत नकळत आपण केलेल्या  पापाचा नाश करण्यासाठी पापमोचनी एकादशीचे (Papamochani Ekadashi ) व्रत करवे, अशी मान्यता आहे. हे व्रत महाभारतात भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले होते.  पापाचा नाश करण्यासाठी हे व्रत केले जाते. हे व्रत अतिशय प्रभावशाली आहे. 


फाल्गुन शुक्ल एकादशीचे व्रत करणाऱ्या व्यक्तीला पापांपासून मुक्ती मिळते, म्हणूनच याला पापमोचनी एकादशी म्हणतात. पापमोचनी एकादशी यंदा   शुक्रवार,5 एप्रिल रोजी  आहे. धार्मिक शास्त्रात हे व्रत 80 वर्षे पाळण्याचे नियम आहेत.  परंतु सध्या धकाधकीच्या जीवनात उद्यापन आधीही पाळता येते.  पापमोचनी एकादशीमध्ये विष्णूंच्या चतुर्भुज रुपाची पुजा केली जाते. एकादशीच्या दिवशी स्नान करुन संकल्प करावा त्यानंतर सोळा प्रकारचे साहित्य वापरुन विष्णूची पुजा करावी. 


व्रत कसे करावे? 


दशमी तिथीच्या रात्रीपासून हे व्रत सुरू होते, रात्री झोपण्यापूर्वी एकादशीचे व्रत स्मरण करावे व नंतर दुसऱ्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करावे. स्नान करून एकादशी व्रताचा संकल्प करावा.श्रींची पूजा करावी. भगवान विष्णुला तुळशीचे पाने, फुले, चंदन अर्पण करावे.  उदबत्ती आणि नैवेद्य अर्पण करा. यानंतर विष्णुस्तोत्राचे पठण करावे. पुजा केल्यानंतर भगवत कथेचा पाठ करावा.  द्वादशीला विष्णूंची पुजा करुन हे व्रत सोडावे. या दिवशी आपल्याला जमेल तसे  दान वगैरे करून व्रत पूर्ण केले जाते.  


मोक्षाची दारे होतात खुली


पौराणिक कथेनुसार या पापमोचनी एकादशीच्या दिवशी व्रत केल्याने जन्मांतरीचे पाप नाहीसे होते. या एकादशीला अनेक महत्त्व आहे. या व्रताने मनातील सगळ्या इच्छा पूर्ण होतत. या व्रतामुळे मनुष्याच्या मोक्षाची दारे खुली होतात.


पापमोचनी एकादशी व्रताची कथा


एकदा देवराज इंद्र चित्ररथ वनात गंधर्व आणि अप्सरांसोबत फिरत होते. च्यवन ऋषींचे पुत्र तेजस्वी ऋषी देखील त्या वनात तपश्चर्या करत होते. मंजुघोष नावाच्या अप्सरेने त्यांना मोहित केले आणि अनेक वर्षे त्यांच्यासोबत घालवली. एके दिवशी मंजुघोष परत जाऊ लागली तेव्हा तेजस्वी ऋषींना समजले की, त्यांची तपश्चर्या भंग पावली आहे. त्यांनी अप्सरेला पिशाचनी होण्याचा शाप दिला. पण मंजूघोषाच्या विनंतीनंतर त्यांनी तिला फाल्गुन शुक्ल एकादशीला विधीनुसार उपवास करण्याचा सल्ला दिला, ज्यामुळे तिची पापे मुक्त होतील आणि तिला तिचे मूळ रुप परत मिळेल. तेजस्वी ऋषी आपले वडील ऋषी च्यवन यांच्याकडे आले.


हे ही वाचा:


Horoscope 2nd April 2024:  मंगळवारी ‘या’ राशींवर दिसेल गणपतीची कृपा, महिलांना परिश्रमातून मिळेल यश; 12 राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या