Horoscope 2nd April 2024:  आजचं माझं  भविष्य काय? आज  काय होणार?  किंवा आजचा  आपला दिवस कसा असणार प्रत्येक जण कधी ना कधी हा विचार करतच असतो. लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनाच  भविष्यात काय होणार हे जाणून घेण्याची प्रबळ इच्छा असते. यासाठीच  आपल्या राशी आपल्याला मदत करतात. आज मेष ते मीन राशीमध्ये काय लिहिले आहे. कोणासाठी  आजचा दिवस कोणासाठी शुभ किंवा  अशुभ कोणासाठी हे  समजण्यासाठी सविस्तरपणे वाचा आजचे राशीभविष्य..


मेष (Aries Horoscope Today)


आज  एक वेगळाच उत्साह जाणवणार आहे. उत्तम आत्मविश्वास  आणि धडाडीच्या जोरावर कामाचा फडशा पाडालय. स्वतंत्रपणे कार्य करण्यात आनंद वाटेल. समोर आलेल्या संधीचा योग्य उपयोग कसा करुन घ्यायचा हे ठरवाल. डोकेदुखीचा त्रस संभावतो


वृषभ (Taurus Horoscope Today)


तुमचा बदलत  जाणार मूड तुम्हला आनंदी करु शकणार नाही. अनावश्यक गोष्टीत पैसा खर्च होईल. नोकरी धंद्यात स्पर्धेला तोंड द्यावे लागेल. मानसिक अस्वस्थता जाणवेल. महिलांना काही कामे मनविरुद्ध करावी लागतील. 


मिथुन (Gemini Horoscope Today)


आज भाग्याची साथ चांगली मिळेल. परंतु कोणतेही निर्णय पटकन  न घेतल्यामुळे आलेली संधी निघून जाण्याची शक्यता आहे. कामाच्या क्षेत्रात घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयापासून लाभ होईल.


कर्क  (Cancer Horoscope Today)


उत्तम कल्पनाशक्तीच्या जोरावर समाजात प्रसिद्धी मिळवाला. गैरसमज, वितंडवादाची गाठोडी मागे टाकून पुढे जाल. लांबच्या प्रवासाचे योग येतील. तुमच्या काम करण्याच्या कुशलतेमुळे बऱ्याच जणांचा फायदा होईल. विद्यार्थ्यांनी आपली अभ्यासू वृत्ती जागृत ठेवावी


सिंह (Leo Horoscope Today)  


कोणतही गुंतवणूक करताना योग्य निर्णय घेऊन करा. नोकरी व्यवसयात नोकरी व्यवसायात तुम्ही म्हणाल त्या पध्दतीने काम होईल वरिष्ठांच्या मर्जीत राहाल. लेखकांची लेखनकला बहरेल. बोलण्याने लोकांना आपले कराल. महिलांनी भावनांवर नियंत्रण ठेवावे


कन्या (Virgo Horoscope Today)


एखादी गोष्ट पटल्याशिवाय करु नये. कोणत्याही तणावाच्या वातावरणात शांत बसणे योग्य ठरेल.  व्यवसाय कसा वाढेल याचा विचार जास्त कराल, यासाठी नवीन विचार आणि कार्यपध्दती याचे स्वागत कराल. महिलांना नवीन जबाबदाऱ्या अंगावर घ्याव्या लागतील.


तुळ (Libra Horoscope Today)


 नोकरीत आळस सोडून पुन्हा सक्रिय बनाल. त्यामुळे प्रतिष्ठा वाढेल. दुसऱ्याला योग्य सल्ला द्याल. कोणाचेही वर्चस्व सहन करणार नाही. तुमच्याकडे  असलेल्या कलेला मिळेल. स्नायूंची दुखणी त्रास देऊ शकतात. महिला प्रत्येक बाबतीत सतर्क रहातील


वृश्चिक (Scorpio Horoscope Today)


 राग थोडा बाजून ठेवलात तर अनेक गोष्टी सुसह्य होतील. घरातील वातावरण हलके फुलके ठेवण्याच तुमचा वाटा जास्त राहील. वारसा हक्काने मिळणाऱ्या इस्टेटीचे प्रश्न सुटतील. दुसऱ्यांना मदत करण्यात महिला पुढे राहतील.


धनु (Sagittarius Horoscope Today) 


परिस्थितीचे रडगाणे न गाता धीराने उभे राहाल.  याबरोबरच दुसऱ्याचा  मोठेपणा मान्य करण्याची सवय लावून घ्यावी लागेल. मिळालेल्या पैशाला अनेक वाटा फुटतील मानासीक शांती जपा नाहीतर त्याचा प्रकृतीवर परिणाम होईल. महिलांचा रागामुळे मनावरचा ताबा जाऊ शकतो


मकर (Capricorn Horoscope Today)


 इतरांपेक्षा आपण वेगळे आहोत हे समजण्यात धन्यता मानाल.  आजूबाजूचे वातावरण आनंदी ठेवाल. तुमच्या आकर्षक बोलण्याचा परिणाम इतरांवर होऊ शकतो.  चिंतनातून सर्जनशीलता निर्माण कराल. महिलांचे कर्तृत्व बहरेल.


कुंभ (Aquarius Horoscope Today)


दिलेला शब्द पाठण्याचा  जास्तीत जास्त प्रयत्न करावा.  भावंडांशी मतभेद संभवतात. त्यामुळे परिस्थिती आटोक्यात आणताना सुवर्णमध्य कसा काढायचा याचा विचार प्रामुख्याने करावे लागल. उष्णतेचे विकार, उच्च रक्तदाबाच्या लोकांनी काळजी घ्यावी.


मीन (Pisces Horoscope Today)


 समस्या सोडवण्याचा प्राधान्यक्रम ठरवल्यास तुमच्या समस्या सुखावह  होतील. तणाव कमी होईल.  कोणाला कडक बोलू नका, विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष देताना त्याचे नियोजन करणे आवश्यक व्यवहारात आवश्यक व्यवहारात तर्कशुद्ध विचारांचा माग घ्यावा लागेल. महिला धार्मिक कार्यात भाग घेतील. 


डाॅ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)


संपर्क - 9823322117


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


हे ही वाचा :