एक्स्प्लोर

Pandharpur : विठ्ठल-रुक्मिणीच्या मेघडंबरीला चांदी बसवण्यास सुरुवात; भक्ताने अर्पण केली 2 कोटीची चांदी

Pandharpur Vitthal Rukmini : गेले अडीच महिना अहोरात्र मेहनत घेऊन कारागिरांनी विठ्ठल-रुक्मिणीसाठी साडेतीन फूट लांब आणि साडेतीन फूट रुंद अशा आकाराची मेघडंबरी उभारली आहे, या मेघडंबरीला आता चांदीने मढवलं जाणार आहे.

Pandharpur News : पुढील शेकडो वर्षासाठी विठ्ठल-रुक्मिणी आता येत्या दोन दिवसात नवीन मेघडंबरीत विसावणार असून या सागवानी मेघडंबरील चांदी लावण्याच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे . विशेष म्हणजे यासाठी लागणारी जवळपास 230 किलो चांदी नांदेड येथील एका विठ्ठल भक्ताने आपले नाव जाहीर न करण्याच्या अटीवर विठ्ठल चरणी अर्पण केली आहे.

विठ्ठलभक्ताकडून 2 कोटींहून अधिक रकमेची चांदी दान

नांदेड येथील व्यवसायाने ठेकेदार असणारा हा विठ्ठल भक्त दरवर्षी पायी दिंडीसोबत पंढरपूरला आषाढीसाठी येत असतो. विठ्ठल मंदिरात नवीन मेघडंबरी बनवण्याचे काम सुरु असल्याची बातमी त्याने ABP माझावर पाहिल्यावर त्याने यासाठी लागणारी जवळपास 2 कोटी पेक्षा जास्त रकमेची चांदी अर्पण करण्याची भावना मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्याकडे बोलून दाखवली. मंदिर समितीने त्यास होकार देताच त्याने आपले दान गुप्त राहावे, या भावनेतून नाव जाहीर न करण्याची विनंती मंदिर समितीला केली होती. त्यानुसार या अनामिक भाविकाने विठुराया आणि रुक्मिणी मातेच्या मेघडंबरीवर बसवायची सर्व चांदी मंदिराकडे अर्पण केल्यावर आता सागवानी मेघडंबरीवर ही चांदी बसवण्याच्या कामास सुरुवात झाली आहे.

बारीक नक्षीकाम असणारे सर्व सुटे भाग मंदिरात आणले

हे चांदी बसवण्याचं काम पंढरपूर येथील प्रसिद्ध सोनार अविनाश जव्हेरी यांचेकडे असून त्यांनी हे काम पुणे येथील जांगीड सिल्वर वर्क्स या कंपनीकडून करून घेतलं आहे. पूर्वी या मेघडंबरीसाठी 20 गेजचा चांदीचा पत्रा वापरण्यात येत होता . त्यामुळे त्याची झीजही लवकर होत होती . हे टाळण्यासाठी आता या मेघडंबरील 16 गेजचा जाड चांदीचा पत्रा वापरण्यात आला आहे . या मेघडंबरीवर पूर्वी होते तशीच संपूर्ण नक्षीकाम जांगड कंपनीने हाताने बनवलं असून गेले 15 दिवस कंपनीत या मेघडंबरील लागणारे चांदीची अतिशय बारीक नक्षीकाम असणारे सर्व सुटे भाग मंदिरात आणले गेले आहेत.

शुद्ध चांदीत मढवणार मेघडंबरी

यानंतर मंदिर समितीने या सर्व चांदीच्या भागांचे वजन करून पुन्हा या कंपनीच्या ताब्यात दिले . आता या लाकडी मेघडंबरीवर हे विविध सुटे भाग बसवण्यास सुरुवात करण्यात आली आहे . या मेघडंबरीसाठी वापरलेली सर्व चांदी ही शुद्ध वापरण्यात आलेली आहे .  सध्या विठुरायाच्या मूळ रूपात असलेल्या दगडी गाभाऱ्यात केवळ विठूरायाची मूर्ती आणि रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात दगडी सिहासनावरील मातेची मूर्ती दिसत होती . मात्र येत्या दोन ते तीन दिवसात आता विठुराया आणि रुक्मिणीमाता पुढील शेकडो वर्षासाठी या नवीन मेघडंबरीत विसावणार आहेत. 

हेही वाचा:

Numerology : अतिशय चतुर असतात 'या' जन्मतारखेचे लोक; दुसऱ्याकडून काम करुन घेणं यांना चांगलंच जमतं, नेहमी करतात स्वत:चाच विचार

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 28 July 2026: आज मंगळवारचा दिवस 7 राशींसाठी भाग्याचा! एकामागोमाग शुभ योग जुळले, बाप्पांच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आज मंगळवारचा दिवस 7 राशींसाठी भाग्याचा! एकामागोमाग शुभ योग जुळले, बाप्पांच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
Baba Vanga Prediction: बाबा वेंगाची जुलैच्या शेवटच्या दिवसांची भविष्यवाणी व्हायरल! 5 राशी कोट्यधीश होण्याच्या मार्गावर; 'हा' काळ जॅकपॉटचा! तुमची रास?
बाबा वेंगाची जुलैच्या शेवटच्या दिवसांची भविष्यवाणी व्हायरल! 5 राशी कोट्यधीश होण्याच्या मार्गावर; 'हा' काळ जॅकपॉटचा! तुमची रास?
Shani Vakri 2026: आजपासून शनिचा मोठा गेम! 30 वर्षांनी शनि वक्रीचा योगायोग, मोठी उलथापालथ होणार? राजकारण, पेट्रोल-डिझेल.. ज्योतिषशास्त्रात म्हटलंय...
आजपासून शनिचा मोठा गेम! 30 वर्षांनी शनि वक्रीचा योगायोग, मोठी उलथापालथ होणार? राजकारण, पेट्रोल-डिझेल.. ज्योतिषशास्त्रात म्हटलंय...
Shiv Puran: शिवलिंगावर जलाभिषेक केलेले पाणी पिणे शुभ की अशुभ? 'या' गोष्टी फार कमी लोकांना माहित, शिवपुराणातील नियम जाणून थक्क व्हाल...
शिवलिंगावर जलाभिषेक केलेले पाणी पिणे शुभ की अशुभ? 'या' गोष्टी फार कमी लोकांना माहित, शिवपुराणातील नियम जाणून थक्क व्हाल...

व्हिडीओ

Parliament Monsoon Session Special Report : धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा,संसदेचे कामकाज वारंवार तहकूब
Insta E20 Janta Party Special Report : सीजेपीला मिळालेलं यश E20 जेपीला मिळणार?
MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?
Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल
Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bihar Protest Case: बिहार पोलिसांच्या 'त्या' व्हिडिओची देशभर चर्चा, बिहार सरकारची माघार, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश  
बिहार सरकारचा मोठा निर्णय, पोलिसांना आंदोलक विद्यार्थ्यांवरील केस मागे घेण्याचे आदेश
RBI: मोठी बातमी, 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार, केंद्र सरकारची आरबीआयच्या प्रस्तावाला मंजुरी
मोठी बातमी, 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार, केंद्र सरकारची आरबीआयच्या प्रस्तावाला मंजुरी
नगरसेवक रमेश म्हात्रेची न्यायालयात विनवणी, हायकोर्टाने खडेबोल सुनावले; वकिलांनाही कडक शब्दात सवाल, नेमकं काय झालं?
नगरसेवक रमेश म्हात्रेची न्यायालयात विनवणी, हायकोर्टाने खडेबोल सुनावले; वकिलांनाही कडक शब्दात सवाल, नेमकं काय झालं?
Maharashtra Cyber Action : महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
PNG Jewellers : पीएनजी ज्वेलर्सचा FY27 च्या पहिल्या तिमाहीत निव्वळ नफा 105 कोटी रुपयांवर पोहोचला, शेअरमध्ये जोरदार तेजी
पीएनजी ज्वेलर्सचा FY27 च्या पहिल्या तिमाहीत निव्वळ नफा 105 कोटी रुपयांवर पोहोचला, शेअरमध्ये जोरदार तेजी
गणपती आले... मध्य रेल्वेकडून 246 गणपती विशेष गाड्यांची घोषणा; CSMT वरुन 98 तर पुण्यातून 10 विशेष गाड्या
गणपती आले... मध्य रेल्वेकडून 246 गणपती विशेष गाड्यांची घोषणा; CSMT वरुन 98 तर पुण्यातून 10 विशेष गाड्या
फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
Ambergris Seized : तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई
तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई
Embed widget