Palm Reading : हस्तरेखा शास्त्रानुसार, तळहातावरील (Palm) रेषांव्यतिरिक्त शरीराच्या विविध अवयवांवर असणाऱ्या तिळाचं देखील विशेष महत्त्व आहे. व्यक्तीच्या तळहातावर अनेक प्रकारच्या रेषा असतात. याच तळहाताच्या रेषांवरून व्यक्तीचं भविष्य आणि स्वभावाचा अंदाज लावला जातो. तसेच, हातावरच्या तिळावरून सुद्धा व्यक्तीचं नशीब, त्याची प्रगती आणि स्वभावाची माहिती मिळते. याच तिळाच्या शुभ आणि अशुभ परिणामांबद्दल जाणून घेऊयात. 


तळहातावरील 'या' तिळाने होतो मानसिक त्रास 


हस्तरेखा शास्त्रानुसार, बुधवर अनामिका खाली असलेला तीळ व्यक्तीला प्रचंड नुकसान आणि मानसिक त्रास देतो. तर, सूर्यावर तीळ म्हणजेच अनामिका खाली असलेला तीळ तुमच्या नोकरीत अडचण निर्माण करणारा असतो. त्यामुळे हे दोन्ही तीळ जर तुमच्या हातावर असतील तर ते हस्तरेखा शास्त्रानुसार अशुभ असण्याचे संकेत देतात. 


अंगठ्यावरचा तीळ काय सूचित करतो?


ज्या लोकांच्या अंगठ्यावर तीळ असतो त्यांच्या बाबतीत असं म्हटलं जातं की, ते न्यायाचं समर्थन करतात. तसेच, त्यांना वैवाहिक जीवनात त्रास सहन करावा लागतो. हे लोक नेहमी सत्याच्या आणि न्यायाच्या बाजूने असतात. पण, प्रत्येक वेळी यांचा विजय होतोच असं नाही. या लोकांना मानसिक त्रासही सहन करावा लागतो. कारण, यांना खोटं बोलता येत नाही. 


हाताच्या बोटावरचे तीळ सांगतात...


असं म्हणतात की, ज्या लोकांच्या हाताच्या बोटावर तीळ असतो त्यांना नोकरीत चांगला मान-सन्मान मिळतो. समाजात या लोकांचा आदर फार वाढतो. तसेच हे लोक अभ्यासातही प्रचंड हुशार आणि मेहनती असतात. करिअरच्या बाबतीत, व्यवसायाच्या बाबतीत हे लोक नेहमीच अग्रेसर उत्साही आणि आग्रही असतात. व्यवसाय करण्यात यांच्यामध्ये उपजतच क्षमता असते. 


'या' लोकांकडे कधीच नसते पैशांची कमतरता 


शनी पर्वतावरील तीळ एखाद्या व्यक्तीचा आदर, आनंद आणि संपत्ती दर्शवतो.  ज्या लोकांच्या सर्वात लहान बोटावर तीळ असतो हस्तरेषा शास्त्रानुसार, वडिलोत्पार्जित संपत्ती मिळण्याची शक्यता असते. हस्तरेषा शास्त्रानुसार, तळहातावर बृहस्पति पर्वताच्यावर तीळ असणे म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात पैशांची कमतरता कधीच नसते. तर, त्यांचं जीवन अनेक सुख-सुविधांनी भरलेलं असतं. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा: 


Shani Rekha : वयाच्या 40 व्या वर्षीही होऊ शकता मालामाल, तळहातावर नेमकी कुठे असते शनी रेखा? वाचा हस्तशास्त्र काय सांगतात...