Shani Rekha : अगदी लहान वयातही यशाची उंची गाठणारे अनेक लोक तुम्ही पाहिले असतील. हस्तरेषा शास्त्रानुसार अशा लोकांच्या तळहातावर (Palm) शनीची रेषा (Shani Rekha) खूप मजबूत असते. यांच्यावर शनी प्रसन्न असतो असं म्हणतात. जेव्हा शनी रेषा बलवान असते तेव्हा तुम्ही फार कमी कष्ट करूनही माणूस मोठं यश मिळवू शकता. त्यामुळे, तुमच्या हातावर शनीची रेषा नेमकी कुठे आहे आणि या रेषेमुळे व्यक्तीला कोणकोणते फायदे मिळू शकतात या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.    


तळहातावर शनीची रेषा कुठे असते? 


शनी रेषेबद्दल बोलताना काही लोक याला भाग्यरेषा असं देखील म्हणतात. तळहातातील मणिबंधापासून किंवा हाताच्या मधल्या भागापासून सुरू होऊन शनी पर्वतापर्यंत जाणाऱ्या रेषेला शनी रेखा म्हणतात. शनी पर्वत तळहाताच्या मधल्या बोटाच्या खाली आहे. हातामध्ये खोल, स्पष्ट आणि अखंड शनी रेषा असणं खूप शुभ असते. शनी रेषेला भाग्यरेषा असेही म्हणतात कारण ही रेषा व्यक्तीचे भाग्य सांगणारी रेषा असते. 


शनी रेषेमुळे प्रत्येक पावलावर मिळेल नशिबाची साथ  



  • ज्या लोकांच्या हातात शनीची रेषा असते त्यांना जगातील सर्व सुखसोयी मिळतात. पण, एक गोष्ट लक्षात घ्या की, अगदी कमी कष्ट करूनही असे लोक आहेत ज्यांना आयुष्यात मोठं यश मिळतं.  

  • करिअरबद्दल बोलायचे झाले तर, तळहातावर शनीची रेषा मजबूत असेल तर एखाद्या व्यक्तीला चांगल्या उच्च पदावर नोकरी मिळते आणि अशा व्यक्तीने प्रयत्न केल्यास त्या व्यक्तीला पार सरकारी नोकरीसाठीही प्रचंड मेहनत करून यश मिळू शकते.  

  • अशा लोकांची सर्वात खास गोष्ट म्हणजे त्यांना वयाच्या 35 व्या वर्षापर्यंत आयुष्यातील प्रत्येक सुख आणि वैभव प्राप्त होते.

  • शनी देवाच्या कृपेशी शनी रेखा देखील जोडलेली दिसते. अशा लोकांवर शनी देवाची कृपा सदैव राहते असे मानले जाते.

  • अशा लोकांची लव्ह लाईफ देखील चांगली जाते आणि त्यांना त्यांच्या जोडीदाराकडून खरे प्रेम मिळते. त्यामुळे तुमच्या हाताची शनी रेखा नेमकी कुठे आहे ते पाहा. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


हेही वाचा :


Shani Jayanti 2024 : आज शनी जयंतीला जुळून आलाय सर्वार्थसिद्धी योग! 'या' 3 राशींवर असणार शनीदेवाची कृपा, धनसंपत्तीत होईल अपार वाढ, हाती घेतलेलं कामही होईल पूर्ण