एक्स्प्लोर

Numerology Today 7 November 2023 : 'या' जन्मतारखेच्या लोकांसाठी आज शुभसंकेत; अंकशास्त्रानुसार जाणून घ्या तुमचं आजचं भविष्य

Numerology 2023 : अंकशास्त्रात संख्यांच्या मदतीने व्यक्तीच्या भविष्याविषयी माहिती दिली जाते. मुलांकाद्वारे हे भविष्य समजतं, या द्वारे तुमचं आजचं भविष्य जाणून घ्या.

Numerology Today 7 November 2023 : अंकशास्त्र (Numerology) देखील ज्योतिषशास्त्राप्रमाणे एखाद्या व्यक्तीच्या भविष्याबद्दल सांगते. अंकशास्त्रात व्यक्तीच्या जन्मतारखेच्या आधारे मुलांक काढला जातो आणि भविष्याची मांडणी केली जाते. ज्योतिषशास्त्राप्रमाणे अंकशास्त्रही महत्त्वाचं आहे, यात गणिताचे नियम वापरुन तुमच्या भविष्याबद्दल सांगितलं जातं.

मुलांक ही जन्मतारीख असते. जर तुमचा जन्म 7 तारखेला झाला असेल तर तुमचा मूलांक 7 असेल. परंतु जर तुमचा जन्म 17 किंवा 26 किंवा अशाच दोन सांख्यिक तारखेला झाला असेल, तर तुमचा मुलांक 1+7 = 8, 2+6 = 8 असा काढला जातो. जर एखाद्या व्यक्तीची जन्मतारीख 29 असेल, तर 2+9 = 11, 1+1 = 2 असेल, तर व्यक्तीचा मुलांक 2 असेल.

आता तुम्हाला तुमचा मुलांक तर मिळालाच असेल, याद्वारे तुमचा आजचा दिवस कसा जाईल? याबाबत जाणून घेऊया.

मूलांक 1:

आज तुम्ही पैसे कमावण्यासाठी अनेक मार्गांचा अवलंब कराल. तुमच्या दिवसाची सुरुवात चांगली होईल. जवळच कुठेकरी सहलीला जाता येईल. गुप्त शत्रू वाढू शकतात, तरीही तुमचं शौर्य वाढेल. मुलांकडून समाधान मिळेल.

शुभ अंक- 21
 
शुभ रंग- केशरी 

मूलांक 2: 

आज आत्मविश्वास वाढेल. तुमच्या सकारात्मक विचारांमुळे कामात मन रमेल. कौटुंबिक बाबींवर लक्ष केंद्रित करू शकाल. आरोग्याबाबत सावध राहा, अन्यथा जुने आजार तुम्हाला उद्भवू शकतात. आई-वडील, मुलं, नातेवाईक यांच्याशी संबंध दृढ होतील. आपलं कार्य नैतिकतेने पूर्ण कराल.

शुभ अंक- 11
शुभ रंग- ब्राऊन 

मूलांक 3:

तुम्ही तुमची दिनचर्या सुधाराल. आर्थिक स्थिती सुधारेल. तुम्हाला पोटाशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागू शकतो. विचारपूर्वक प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक केली तरच बरं होईल. सावधपणे काम करण्याची गरज आहे. मित्र तुम्हाला चांगलं सहकार्य करतील. काही खास सणाच्या तयारीत तुम्ही आज व्यस्त असाल.

शुभ अंक- 19 

शुभ रंग- हिरवा

मूलांक 4:

तुम्हाला आर्थिक आणि व्यावसायिकदृष्ट्या चांगलं यश मिळू शकतं. तुम्ही पूर्वीपेक्षा अधिक सक्षम व्हाल. भावनांनी वाहून जाऊ नका किंवा निष्काळजी होऊ नका. स्वभावात नम्रता राहील. कुटुंबातील संबंध सौहार्दपूर्ण राहतील.

शुभ अंक- 23

शुभ रंग- पिवळा 

मूलांक 5:

समाजात पद आणि प्रतिष्ठा वाढेल. विदेश प्रवास आनंददायी राहील. काही मानसिक तणाव असू शकतो. सर्वांकडून तुमचं काम करून घेण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवणं हा चुकीचा निर्णय असेल. प्रेम आणि रोमान्सच्या बाबतीत परिस्थिती तुमच्या अनुकूल असेल.
  
शुभ अंक- 9

शुभ रंग- भगवा 

मूलांक 6:

उत्पन्नापेक्षा खर्च वाढल्याने समस्या निर्माण होतील, खर्चासाठी संतुलित बजेट बनवा आणि खर्चावर नियंत्रण ठेवा. कुटुंब आणि मित्र तुम्हाला आनंद देतील. सरकारी काम, कायदेशीर अडचणी, दीर्घकाळ प्रलंबित असलेले करार यांसारख्या बाबी सहज सोडवता येतील.

शुभ अंक- 16 

शुभ रंग- निळा 

मूलांक 7: 

आज आर्थिक बाबींना गती मिळेल. मुलाचं लग्न होण्याची शक्यता आहे. लग्नाची तारीख निश्चित होऊ शकते. तुमचा तुमच्या कुटुंबासोबत चांगला वेळ जाईल. आध्यात्मिक जग देखील तुम्हाला आकर्षित करेल. रोमान्समध्ये परिस्थिती तुमच्या अनुकूल असेल.

शुभ अंक- 18

शुभ रंग- ग्रे

मूलांक 8:

लोक तुमच्याबद्दल नकारात्मक बोलू शकतात. तुमचा स्वभाव चिडचिडा होईल. तुम्हाला तुमच्या संभाषणात सावध राहावं लागेल. कंजूस नसतानाही, तुम्ही आर्थिक बाबींचा गांभीर्याने विचार कराल. तब्येतीची चिंता राहील. कौटुंबिक समस्या सुटतील.

शुभ अंक- 6

शुभ रंग- लाल 

मूलांक 9:

समविचारी लोकांशी तुमची ओळख वाढेल. मान-सन्मानात वाढ होईल. तुम्ही तुमच्या मुलाच्या शाळेत किंवा कॉलेजमध्ये जाऊ शकता. कौटुंबिक कार्यक्रमात व्यस्त राहू शकाल. भागीदारी आणि नातेसंबंधांवर विचारपूर्वक निर्णय घ्या.

शुभ अंक - 29
 
शुभ रंग - गुलाबी 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:

Weekly Love Horoscope 6 To 12 November 2023: मेष ते मीन सर्व 12 राशींच्या लोकांचं लव्ह लाईफ कसं राहील? साप्ताहिक राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Surya Guru Yuti: 16 जुलै म्हणजे 3 राशींच्या भाग्योदयाची वेळ! सूर्य-गुरूची पॉवरफुल युती करणार मालामाल, पैसा चुंबकासारखा, नोकरीत प्रमोशनचे योग...
16 जुलै म्हणजे 3 राशींच्या भाग्योदयाची वेळ! सूर्य-गुरूची पॉवरफुल युती करणार मालामाल, पैसा चुंबकासारखा, नोकरीत प्रमोशनचे योग...
Horoscope Today 15 July 2026: आजचा बुधवार 7 राशींचं नशीब पालटणारा! अत्यंत शुभ योग जुळले, विठुरायाच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य...
आजचा बुधवार 7 राशींचं नशीब पालटणारा! अत्यंत शुभ योग जुळले, विठुरायाच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य...
Shravan 2026: भगवान शंकरांच्या पूजेत 3 पानांच्या बेलपत्रालाच महत्त्व का आहे? शिवलिंगाला बेलपत्र अर्पण करण्यामागील श्रद्धा काय आहे?
भगवान शंकरांच्या पूजेत 3 पानांच्या बेलपत्रालाच महत्त्व का आहे? शिवलिंगाला बेलपत्र अर्पण करण्यामागील श्रद्धा काय आहे?
Shiv Puran: कलियुगात माणसाचा स्वभाव कसा बदलत जाईल? कलियुगाचा अंत व्हायला किती वेळ शिल्लक? शिवपुराणातील उल्लेख जाणून थक्क व्हाल
कलियुगात माणसाचा स्वभाव कसा बदलत जाईल? कलियुगाचा अंत व्हायला किती वेळ शिल्लक? शिवपुराणातील उल्लेख जाणून थक्क व्हाल

व्हिडीओ

Uddhav Thackeray Nagpur Ramraksha Andolan : नागपुरात रामरक्षा आंदोलनाची नवी कक्षा Special Report
Zero Hour Full : राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह ते नागपुरात रामरक्षा आंदोलन, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Eknath Shinde Delhi Visit to Meet Amit Shah : दिल्लीवारीचं कारण विस्तार की राजकारण? Special Report
Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया
Sunetra Pawar यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावर आक्षेप घेणारे Sachchidanand Singh माझावर EXCLUSIVE

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Accident News: ब्रेक फेल झालेल्या ट्रकची इकोला धडक; कारचा चक्काचूर, 4 जणांचा मृत्यू, नाशिकच्या सावळघाटातील घटना
ब्रेक फेल झालेल्या ट्रकची इकोला धडक; कारचा चक्काचूर, 4 जणांचा मृत्यू, नाशिकच्या सावळघाटातील घटना
Mumbai : 'विहानचा जीव नेमका कुणामुळे गेला?' चेंबूर दुर्घटनेवरून भाजप नेते अमीत साटम यांचा BMC वर थेट हल्लाबोल!
'विहानचा जीव नेमका कुणामुळे गेला?' चेंबूर दुर्घटनेवरून भाजप नेते अमीत साटम यांचा BMC वर थेट हल्लाबोल!
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंचा धडाका कायम! मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सवर कारवाई, अस्वच्छतेमुळे जागेवरच परवाना रद्द
तुकाराम मुंढेंचा धडाका कायम! मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सवर कारवाई, अस्वच्छतेमुळे जागेवरच परवाना रद्द
मोठी बातमी! जयंत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल, सुनील तटकरेंसह प्रफुल्ल पटेलही उपस्थित, राजकीय घडामोडींना वेग
मोठी बातमी! जयंत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल, सुनील तटकरेंसह प्रफुल्ल पटेलही उपस्थित, राजकीय घडामोडींना वेग
IND vs ENG : कोट्यवधी चाहत्यांची निराशा, इंग्लंडमध्ये पहिल्या वनडेत विराट कोहली, रोहित शर्मा फ्लॉप, शुभमन गिल, श्रेयस अय्यरनं किल्ला लढवला
कोट्यवधी चाहत्यांची निराशा, इंग्लंडमध्ये पहिल्या वनडेत विराट कोहली, रोहित शर्मा फ्लॉप
बांधकाम कामगारांना सुधारित कल्याणकारी योजना लागू; निवृत्ती वेतनही मिळणार, मुलांच्या शिक्षणासाठी 60 हजार
बांधकाम कामगारांना सुधारित कल्याणकारी योजना लागू; निवृत्ती वेतनही मिळणार, मुलांच्या शिक्षणासाठी 60 हजार
3 महिलांसह बनावट पोलीस, रात्रीची नाकाबंदही लावली; माऊलींच्या पालखीपूर्वी सातारा पोलिसांची कारवाई, 7 जणांना बेड्या
3 महिलांसह बनावट पोलीस, रात्रीची नाकाबंदही लावली; माऊलींच्या पालखीपूर्वी सातारा पोलिसांची कारवाई, 7 जणांना बेड्या
आधी बस स्टँड, आता बारामती रेल्वे स्थानकाचं रुपडं पालटलं; 11.4 कोटी खर्चून पुनर्विकास, लवकरच लोकार्पण
आधी बस स्टँड, आता बारामती रेल्वे स्थानकाचं रुपडं पालटलं; 11.4 कोटी खर्चून पुनर्विकास, लवकरच लोकार्पण
Embed widget