Health Tips : आपली त्वचा (Skin Care Tips) सुंदर दिसावी असं प्रत्येकाला वाटतं. यासाठी लोक अनेक प्रकारचे घरगुती उपाय करतात. हे उपाय सुंदर दिसण्यासाठी उपयुक्त तर असतातच. पण, आजकाल सोशल मीडियावर अनेक प्रकारचे हॅक देखील शेअर केले जातात जे चेहऱ्याचा ग्लो वाढवण्याचा दावा करतात. अनेक लोक यावर सहज विश्वास ठेवतात आणि हे उपाय करतात. ज्यामुळे काही वेळा त्यांच्या इच्छेनुसार परिणाम मिळत नाही. नकळतपणे हे आपल्यालाही कळत नाही की त्वचा हळूहळू खराब होते. त्यामुळे या ठिकाणी आम्ही तुम्हाला अशाच काही गोष्टी सांगणार आहोत जेणेकरून तुम्ही ही चूक पुन्हा करू नये. 


खरंतर, त्वचा हे आपल्या शरीराचे एक आवरण आहे आणि चेहऱ्याची त्वचा अतिशय नाजूक असते, त्यामुळे कॉस्मेटिक उत्पादनांपासून ते उपायांपर्यंत काहीही वापरण्यापूर्वी योग्य माहिती असणं गरजेचं आहे.  


टूथपेस्ट वापरल्याने चेहऱ्याला इजा होते


अनेकजण चेहऱ्यावर पिंपल्स दिसू लागले की विचार न करता सरळ टूथपेस्ट लावतात. यामुळे जरी तुमचे पिंपल्स बरे होत असले तरी मात्र तुमच्या चेहऱ्यासाठी हा उपाय योग्य नाही. कारण टूथपेस्टमध्ये अनेक प्रकारचे केमिकल्स वापरले जातात. जी तुमच्या त्वचेसाठी खूप हानिकारक असू शकतात. यामुळे, त्वचा खूप कोरडी होऊ शकते आणि जळजळ आणि पुरळ यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.


बेकिंग सोडा वापरणे टाळा


आजकाल त्वचेवर बेकिंग सोडा वापरण्याचा ट्रेंड खूप वाढला आहे. पण, बेकिंग सोडा वापरण्याआधी त्याची योग्य माहिती असणे खूप गरजेचं आहे. बेकिंग सोडा त्वचेला एक्सफोलिएट करण्यास मदत करतो. ते कधीही थेट त्वचेवर लावू नका. बेकिंग सोडा पाण्यात मिसळून लावता येतो, पण जर तुमची त्वचा संवेदनशील असेल तर याचा वापर करू नका. 


साखरेने स्क्रब करू नका 


खरंतर, स्क्रबिंगसाठी साखर हा चांगला पर्याय मानला जातो. पण, यामध्ये देखील काळजी घेणं गरजेचं आहे. याचं कारण म्हणजे तुमच्या चेहऱ्याची त्वचा नाजूक आहे आणि साखरेचे दाणे खूप खडबडीत असतात. त्यामुळे साखरेने स्क्रब करणे टाळा. यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स येऊन त्वचा लालसर होते. 


व्हिनेगर वापरू नका 


अनेकजण चेहऱ्यावर ऍपल सायडर व्हिनेगर देखील लावतात. पण, जर तुमची त्वचा कोरडी किंवा संवेदनशील असेल तर व्हिनेगर लावल्याने तुमच्या चेहऱ्याला खूप नुकसान होऊ शकते. चेहऱ्यावर व्हिनेगर वापरण्यापूर्वी योग्य माहिती घ्या.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


महत्त्वाच्या बातम्या :


Health Tips : सावधान! स्ट्रीट फूडमध्ये वारंवार वापरलं जाणारं तेल आरोग्यासाठी घातक; 'या' आजारांचा वाढता धोका