Numerology: आपल्या जीवनात अंकांना विशेष महत्त्व आहे. कारण काही अंक आपल्यासाठी शुभ असतात, तर काही अशुभ. जेव्हा मूल जन्माला येतं तेव्हा त्याचा जन्म कोणत्या ना कोणत्या तारखेला होतो, तेव्हा त्या जन्मतारखेचा प्रभाव त्याच्या आयुष्यात कायम राहतो. कारण ती संख्या कोणत्या ना कोणत्या ग्रहाशी संबंधित असते. आज आपण 8 अंकाबद्दल बोलणार आहोत, ज्याचा संबंध शनिदेवाशी आहे. कोणत्याही महिन्याच्या 8, 17 किंवा 26 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक (Numerology) हा 8 आहे. हे लोक नशिबापेक्षा कर्मावर जास्त विश्वास ठेवतात. तसेच, हे लोक कष्टाळू आणि मेहनती असतात. मूलांक 8 शी संबंधित इतर मनोरंजक गोष्टी जाणून घेऊया...
नशिबापेक्षा कर्मावर ठेवतात विश्वास
अंकशास्त्रानुसार, जे लोक कोणत्याही महिन्याच्या 8, 17 किंवा 26 तारखेला जन्मतात, अशा लोकांवर शनिदेवाची अपार कृपा असते. तसेच हे लोक नशिबापेक्षा कर्मावर जास्त विश्वास ठेवतात. हे लोक कष्टाळू आणि मेहनती असतात. शिवाय हे लोक ठरवलेलं काम पूर्ण करुनच शांत होतात. याचा अर्थ, हे लोक त्यांना जे ध्येय गाठायचं आहे, ते साध्य करुनच राहतात. ते त्यांच्या विचारांवर खूप ठाम असतात. हे लोक न्यायप्रिय असतात. या जन्मतारखेचे लोक बचत करण्यातही पटाईत असतात आणि अनावश्यक खर्च टाळतात.
30 वर्षांनंतर चमकतं नशीब
मूलांक क्रमांक 8 शी संबंधित लोकांना भाग्य क्वचितच मिळतं, म्हणजे या लोकांना कष्टानेच सर्व काही मिळवावं लागतं. तसंच या लोकांचं नशीब 30 वर्षांनंतर उजळतं. त्याच वेळी हे लोक क्वचितच भौतिक सुखाचा आनंद घेतात. हे लोक साध्या राहणीमानावर जास्त विश्वास ठेवतात. या लोकांना काहीतरी खोलवर जाणून घ्यायचं असतं, तसेच हे लोक चांगले संशोधक असतात.
शुभ दिवस आणि करिअर-व्यवसायाबद्दल
अंकशास्त्रानुसार, ज्या लोकांचा मूलांक 8 आहे, असे लोक अभियांत्रिकी, कंपनीत नोकरी, प्रशासकीय आणि सरकारी क्षेत्रात चांगलं नाव कमावतात. तसंच जर आपण व्यवसायाबद्दल बोललो तर, हे लोक लोखंड, पेट्रोल, तेल, खनिजे आणि काळ्या गोष्टींशी संबंधित व्यवसायात चांगला नफा कमावतात. महिन्याच्या 8, 17 किंवा 26 तारखेला जन्मलेल्या लोकांसाठी हेच शुभ दिवस असतात. तसेच शुक्रवार आणि शनिवार हे त्यांचे शुभ दिवस आहेत.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:
Shani Margi: 2024 मध्ये 'या' राशींना बसणार शनीची झळ; चुकूनही करू नका 'हे' काम