Shani Margi 2024: नवीन वर्ष सुरू होण्यासाठी (New Year 2024) फक्त काही दिवस उरले आहेत. अशात, 2024 हे वर्ष नेमकं कसं असेल? हे जाणून घेण्याची लोकांच्या मनात उत्सुकता आहे. शनि (Shani) न्याय देवता असल्याने कर्मानुसार तो सर्वांना फळ देतो. तसेच, शनि सर्वात मंद गतीने चालतो आणि त्याच्या स्थितीतील बदलाचा परिणाम लोकांवर दीर्घकाळ राहतो. अशा परिस्थितीत, 2024 मध्ये शनीची स्थिती सर्व 12 राशीच्या लोकांच्या जीवनावर मोठा परिणाम पाडेल. ज्योतिष शास्त्रानुसार 2024 मध्ये शनि स्वतःच्या राशीत, म्हणजेच कुंभ राशीत असेल. तसेच, 5 राशी साडेसातीच्या सावटाखाली असतील. याबद्दल अधिक जाणून घेऊया.


'या' चुका करू नका


वाईट कर्म करणाऱ्यांना शनि शारीरिक, मानसिक आणि आर्थिक त्रास देतो. त्यांच्या जीवनात अशांतता, तणाव, रोग आणि नुकसान होण्याची शक्यता असते, त्यामुळे शनीची वाईट नजर असेल तेव्हा लोकांनी शनीला न आवडणारी कामं करू नये. उदाहरणार्थ, महिला, वृद्ध, असहाय्य, कामगार वर्गाचा छळ किंवा अपमान करू नका. वाईट संगत आणि मादक पदार्थांपासून दूर राहा. कोणाच्याही पैशावर वाईट नजर ठेवू नका. लबाडी आणि फसवणूक टाळा, अन्यथा शनि खूप त्रास देईल. 


2024 मध्ये शनि 'या' राशींवर ठेवेल वाईट नजर


कर्क: 2024 मध्ये कर्क राशीवर शनीचा प्रभाव राहील. येत्या वर्षात कर्क राशीच्या लोकांनी सावध राहावं. अन्यथा छोटीशी चूकही मोठ्या नुकसानाचं कारण ठरू शकते. येत्या वर्षात जोखमीचं काम करू नका. 


वृश्चिक: वृश्चिक राशीवरही 2024 मध्ये शनीची सावली असेल. येत्या वर्षात वृश्चिक राशीच्या लोकांनी वाहन चालवताना काळजी घ्यावी. घाईघाईत निर्णय घेऊ नका. मालमत्तेशी संबंधित आणि वाहनाच्या बाबतीत सावधगिरी बाळगा. 


मकर: मकर राशीच्या लोकांवर 2024 मध्ये शनीच्या साडेसातीचा प्रभाव राहील. या लोकांनी संकटांपासून वाचण्यासाठी वृद्ध आणि असहाय्य लोकांची सेवा करावी. दानधर्म करा. या काळात कोणाचीही मदत करण्यास नकार देऊ नका. 


कुंभ: कुंभ राशीचे लोक देखील 2024 मध्ये शनीच्या साडेसातीखाली राहतील. शनी कुंभ राशीत असल्याने शनीच्या साडेसातीचा प्रभाव कुंभ राशीच्या लोकांवर असेल, ज्यामुळे हे लोक काही वादात अडकू शकतात. संरक्षणासाठी शनि स्तोत्र, शनि चालीसा पाठ करा. कोणाशीही भांडण किंवा वैर करू नका.


मीन: मीन राशीच्या लोकांवर देखील 2024 मध्ये साडेसातीचा प्रभाव पडेल. अशा लोकांना अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. मीन राशीच्या लोकांना वर्षभर काळजी घेणं चांगलं. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा: 


Shaniwar Upay : शनीची वक्रदृष्टी टाळण्यासाठी करा 'या' गोष्टी; नांदेल सुख-समृद्धी