Numerology Of Mulank 8 : जून महिन्यात इंग्लंडमध्ये सुरु होणाऱ्या टेस्ट मॅचच्या सीरिजसाठी नुकताच भारतीय संघाचा नवीन कर्णधार बनवण्यात आला आहे. यासाठी शुभमन गिलची (Shubman Gill) निवड करण्यात आली आहे. अंकज्योतिष (Ank Shastra) शास्त्रानुसार, शुभमन गिलचा मूलाक 8 आहे. या मूलांकाच्या लोकांमध्ये लीडरशिप क्वालिटी दिसून येते. तसेच, मूलांक 8 चा नेमका स्वभाव कसा असतो ते जाणून घेऊयात. 


अंकज्योतिष शास्त्रानुसार, शुभमन गिलचा जन्मदिन 8 सप्टेंबर 1999 रोजी झाला. अंक ज्योतिष शास्त्रानुसार, ज्या लोकांचा जन्म 8, 17 आणि 26 तारखेला झाला आहे. अशा लोकांचा मूलांक 8 असतो. त्यामुळे शुभमन गिलचा मूलांक 8 आहे. 


लीडरशिप क्वालिटी असते 


या जन्मतारखेचे लोक फार महत्त्वाकांक्षी, मेहनती आणि आत्मविश्वासू असतात. अंकशास्त्रानुसार, यांच्यावर शनी ग्रहाचा जास्त प्रभाव  असतो त्यामुळे या लोकांमध्ये नेतृत्व क्षमता असते तसेच, हे लोक फार शिस्तप्रिय असतात. 


आत्मविश्वासू असतात


या जन्मतारखेच्या लोकांचा आत्मविश्वास फार चांगला आणि मजबूत असतो. तसेच, यांचा आपल्या निर्णयावर ठाम विश्वास असतो. आपल्या कार्याप्रती या जन्मतारखेचे लोक फार आत्मनिर्भर असतात. यामुळे त्यांना आयुष्यात येणाऱ्या कठीण परिस्थितीचा सामना करण्यासाठी आणि यश प्राप्त करण्यासाठी मदत मिळते. 


जबाबदार असतात


या जन्मतारखेचे लोक फार जबाबदार असतात. ते जे काही कार्य करतील त्याबद्दल ते स्वत: जबाबदार मानतात. तसेच, दिलेलं कार्य वेळेत पूर्ण करण्याचा यांचा प्रयत्न असतो.यांचा हाच स्वभाव यांना पुढे घेऊन जातो. 


संघर्ष आणि आव्हानं


यांचं आयुष्य संघर्षाने आणि आव्हानांनी भरलेलं असतं. कारण, या जन्मतारखेच्या लोकांवर शनि देवाचा विशेष प्रभाव असतो. त्यामुळे यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. मात्र, शनिदेवा प्रमाणेच हे लोक न्यायप्रिय असतात. त्यामुळे आलेल्या परिस्थितीचा ते सामना करण्यासाठी सज्ज असतात. 


प्रामाणिक आणि तत्वनिष्ठ 


या जन्मतारखेच्या लोकांना नेहमीच खऱ्या-खोट्यातला फरक कळतो. त्यामुळेच नेहमीच यांच्या प्रामाणिकपणाचं आणि तत्त्वनिष्ठेचं कौतुक केलं जातं. कोणत्याही परिस्थितीत हे आपल्या तत्त्वांशी तडजोड करत नाहीत. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  


हेही वाचा :                         


Astrology : आज बुधादित्य योगासह जुळून आले अनेक शुभ संयोग; कुंभसह 'या' 5 राशींवर देवी लक्ष्मी होणार प्रसन्न, होणार अचानक धनलाभ