Astrology Panchang Yog 25 May 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज 25 मे म्हणजेच आजचा दिवस रविवार. आज चंद्राने मेष राशीत प्रवेश केला आहे. यामुळे ऱाशी परिवर्तन योग जुळून आला आहे. त्याचबरोबर, सूर्य आणि बुध ग्रहाच्या दरम्यान बुधादित्य नावाचा शुभ योग (Yog) निर्माण झाला आहे. त्यामुळे आजचा दिवस फार खास आणि महत्त्वाचा असणार आहे. 

Continues below advertisement

वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा लाभ 5 राशींच्या लोकांना होणार आहे. या राशी नेमक्या कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात. 

मेष रास (Aries Horoscope)

मेष राशीसाठी आजचा दिवस फार शुभकारक असणार आहे. आज तुमचं व्यक्तिमत्व उठून दिसेल. तसेच, समाजातील नामवंत लोकांशी तुमची भेट होईल. देवी लक्ष्मीची तुमच्यावर विशेष कृपा असणार आहे. त्यामुळे तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ मिळेल. आज तुमच्या घरी पाहुणे येण्याची शक्यता आहे. आई-वडिलांच आशीर्वाद लाभेल. 

Continues below advertisement

वृषभ रास (Taurus Horoscope)

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस प्रगतीचा असणार आहे. तसेच, व्यवसायाशी संबंधित तुम्हाला चांगला लाभ मिळेल. कामाच्या ठिकाणी नवीन ऑर्डर्स तुम्हाला मिळतील. तसेच, आयात-निर्यातीचा व्यवसाय वाढेल. जी तुम्ही नियोजित कामे केलेली आहेत ती वेळीच पूर्ण होतील. त्यामुळे तुमची चिंता मिटेल. 

मिथुन रास (Gemini Horoscope)

मिथुन राशीसाठी आजचा दिवस फार खास असणार आहे. तसेच, तुमच्या आर्थिक समस्या आज थोड्या प्रमाणात दूर होतील. जर तुम्हाला नवीन वाहन खरेदी करायची असेल तर त्यासाठी आजचा दिवस शुभ आहे. मात्र, काही गोष्टींची काळजी घ्या. तसेच, मित्रांचा सहभाग तुमच्यासाठी फार मोलाचा ठरणार आहे. 

धनु रास (Sagittarius Horoscope)

धनु राशीसाठी आजचा दिवस भाग्याचा असणार आहे. आज तुमच्या व्यवसायात तुम्हाला चांगली प्रगती पाहायला मिळेल. तसेच, नवीन प्रोजेक्टवर काम सुरु करण्यासाठी आजचा दिवस फार शुभ असणार आहे. आज तुमचं मन प्रसन्न असेल. तुमच्या मनाप्रमाणे गोष्टी घडतील. 

कुंभ रास (Aquarius Horoscope)

कुंभ राशीसाठी आजचा दिवस फार लाभदायक असणार आहे. आज कामाच्या ठिकाणी तुम्हाला सहकाऱ्यांचा चांगला पाठिंबा मिळेल. तुमच्यातील साहस आज दिसून येईल. तसेच तुमचा आत्मविश्वास वाढेल. तुमच्या जोडीदाराबरोबर तुमचे जे काही वाद असतील ते वेळीच दूर करण्याचा प्रयत्न करा. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  

हेही वाचा : 

Horoscope Today 25 May 2025 : आज रविवारच्या दिवशी 3 राशी ठरणार भाग्यशाली; सूर्यदेवाच्या कृपेने होणार पैशांची बरसात, आजचे राशीभविष्य