Numerology Of Mulank 1 : ज्योतिष शास्त्राप्रमाणे अंक ज्योतिष (Numerology) शास्त्राला देखील विशेष महत्त्व देण्यात आलं आहे. ज्याप्रमाणे, ज्योतिष शास्त्रात राशीनुसार व्यक्तीचा स्वभाव ओळखता येतो. त्याप्रमाणेच, अंक ज्योतिष (Ank Shastra) शास्त्रातही व्यक्तीच्या जन्मतारखेवरुन त्या व्यक्तीचा स्वभाव कसा असेल? त्याचं व्यक्तिमत्व आणि विचारसरणी कशी असेल या संदर्भात सांगण्यात आलं आहे. 


अंकज्योतिष शास्त्रात व्यक्तीच्या जन्मतारखेचा जो मूलांक असतो त्यावरुन व्यक्तीचा स्वभाव ओळखता येतो. त्यानुसार आज आपण मूलांक 1 च्या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.


मूलांक 1 कोणाचा आहे?


ज्या व्यक्तीचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19 आणि 28 तारखेला झाला आहे. अशा लोकांचा मूलांक 1 असतो. मूलांक 1 चा स्वामी ग्रह सूर्य आहे. सूर्याला शक्तीचं प्रतीक मानलं जातं. 


कसा असतो यांचा स्वभाव?


मूलांक 1 असणारे लोक फारच प्रामाणिक असतात. कोणालाच यांच्याकडून धोका नसतो. तसचे, हे लोक कोणाचीही फसवणूक करत नाहीत. आपल्या व्यक्तिमत्त्वाने ते इतरांना प्रभावित करतात. तसेच, हे लोक प्रेमाच्या बाबतीत फारच प्रामाणिक असतात. आपल्या पार्टनरवर हे लोक नितांत प्रेम करतात. मात्र, काही काही गोष्टींत यांनाही राग येतो. आपल्या पालकांच्या प्रती यांना फार चिंता असते. तसेच, आपल्यातील नकारात्मक गोष्टी दूर करण्याचा हे अतोनात प्रयत्न करतात. 


शब्दाचे असतात पक्के 


या जन्मतारखेचे लोक आपली मैत्री प्रामाणिकपणे निभावतात. आपल्या मित्राला संकटाच्या वेळी एकटे सोडत नाहीत. तसेच, नेहमी अडचणीतून मार्ग काढण्याचा प्रयत्न करतात. यांचं वैशिष्ट्य म्हणजे हे लोक शब्दाचे पक्के असतात. परिस्थिती जरी बदलली तरी मात्र दिलेल्या शब्दाला ते नेहमीच जागतात. 


कसं असतं यांचं भविष्य? 


या जन्मतारखेचे लोक भविष्यात चांगली प्रगती करतात. एक यशस्वी आणि आदर्श बिझनेसमॅन होण्याची यांच्यात क्षमता असते. या जन्मतारखेच्या लोकांची आर्थिक स्थिती चांगली असते. तसेच, यांचा नेहमीच बॅकअप प्लॅन तयार असतो. त्यामुळे समोर आलेल्या संकटांचा हे अगदी धैर्याने सामना करतात. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


हेही वाचा :                                       


Narak Chaturdashi 2024 : नरक चतुर्दशीच्या दिवशी काय करावं आणि काय करु नये? जाणून घ्या अभ्यंगस्नानाची वेळ