Narak Chaturdashi 2024 : हिंदू धर्मग्रंथानुसार, दिवाळीला सुरुवात झाली आहे. त्यानुसार उद्याचा दिवस हा नरक चतुर्दशीचा (Narak Chaturdashi) आहे. हिंदू शास्त्राप्रमाणे, नरक चतुर्दशीपासून दिवाळीला (Diwali 2024) सुरुवात होते. या दिवसाला 'पहिली अंघोळ' असंही म्हणतात. नरक चतुर्दशीच्या दिवशी देवी लक्ष्मी, यमराज, भगवान श्रीकृष्ण, काली माता, भगवान शंकर, भगवान हनुमान आणि भगवान विष्णू यांच्या वामन स्वरुपाची पूजा केली जाते. दरवर्षी अश्विन महिन्यातील कृष्ण पक्ष तिथीला नरक चतुर्दशी साजरी करतात. यालाच छोटी दिवाळी असंही म्हणतात.
नरक चतुर्दशीच्या दिवशी काय करावं?
- नरक चतुर्दशीच्या दिवशी पहाटे सूर्योदयापूर्वी उठून स्नान करावे.
- तसेच, 14 दिव्यांची आरास लावावी.
- या शुभ दिनी भगवान विष्णूसह, कृष्ण आणि देवी लक्ष्मीची पूजा करावी.
- या दिवशी पहाटे लवकर उठून उटण्याने स्नान करणं शुभ मानलं जातं.
- या दिवशी देवी-देवतांच्या मूर्ती घराच्या ईशान्य कोपर्यात स्थापित कराव्या आणि त्यांची यथायोग्य पूजा करावी.
नरक चतुर्दशीच्या दिवशी काय करु नये?
- नरक चतुर्दशीच्या दिवशी मांसाहारी पदार्थ तसेच तामसिक पदार्थांचं भोजन करू नये.
- तसेच, या दिवशी केस आणि नखं कापण्यास सक्त मनाई आहे.
- या दिवशी फार उशिरापर्यंत झोपू नये.
- तसेच, या शुभ दिनी कोणत्याही मुक्या प्राण्याची हत्या करु नये.
- तसेच, मुक्या प्राण्यांना कोणत्याही प्रकारे त्रास देऊ नये.
- या दिवशी मारामारी करु नये किंवा अपशब्द काढू नयेत.
- नरक चतुर्दशीच्या दिवशी मीठ, तेल आणि खोट्या वस्तूंचं दान करणं शुभ मानलं जात नाही.
अभ्यंगस्नानाची वेळ
अभ्यंगस्नानाची वेळ 31 ऑक्टोबर 2024 - सकाळी 05:28 ते 06:41 वाजेपर्यंत असणार आहे.
नरक चतुर्दशी तिथी (Narak Chaturdashi 2024 Tithi)
पंचांगानुसार, अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथीला नरक चतुर्दशी साजरी करण्यात येणार आहे. या दिवशी 30 ऑक्टोबर 2024 ला बुधवारी दुपारी 01:15 पासून होणार आहे. तर दुसऱ्या दिवशी 31 ऑक्टोबर रोजी दुपारी 3:52 वाजता चतुर्दशी तिथी संपणार आहे..
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :