Numerology : अंकशास्त्रात जन्मतारखेवरुन भविष्य सांगितलं जातं. एखाद्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व, स्वभाव आणि भविष्य त्याच्या जन्मतारखेवरून कळू शकतं. एखाद्या व्यक्तीच्या जन्मतारखेवरुन (Numerology) त्या व्यक्तीबद्दलच्या अनेक गोष्टी समजतात. तर आज आपण 1 मूलांकाच्या जन्मतारखांबद्दल बोलणार आहेत, या मुलांकाचा स्वामी सूर्य आहे. 


अंकशास्त्रात, प्रत्येक जन्मतारखेच्या (Numerology) लोकांबद्दल काही विशेष गुण सांगितले आहेत. यानुसार काही मूलांकांच्या लोकांमध्ये जन्मतः अधिकारी होण्याचे गुण असतात. या मूलांकाच्या बहुतेक लोकांना सरकारी नोकऱ्या मिळतात. या मूलांक संख्येबद्दल जाणून घेऊया.


या जन्मतारखेच्या लोकांना मिळते सरकारी नोकरी


अंकशास्त्रात मूलांक 1 असलेल्या लोकांना खूप खास समजलं जातं. कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 1 असतो. या मूलांकाचा स्वामी सूर्य आहे, ज्याला ग्रहांचा राजा म्हणतात. या मूलांकाच्या लोकांवर सूर्याचा विशेष प्रभाव असतो. या लोकांमध्ये जन्मजात अप्रतिम नेतृत्व क्षमता असते. 


अतिशय धाडसी असतात हे लोक


कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 तारखेला जन्मलेले लोक त्यांच्या मेहनतीने आणि क्षमतेने सरकारी नोकरी मिळवण्यात यशस्वी होतात आणि त्यांच्या टीमचं नेतृत्व देखील करतात. हे लोक धाडसी असतात आणि धोका पत्करणारे असतात. हे लोक अतिशय शिस्तबद्ध असतात आणि या गुणामुळे ते इतरांपेक्षा वेगळे दिसतात.


प्रत्येक क्षेत्रात मिळवतात यश


या मूलांकाच्या लोकांमध्ये सरकारी अधिकारी बनण्याची क्षमता असली तरी, या मूलांकाचे काही लोक चांगले नेतेही बनतात. याशिवाय, हे लोक इलेक्ट्रॉनिक, फॉरेन कंपनी, संशोधन कार्य, विद्युत संबंधित व्यवसाय आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये ते काम करतात आणि तिथे प्रगती साधतात. हे लोक कला, संगीत, लेखन आणि डिझाईन यांसारख्या क्षेत्रातही यश मिळवतात.


इतर लोक यांना प्रेरणा मानतात


मूलांक 1 असलेले लोक त्यांच्या जीवनात अनेक आव्हानांना सामोरे जातात, परंतु त्यांच्या दृढनिश्चयाने आणि आत्मविश्वासाने त्यावर मात करतात. या मूलांकाचे लोक इतरांसाठी प्रेरणास्थान बनतात आणि जगात सकारात्मक बदल घडवून आणतात.


गर्विष्ठ आणि हट्टी देखील असतात या जन्मतारखेचे लोक


मूलांक क्रमांक 1 चे लोक कधीकधी गर्विष्ठ आणि हट्टी देखील होतात. हे लोक काही निर्णय खूप घाईत घेतात. हे लोक झटपट बदलासाठी तयार नसतात. हे लोक इतरांवर टीका करू शकतात आणि या लोकांना एकटेपणाची भीती वाटते.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा :


Numerology : खूपच लाजाळू असतात 'या' जन्मतारखेची मुलं; यांना मनातील भावनाही धड करता येत नाही व्यक्त