Numerology Of Mulank 4 : अंकशास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22 किंवा 31 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 4 असतो. अंकशास्त्रात (Ank Shastra) प्रत्येक मूलांकाबद्दल काही खास गोष्टी सांगितल्या जातात. यामध्ये मूलांक 4 असलेल्या लोकांबद्दल देखील काही खास गोष्टी सांगण्यात आल्या आहेत.


मूलांक 4 असलेल्या लोकांचं व्यक्तिमत्व खूप खास असतं, त्यांचा स्वभाव एकदम मजेशीर असतो. 4, 13, 22 किंवा 31 जन्मतारखेच्या व्यक्ती कधी कसलं टेन्शन घेत नाहीत. त्यांचा अधिपती ग्रह राहू आहे. या व्यक्ती नेहमी स्वत:च्या तंद्रीतच असतात, त्या कुणाच्या अध्यात-मध्यात जास्त पडत नाहीत. प्रेमविवाहावर त्यांचा विश्वास असतो. या व्यक्तींबद्दल आणखी काही खास गोष्टी जाणून घेऊया.


बिनधास्त आणि मजेशीर असतो यांचा स्वभाव


अंकशास्त्रानुसार, मूलांक 4 चे लोक स्वभावाने एकदम बिनधास्त असतात, ते कशाचीही काळजी करत नाहीत. ते एकदम मस्त मजेत असतात आणि त्यांचा स्वभाव एकदम विनोदी असतो. तसेच, हे लोक वर्तमानात जगतात. त्यांचा स्वभाव थोडासा संशयास्पद, म्हणजेच शकिन देखील असू शकतो. हे लोक वक्तशीर असतात.


चारचौघात उठ-बस यांना आवडते


4, 13, 22 किंवा 31 जन्मतारखेचे लोक आयुष्यात पुढे जाऊन इतकं मोठं काम करतात की सगळेच त्यांना पाहून थक्क होतात. त्यांना लोकांमध्ये बसल्यावर आनंद वाटतो, चारचौघात बसणं यांना आवडतं. या लोकांना प्रवासाची आवड असते. तसेच, या लोकांना सुखी जीवन जगणं आवडतं.


अशी असते लव्ह लाईफ


मूलांक 4 चे लोक दिसायला आकर्षक असतात, त्यामुळे त्यांचे अनेक अफेअर असतात. त्यांचा प्रेमविवाहावर विश्वास असते. ते लव्ह लाईफच्या बाबतीत खूप निवडक असतात. ते इतरांवर अगदी सहजपणे प्रभाव टाकू शकतात. तसेच, हे लोक संभाषणात प्रभावी असतात. हे लोक त्यांच्या कुटुंबावर प्रेम करतात. तसेच या लोकांना फ्रेंड सर्कलमध्ये विशेष स्थान मिळतं.


प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घेतात


हे लोक अतिशय विचारपूर्वक निर्णय घेतात, यात त्यांचा बराच वेळही जातो. या कोंडीत अनेक वेळा त्यांच्या वाटेला आलेली संधीही त्यांच्या हातून निसटून जाते. मूलांक 4 असलेल्या लोकांची आर्थिक स्थिती चांगली असते. हे लोक आपला पैसा खूप विचारपूर्वक खर्च करतात. या मूलांकाच्या लोकांना व्यवसायात भरपूर फायदा होतो. या लोकांच्या आयुष्यात कधीही पैशांची कमतरता नसते.


या क्षेत्रात मिळवतात यश


अंकशास्त्रानुसार, मूलांक 4 असलेले लोक चांगले व्यावसायिक, इंजिनियर, कंत्राटदार, वैज्ञानिक, उद्योगपती, नेते, डिझाईनर, डॉक्टर, वकील, दारू व्यापारी आणि नेते बनू शकतात. हे लोक त्यांच्या क्षेत्रात मोठे बदल घडवून आणू शकतात. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा: 


Numerology : अत्यंत फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार