Numerology Mulank 3 : अंकशास्त्रात (Ank Shastra) प्रत्येक मूलांकाबद्दल काही खास गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. यामध्ये मूलांक 3 असलेल्या लोकांची देखील काही खास वैशिष्ट्ये सांगण्यात आली आहेत. अंकशास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21 किंवा 30 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 3 असतो.


मूलांक 3 चे लोक अत्यंत जिद्दी आणि महत्त्वाकांक्षी असतात. मूलांक 2 चा शासक ग्रह बृहस्पति आहे, जो सर्व ग्रहांचा गुरू मानला जातो. 3, 12, 21 किंवा 30 जन्मतारखेचे लोक स्वतंत्र विचाराचे असतात. हवं ते मिळवण्याची जिद्द त्यांच्यात असते. या मूलांकाचे लोक धैर्यवान, शूर आणि सामर्थ्यवान असतात. मूलांक 3 शी संबंधित आणखी काही खास गोष्टी जाणून घेऊया.


भयंकर हट्टी असतात या जन्मतारखेचे लोक


कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21 किंवा 30 तारखेला जन्मलेले लोक हे स्वभावाने प्रचंड हट्टी असतात. त्यांना एखादी गोष्ट हवी असेल तर ते ती मिळवूनच राहतात. जोपर्यंत ती गोष्ट मिळत नाही तोपर्यंत यांना शांत बसवत नाही आणि ते अस्वस्थ होतात. त्यांना अपेक्षित गोष्टी घडल्या नाही अथवा मिळाल्या नाही तर त्यांची चिडचिड होते.


कुणासमोर झुकणं यांना आवडत नाही


मूलांक 3 असलेले लोक खूप स्वाभिमानी असतात. या लोकांना कुणासमोर झुकायला आवडत नाही. या मूलांकाच्या लोकांना कोणाचेही उपकार नको असतात किंवा त्यांना त्यांच्या कामात कोणाचाही अनावश्यक हस्तक्षेप आवडत नाही.


अत्यंत महत्वाकांक्षी असतात हे लोक


मूलांक 3 चे खूप महत्वाकांक्षी असतात, त्यांची मोठी स्वप्नं असतात. त्यांच्या ध्येयाप्रती ते एकनिष्ठ असतात. मोठ्या मोठ्या गोष्टी साध्य करण्याची हिंमत त्यांच्यात असते. आपल्या प्रयत्नांच्या जोरावर ते हवं ते सर्व साध्य करतात. या मूलांकाचे लोक त्यांच्या स्वातंत्र्याशी कधीही तडजोड करत नाहीत. यासोबतच मूलांक 3 चे लोक हे धैर्यवान, शूर, सामर्थ्यवान, संघर्ष करणारे आणि कधीही हार न मानणारे असतात. हे लोक खूप महत्वाकांक्षी असण्यासोबतच चांगले विचार करणारे देखील असतात.


वाचन आणि लेखनात असतात हुशार


मूलांक 3 असलेले लोक उच्च शिक्षण घेतात. हे लोक खूप अभ्यासू असतात, वाचन आणि लेखनात ते खूप हुशार असतात. या लोकांना विज्ञान आणि साहित्यात प्रचंड रस असतो. हे लोक अभ्यासात यशस्वी होतात. मात्र, या लोकांची आर्थिक स्थिती फारशी चांगली नसते. अनेकदा या लोकांना घरून आर्थिक मदत घ्यावी लागते. वाढत्या वयाबरोबर त्यांची आर्थिक स्थिती सुधारू लागते. 


वैवाहिक जीवन राहते आनंदी


या लोकांचे मित्रसंख्या मोठी असतो. या लोकांचे प्रेमसंबंध टिकत नाहीत, परंतु त्यांचे वैवाहिक जीवन आनंदी राहते. कधीकधी त्यांची एकापेक्षा जास्त लग्नं होण्याची शक्यता असते. त्यांना त्यांच्या पहिल्या लग्नाचा नेहमीच त्रास होतो.


या क्षेत्रात करतात प्रगती


3, 12, 21 किंवा 30 तारखेला जन्मलेले त्यांच्या कामात निष्णात असतात. ते सैन्य आणि पोलीस, प्रशासकीय अधिकारी, सचिव, नेते, बँकांचे अधिकारी आणि धार्मिक साधू इत्यादी बनतात. घोडेस्वारी आणि नेमबाजीचा शौक त्यांना असतो.  सर्चव क्षेत्रात ते यशस्वी होतात.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा: 


Numerology : अत्यंत साधेभोळे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; कोणाच्याही बोलण्यात पटकन फसतात, यांचा लोक नेहमीच घेतात गैरफायदा