Numerology: आपण ज्येष्ठ व्यक्तीकडून नेहमी ऐकतो की, आयुष्यात कोणतीही गोष्ट विचारपूर्वक केली पाहिजे. मग ती कोणतीही असो. आणि लग्नासारखा मोठा निर्णय तर अत्यंत विचारपूर्वकच केला पाहिजे. हिंदू धर्मात लग्नाला विशेष महत्त्व आहे, ज्यामध्ये केवळ दोन लोकच नाही तर त्यांचे संपूर्ण कुटुंब सामील होते. लग्न करण्यापूर्वी पालक वधू-वरांच्या कुंडली जुळवली जाते. गुणमिलन झाले तरच लग्न केले जाते. गुण मिळाल्यावर पालकांना आपल्या मुलांचे लग्न दीर्घकाळ टिकेल अशी आशा असते. मात्र काही वेळेस या गोष्टी न पाहता लग्न केले जाते, तेव्हा अनेकदा अडचणी, जोडीदारांमध्ये वाद होतात. म्हणून वैवाहिक जीवन सुखी असावे यासाठी अंकशास्त्रात काही महत्त्वाच्या टिप्स दिल्या आहेत, त्या जाणून घ्या.
ज्योतिषशास्त्रात जन्मतारखेला महत्त्व
ज्योतिषशास्त्रात जन्मतारखेला महत्त्व दिले जाते, तर अंकशास्त्रात जन्मतारखेला खूप महत्त्व असते. मूलांक म्हणजेच जन्मतारीख द्वारे प्रत्येक व्यक्तीचे भविष्य, स्वभाव आणि व्यक्तिमत्व इत्यादींबद्दल माहिती मिळू शकते. कोणत्या व्यक्तीसाठी कोणती जन्मतारीख चांगली राहील याचीही माहिती मिळू शकते. आज अंकशास्त्राच्या मदतीने आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, कोणत्या तारखेला जन्मलेल्या व्यक्तीने कोणत्या जन्मतारखेच्या लोकांशी लग्न करू नये. आणि लग्न झाले तर ते आयुष्यभर तणावात राहतात. दररोज जोडप्यांमध्ये भांडणे होतात, ज्यामुळे त्यांच्या वैवाहिक जीवनात कधीही सुख-शांती येत नाही.
मूलांक 1
ज्या लोकांची जन्मतारीख 1,10,19 किंवा 28 आहे, त्यांनी ज्यांची जन्मतारीख 8,17 आणि 26 आहे अशा व्यक्तीशी लग्न करू नये.
मूलांक 2
जर तुमचा जन्म 2, 11, 20 किंवा 29 तारखेला झाला असेल तर 8, 17 आणि 26 तारखेला जन्मलेल्या लोकांशी लग्न करणे तुमच्यासाठी योग्य ठरणार नाही.
मूलांक 3
जर तुमची जन्मतारीख 3,12,21 किंवा 30 असेल, तर तुम्ही अशा व्यक्तीशी लग्न न करण्याचा प्रयत्न केला पाहिजे ज्याची जन्मतारीख 6,15 आणि 24 आहे.
मूलांक 4
ज्या लोकांची जन्मतारीख 4, 13 किंवा 22 आहे, त्यांनी 9, 18 आणि 27 रोजी जन्मलेल्या लोकांशी लग्न करणे टाळावे.
मूलांक 5
जर तुमची जन्मतारीख 5,14 किंवा 23 असेल, तर 9,18 आणि 27 रोजी जन्मलेले लोक तुमच्या लग्नासाठी योग्य नाहीत.
मूलांक 6
जर तुमची जन्मतारीख 6,15 किंवा 24 असेल, तर 3,12,21 आणि 30 ला जन्मलेल्या व्यक्तीशी लग्न न करण्याचा प्रयत्न करा.
मूलांक 7
ज्या लोकांची जन्मतारीख 7,16 किंवा 25 आहे, त्यांनी 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9 तारखेला जन्मलेल्या लोकांशी लग्न करणे टाळावे.
मूलांक 8
जर तुमची जन्मतारीख 8, 17 किंवा 26 असेल, तर तुम्हाला 1, 10, 19 आणि 28 तारखेला जन्मलेल्या लोकांशी लग्न करणे योग्य ठरणार नाही.
मूलांक 9
जर तुमची जन्मतारीख 9, 18 किंवा 27 असेल, तर 5, 14 आणि 23 तारखेला जन्मलेल्या लोकांसोबत सात फेरे घेणे तुमच्यासाठी शुभ ठरणार नाही.
हेही वाचा>>>
Numerology: सासरहून आदर, पैसा मिळतो! 'या' जन्मतारखेच्या लोकांचे प्रेम संबंध कायम राहत नाहीत, अंकशास्त्रात म्हटलंय..
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )