Numerology: आपण अनेकदा पाहतो, काही लोक पैशाच्या बाबतील समाधानी असतात, मात्र काहीजण त्यांचे प्रेमसंबध आणि वैवाहिक जीवनाबाबत अनेकदा कमनशिबी असतात.  तसं पाहायला गेलं तर अंकशास्त्रानुसार, प्रत्येक जन्मतारखेची काही खासियत असते. आज आपण अशा एका जन्मतारीख तसेच मूलांकाबद्दल बोलणार आहोत, जे लोक खूप धाडसी, शक्तीशाली, कष्टाळू असतात, संकटांनाही हार मानत नाहीत. या लोकांची क्षमता आश्चर्यकारक असते. हे लोक खूप महत्वाकांक्षी असतात आणि एकदा का त्यांनी काही करायचे ठरवले की ते ते केल्यावरच मानतात. मात्र वैवाहिक जीवनात अनेकदा कमनशिबी ठरतात, अंकशास्त्रानुसार जाणून घेऊया..


जर तुमचा जन्म 'या' जन्मतारखेला झाला असेल तर...


अंकशास्त्रात मूलांक 3 ला विशेष महत्त्व आहे. जर तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21 किंवा 30 तारखेला झाला असेल, तर त्या तारखांना जन्मलेल्या लोकांचा मूलांक क्रमांक 3 असेल. मूलांक 3 चा शासक ग्रह गुरू आहे, जो सर्व ग्रहांचा गुरू आहे. या अंकाचे लोक खूप स्वाभिमानी असतात. या मूलांकाचे लोक मेहनती आणि खूप महत्त्वाकांक्षी असतात. जाणून घेऊया त्यांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल...


झुकेगा नही साला..!


अंकशास्त्रानुसार, मूलांक 3 असलेल्या लोकांना कोणाच्याही समोर झुकणे आवडत नाही. या लोकांना कोणाच्याही मर्जीने जगायला आवडत नाही. त्यांना त्यांच्या आयुष्यात कोणाचाही अनावश्यक हस्तक्षेप आवडत नाही. त्यांना त्यांच्या स्वातंत्र्याशी तडजोड करणे आवडत नाही. 3 क्रमांक असलेले लोक चांगले विचार करणारे, दूरदर्शी आहेत आणि संभाव्य घटनांचा अंदाज लावू शकतात. या मूलांकाचे लोक उच्च स्तरीय शिक्षण घेतात. त्यांना वाचन आणि लेखनात खूप रस असतो. या लोकांना घोडेस्वारी आणि शूटिंगचाही शौक असतो. वाढत्या वयाबरोबर त्यांची आर्थिक स्थिती सुधारते.


प्रेमसंबंध अनेकदा टिकत नाही


अंकशास्त्रानुसार, जर आपण लग्न किंवा प्रेम संबंधांबद्दल बोललो तर, मूलांक 3 असलेल्या लोकांचे अनेकदा प्रेम संबंध टिकत नाहीत, परंतु सामान्यतः त्यांचे वैवाहिक जीवन आनंदी राहते. या मूलांकाच्या काही लोकांचे कधीकधी एकापेक्षा जास्त विवाह होतात, त्यापैकी पहिल्या लग्नामुळे नेहमीच वेदना होतात. हे लोक विलासी स्वभावाचे असतात पण त्यांना त्यांच्या मान-सन्मानाची काळजी असते. धार्मिक कार्यात आंतरिक रस आवश्यकतेपेक्षा जास्त असतो.


भाग्यवान संख्या आणि रंग


अंकशास्त्रानुसार, मूलांक 3 असलेल्या लोकांसाठी 3, 6 आणि 9 हे भाग्यवान अंक आहेत. गुरुवार, शुक्रवार आणि मंगळवार हे शुभ दिवस आहेत. रंगांबद्दल बोलायचे झाल्यास, जांभळा, निळा, लाल आणि गुलाबी रंग क्रमांक 3 साठी योग्य आहेत.


हेही वाचा>>>


Navpancham Rajyog: टेन्शन सोडा! शनि-मंगळाचा शक्तिशाली राजयोग बनतोय, 'या' 3 राशीचे लोक राजासारखं जीवन जगणार, ज्योतिषशास्त्रात म्हटलंय..


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )