Numerology: तुमच्या पत्रिकेत राहू-केतू आहे, असे ऐकताच भल्याभल्यांना घाम फुटतो. ज्योतिषशास्त्रात राहू आणि केतू या छाया ग्रहांना कोणत्याही राशीचे स्वामीत्व नसते. वैदिक ज्योतिषशास्त्रात राहू ग्रहाला क्रूर ग्रह मानले जाते. राहू ग्रहाला कठोर भाषण, जुगार, वाईट कृत्ये, त्वचारोग, धार्मिक यात्रा इत्यादींचे कारण मानले जाते. ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रातही, प्रत्येक जन्मतारखेचा स्वामी ग्रह असतो. राहूलाही जन्मतारखेचे स्वामीत्व असते. अंकशास्त्रानुसार आज आम्ही अशा जन्मतारखेच्या लोकांबद्दल सांगणार आहोत, ज्यांच्यावर राहू नेहमीच दयाळू असतो. त्यांना अचानक संपत्ती आणि प्रसिद्धी देऊन आश्चर्यचकित करतो.
राहूची कृपा असल्यास कोट्यवधींचे मालक बनतात...
क्रूर ग्रह राहूचे नाव ऐकूनच लोक घाबरतात. तर राहूची कृपा ही राजकारण, वैद्यकीय, अभियांत्रिकी यासारख्या क्षेत्रात जन्मलेल्यांना प्रचंड प्रसिद्धी देते. ते कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेचे मालक बनतात. अंकशास्त्रानुसार, विशिष्ट जन्म क्रमांकाच्या लोकांवर राहूचा विशेष प्रभाव पडतो.
'या' जन्मतारखेच्या लोकांवर राहू नेहमीच दयाळू असतो.
अंकशास्त्रानुसार राहू हा क्रमांक 4 चा स्वामी आहे. ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22 किंवा 31 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 4 असतो.
राहूचा मोठा प्रभाव
अंकशास्त्रानुसार राहू ग्रहाचा मूलांक 4 असलेल्या लोकांच्या करिअर, आर्थिक स्थिती, स्वभाव, वर्तन, वैवाहिक जीवन इत्यादींवर परिणाम होतो. काही प्रकरणांमध्ये तो शुभ परिणाम देतो आणि काही प्रकरणांमध्ये अशुभ.
हुशार, परंतु हट्टी
अंकशास्त्रानुसार, मूलांक 4 असलेले लोक थोडे हट्टी, धूर्त, हुशार आणि राजनैतिक असतात. ते कधीकधी वाईट सवयींमध्ये पडून त्यांचे जीवन उध्वस्त करतात.
प्रत्येक परिस्थितीत यश मिळवतात
अंकशास्त्रानुसार, मूलांक 4 असलेले लोक मेहनती असतात. तसेच हुशार आणि व्यावहारिक असतात. असे म्हणता येईल की हे लोक साम, दाम, दंड, भेद या धोरणाचा अवलंब करून प्रत्येक परिस्थितीत यश मिळवतात.
कोट्यवधींचे मालक बनतात..
अंकशास्त्रानुसार, मूलांक 4 असलेले लोक चांगले व्यापारी, राजकारणी, वाहतूकदार, अभियंते, पायलट, डिझायनर, डॉक्टर, वकील, शिक्षणतज्ज्ञ आणि नेते बनतात. ते या क्षेत्रात खूप नाव कमावतात. यासोबतच ते कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेचे मालक देखील बनतात.
हेही वाचा :
Numerology: गरिबीत जन्म असूनही फरक पडत नाही! 'या' जन्मतारखेचे लोक 35 वयानंतर कोट्याधीशच बनतात, ज्यांचा स्वामी शनिदेव, त्यांना कशाची भीती..
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)