अंकशास्त्र (Numerology) देखील ज्योतिषशास्त्राप्रमाणे एखाद्या व्यक्तीच्या भविष्याबद्दल सांगते. अंकशास्त्रात व्यक्तीच्या जन्मतारखेच्या आधारे मुलांक काढला जातो आणि भविष्याची मांडणी केली जाते. ज्योतिषशास्त्राप्रमाणे अंकशास्त्रही महत्त्वाचं आहे, यात गणिताचे नियम वापरुन तुमच्या भविष्याबद्दल सांगितलं जातं.


मुलांक ही जन्मतारीख असते. जर तुमचा जन्म 7 तारखेला झाला असेल तर तुमचा मूलांक 7 असेल. परंतु जर तुमचा जन्म 17 किंवा 26 किंवा अशाच दोन सांख्यिक तारखेला झाला असेल, तर तुमचा मुलांक 1+7 = 8, 2+6 = 8 असा काढला जातो. जर एखाद्या व्यक्तीची जन्मतारीख 29 असेल, तर 2+9 = 11, 1+1 = 2 असेल, तर व्यक्तीचा मुलांक 2 असेल.


आता तुम्हाला तुमचा मुलांक तर मिळालाच असेल, याद्वारे तुमचा आजचा दिवस कसा जाईल? याबाबत जाणून घेऊया.


मूलांक 1


ज्यांचा जन्म 1,10, 19, 28 तारखेचा असतो, त्यांचा मूलांक 1 असतो. तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल, तर आता तुम्ही ती तयारी अधिक समर्पणाने कराल आणि तुमच्या तयारीला गती द्याल. तुमच्या अभ्यासात काही अडथळे येतील, पण तुमची मेहनत ते अडथळे दूर करेल आणि तुम्ही यशस्वी व्हाल. व्यावसायिकांना त्यांच्या व्यवसायाचा विस्तार करता येईल. उत्पन्न वाढेल.


मूलांक 2


कोणत्याही महिन्याच्या 2,11, 20, 29 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 2 असतो. आज तुम्ही थोडा वेगळा विचार कराल. योग्य विचार येत असतानाच ते कुठेतरी नकारात्मकही होतात, हे विसरू नका. आज तुमचे काम पूर्ण होईल. मुलांच्या आरोग्याची काळजी घ्या. खर्च वाढतील. व्यावसायिक लोकांना व्यवसायात एखादा करार निश्चित होऊ शकतो.


मूलांक 3


कोणत्याही महिन्याच्या 3,12, 21, 30 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 3 असतो. तुम्हाला तुमच्या कामात अडथळे येत असल्याने त्यांना त्रास होऊ शकतो, पण याबाबत काळजी करू नये. तुम्हाला संयम राखावा लागेल. संयम आणि शांत मनाने काम करण्याचा प्रयत्न करावा लागेल. धार्मिक कार्यात व्यस्त राहाल. व्यवसायात तुम्हाला फायदा होईल.


मूलांक 4


कोणत्याही महिन्याच्या 4,13, 22, 31 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 4 असतो. आज मूलांक 4 असणारे लोक खूप आनंदी राहतील. काही गोष्टींबाबत तुम्ही तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकत नाही, परंतु तुम्हाला तुमच्या भावना नियंत्रित कराव्या लागतील. तुमच्या आरोग्याबाबत सतर्क राहा आणि कुटुंबात एकत्र राहा. आज गोड खाण्यात रस वाढेल.


मूलांक 5


कोणत्याही महिन्याच्या 5,14, 23 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 5 असतो. नोकरीत बढतीची शक्यता आहे. तुमचे वरिष्ठ अधिकारी तुमच्यावर खुश आहेत, त्यामुळे तुमच्या कामाचे कौतुक होईल. यामुळे तुमचा पगार वाढेल आणि तुमचे उत्पन्न चांगले होईल. नोकरीत बदली होण्याचीही शक्यता आहे.


मूलांक 6


कोणत्याही महिन्याच्या 6,15, 24 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 6 असतो. या लोकांसाठी आज थोडेसे सकारात्मक-नकारात्मक वातावरण असेल. पण धीर सोडू नका. व्यवसायात अडचणी येतील, पण संयम ठेवावा लागेल. विनाकारण कोणाशीही वाद घालू नये.


मूलांक 7 


कोणत्याही महिन्याच्या 7,16, 25 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 7 असतो. आज या लोकांना त्रास होऊ शकतो. आईच्या आरोग्याबाबत सतर्क राहा. उत्पन्न वाढेल. मित्राच्या मदतीने तुम्हाला नोकरीच्या संधी मिळू शकतात.


मूलांक 8


कोणत्याही महिन्याच्या 8,17, 26 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 8 असतो. मनात निराशा आणि असंतोष राहील. वाणीच्या प्रभावामुळे व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. कपड्यांवर खर्च वाढेल. काही वडिलोपार्जित मालमत्तेतून पैसे मिळतील.


मूलांक 9


कोणत्याही महिन्याच्या 9,18, 27 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 9 असतो. अनावश्यक राग टाळा. शैक्षणिक कार्यात यश मिळेल. परदेशात जाण्याची संधीही मिळू शकते. तुम्हाला सरकारकडूनही मदत मिळू शकते. मन प्रसन्न राहील. पूर्ण आत्मविश्वास असेल, पण स्वतःवर नियंत्रण ठेवा.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा : 


Shani Dev: नववर्ष 2024 च्या 'या' महिन्यापर्यंत 4 राशींना सुखाचे दिवस; शनिदेवाची राहणार कृपा