Capricorn Horoscope Today 29 November 2023 : मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस (Horoscope Today) चांगला राहील. नोकरदार लोकांसाठी दिवस खूप छान राहील. नोकरीत प्रमोशन मिळू शकते. तुमचे अधिकारी तुमच्या कामावर खूश असतील आणि तुमच्या नोकरीत तुमचा पगार वाढेल. तुम्हाला थोडे नुकसानही सहन करावे लागू शकते. तुमच्या कुटुंबात काही शुभ कार्यक्रम आयोजित केले जाऊ शकतात, ज्यामुळे तुमच्या मनाला खूप शांती मिळेल.  


जर तुम्ही आयात-निर्यात व्यवसाय करत असाल तर तुम्ही तुमच्या व्यवसायात थोडे सावध राहा. तुमचे नुकसान देखील होऊ शकते. जर तुम्ही भागीदारीत व्यवसाय करत असाल तर तुम्ही तुमच्या जोडीदाराबाबतही थोडी सावधानता बाळगली पाहिजे. तुम्ही तुमच्या कुटुंबीयांबरोबर धार्मिक सहलीलाही जाऊ शकता. जिथे तुमच्या मनाला खूप शांती मिळेल आणि तुमच्या कुटुंबातील मुलेही तिथे फिरताना खूप आनंदी होतील. 


वैवाहिक जीवनात वाणीत गोडवा


नोकरीत कोणताही निर्णय घेताना काळजीपूर्वक घ्या. नोकरी बदलण्यापूर्वी तुमच्या कुटुंबातील सदस्यांशी चर्चा करा. वैवाहिक जीवनात वाणीत गोडवा ठेवा. व्यवसाय करणारे लोक कोणताही नवीन व्यवसाय करण्याची योजना आखतील. यामध्ये तुमचे भाऊ तुम्हाला मदत करु शकतील. नोकरदार व्यक्तीने कामाव्यतिरिक्त इतर कोणत्याच गोष्टीत लक्ष घालू नका.


कौटुंबिक जीवनाबद्दल बोलायचे तर मकर राशीच्या लोकांचा दिवस मध्यम फलदायी राहील. कुटुंबात एखाद्या गोष्टीवरुन वादाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. घरातील शांततेसाठी गोष्टींकडे दुर्लक्ष करुन पुढे जाणेच फायद्याचे ठरेल. संध्याकाळचा वेळ मित्रांसोबत मजेत घालवा, यामुळे तुमच्या मनाला शांती मिळेल. घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या तब्येतीची काळजी घ्या. तसेच, शारीरिकदृष्ट्या योगसाधनेला महत्त्व द्या. 


आज मकर राशीचे आरोग्य 


मकर राशीच्या लोकांना आज बदलत्या हवामानामुळे ताप, सर्दी, खोकला यांसारखी लक्षणं जाणवू शकतात. वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. 


मकर राशीसाठी आजचे उपाय 


आजच्या दिवशी लक्ष्मी देवीचे पूजन करा. तसेच, मुलींना कपडे आणि अन्नदान करा.   


मकर राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 


मकर राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग सोनेरी आहे. तर, मकर राशीसाठी आजचा लकी नंबर 3 आहे.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


महत्त्वाच्या बातम्या :


Numerology 28 November 2023 : आज 'या' जन्मतारखेच्या लोकांना अचानक धनप्राप्तीचे योग; अंकशास्त्रानुसार तुमचं भविष्य काय? जाणून घ्या