New Year 2025: सध्या जगभरात नवीन वर्षाची आगमनाची जय्यत तयारी सुरू आहे. अशात नवीन वर्ष येताच अनेकांची इच्छा असते की येत्या वर्षात आपली आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा मजबूत होईल, जुनी कर्जे फेडली जातील, नवीन घर किंवा नवीन वाहन घ्यावे. काही लोकांना लग्न करायचे असते तर काहींना वर्षभर त्यांच्या कुटुंबासोबत आनंदाने आणि शांततेने जगायचे असते. परंतु, अनेकवेळा अनेकजण जाणून-बुजून अशा चुका करतात की वर्षाची सुरुवातच अशुभ होते.


पूर्वीपेक्षा अनेक पटींनी प्रगती व्हावी, असे तुम्हाला वाटत असेल तर...


2025 मध्ये तुमच्यावर लक्ष्मी देवीची कृपा असेल आणि तुमची पूर्वीपेक्षा अनेक पटींनी प्रगती व्हावी, असे तुम्हाला वाटत असेल तर या चुका करू नका. हिंदू शास्त्रात अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. ज्याच्या माध्यमातून तुम्ही तुमचं येणारं वर्ष अगदी आनंदात घालवू शकता.. जाणून घ्या..


वर्षाच्या पहिल्या दिवशी चुकूनही 'हे' काम करू नका


मंडळींनो.. भांडणं टाळा - अनेक वेळा वर्षाच्या पहिल्या दिवशीच लोक भांडतात. भांडणामुळे तुमच्या आयुष्यात नकारात्मक ऊर्जा येते. जर तुम्ही एखाद्या गोष्टीची सुरुवात नकारात्मक उर्जेने केली तर तुम्हाला इच्छा असूनही त्या कामात यश मिळत नाही. यामुळे येत्या वर्षभरात तुमच्यासोबत काही अप्रिय घटना घडण्याची शक्यता असते. अगदी वाईट परिस्थितीतही वर्षाच्या पहिल्या दिवशी भांडणे टाळण्याचा प्रयत्न करा.


देवी लक्ष्मीलाही नाराज करते 'ही' गोष्ट


मांसाहार आणि मद्यपान टाळा - 99% लोक नवीन वर्षाच्या पार्टीत ही चूक करतात. हिंदू धर्मात जेव्हा एखादी नवीन गोष्ट सुरू केली जाते तेव्हा त्याची सुरुवात शुभ आणि पवित्रतेने करण्याची परंपरा आहे. नवीन वर्षाच्या पार्टीमध्ये विविध प्रकारचे मांसाहार आणि मद्य आहे. हे केवळ तुमच्या आरोग्यासाठीच हानिकारक नाही तर देवी लक्ष्मीलाही नाराज करते. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी जर तुम्ही तामसिक अन्नाचे सेवन केले तर असे मानले जाते की वर्षभर तुम्हाला कोणत्या ना कोणत्या तणावाने घेरले आहे.



कर्ज घेऊ किंवा देऊ नका - याशिवाय वर्षाच्या पहिल्या दिवशी तुम्ही कोणत्याही प्रकारची तीक्ष्ण वस्तू खरेदी करणे टाळावे आणि चुकूनही कोणाकडून कर्ज घेऊ नका. एवढेच नाही तर कोणालाही कर्ज देणे टाळा. या गोष्टी लक्षात घेऊन जर तुम्ही तुमच्या नवीन वर्षाची सुरुवात केली तर येत्या वर्षभरात देवी लक्ष्मीची कृपा तुमच्यावर वर्षाव सुरू होईल.


हेही वाचा>>>


Love Astrology: तरुणींनो ऐकलंत का..! 'या' राशीच्या मुली प्रेमविवाह करतात? लव्ह मॅरेज होणार की अरेंज मॅरेज? ज्योतिषशास्त्रात म्हटलंय..


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )