Happy New Year 2024 Vastu Tips : गुढीपाडव्याचा (Gudi Padwa) सण अवघ्या काही दिवसांवर आला आहे. याच दिवसापासून हिंदू नववर्षाला सुरुवात होते. येणारं नवीन वर्ष आपल्या आयुष्यात सुख, शांती, निरोगी आरोग्य आणि आनंदात जावं अशी सगळ्यांचीच इच्छा असते. नवीन वर्षात लक्ष्मी देवीची कृपा राहावी यासाठी लोक अनेक उपाय करतात. जर तुम्हालाही लक्ष्मीची कृपा तुमच्यावर सदैव राहावी आणि नवीन वर्ष आनंदात जावं असं वाटत असेल तर त्याआधी वास्तुच्या काही खास टिप्स नक्की करून पाहा.
नववर्ष 2024 साठी वास्तु टिप्स
- नवीन वर्ष सुरु होण्यापूर्वी तुमच्या घराची नीट साफसफाई करा. घरातील कोपरा न् कोपरा स्वच्छ धुवून घ्या.वास्तुशास्त्रानुसार, नववर्ष सुरु होण्याआधी घराची साफसफाई केल्यास घरात सकारात्मक ऊर्जा येते. लक्ष्मी देवीही प्रसन्न होते.
- नवीन वर्ष सुरु होण्यापूर्वी घरातील सर्व तुटलेल्या वस्तू घरातून काढून टाका. जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर नवीन वर्ष सुरु होण्याआधी दुकानातील अनावश्यक सामान काढून टाका.जर घरात बंद घड्याळ, बिघडलेला कॉम्प्युटर आणि तडा गेलेला आरसा असेल तर तो लगेच घराबाहेर काढून टाका.
- गंजलेली भांडी किंवा इतर कोणतीही खराब झालेली वस्तू घरात ठेवू नका. असं म्हणतात की, अशा वस्तू घरात ठेवल्याने कुटुंबातील सदस्यांची प्रगती थांबते. घरात नकारात्मक ऊर्जा पसरते. तसेच, गंजलेल्या भांड्यांतून अन्न खाल्ल्याने आरोग्यही बिघडते.
- जर तुमच्या घरात टेबल, सोफा, खुर्ची असे कोणतेही तुटलेले फर्निचर खूप दिवसांपासून तसंच पडलं असेल तर ते लगेच फेकून द्या. असं म्हटलं जातं की, घरात खराब फर्निचर ठेवणं अशुभ मानलं जातं.
- वर्षाच्या सुरुवाती आधीच तुमच्या घरात मिनी पिरॅमिड ठेवा. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते.यामुळे व्यवसायातही भरपूर फायदा होतो. असे मानले जाते की पिरॅमिडचा प्रभाव आसपासच्या गोष्टींवर सकारात्मक प्रभाव पाडतो.
- नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर श्रीगणेशाच्या मूर्तीचा फोटो लावा. घराच्या प्रवेशद्वारावर गणेशाची मूर्ती ठेवणं फार शुभ मानलं जातं. यामुळे तुमच्या जीवनात आनंद येईल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या बातम्या :