Navpancham Yog 2024 : ज्योतिषशास्त्रात, ग्रहांच्या स्थितीत होणार बदल फार महत्त्वाचा मानला जातो. ग्रहांच्या राशीपरिवर्तनानेच अनेक शुभ-अशुभ योग तयार होतात. याचा परिणाम इतर राशींवर सुद्धा पडतो. आपल्या सर्वांनाच माहीत आहे की, गुरु ग्रहाने वृषभ राशीत परिवर्तन केलं आहे. तर, केतु सध्या कन्या राशीत (Virgo Horoscope) स्थित आहे. हे दोन्ही ग्रह एकमेकांपासून नवव्या आणि पाचव्या घरात आहेत. त्यामुळे नवपंचम योग जुळून आला आहे. हा योग सिंह राशीत तयार होतोय. पण, गुरु-केतूने बनवलेला हा नववा योग अनेक राशींसाठी अडचणींचा ठरणार आहे. 


मेष रास (Aries Horoscope)


नवपंचम योगाचा प्रभाव असल्यामुळे मेष राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती फारशी चांगली नसणार आहे. पैसे मिळवण्यात तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तसेच, तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळणार नाही. त्यामुळे तुम्हाला मानसिक तणाव जाणवेल. तसेच, तुम्ही अस्वस्थ राहाल. तुमच्या नोकरीतही तुम्हाला अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागू शकतो. तुमची अनेक कामे रखडलेली असतील. तसेच, तुमच्या व्यवसायातही तुम्हाला नुकसान होण्याची शक्यता आहे. 


सिंह रास (Leo Horoscope)


नवपंचम योग तयार झाल्यामुळे सिंह राशीच्या लोकांना वैयक्तिक तसेच व्यावसायिक जीवनात अेक संकटांचा सामना करावा लागू शकतो. या दरम्यान तुम्ही कोणत्याही गैर प्रकारचा व्यवहार करू नये. ऑफिसमध्ये सहाकाऱ्यांबरोबर तुमचे वाद होतील. त्यामुळे तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा. अन्यथा तुम्ही कायदेशीर बाबींमध्ये अडकू शकता. तसेच, तुम्हाला जर गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही घरातील वडिलधाऱ्या लोकांचा सल्ला घेतल्याशिवाय गुंतवणूक करू नका. अन्यथा तुमचं नुकसान होऊ शकतं. 


धनु रास (Saggittarius Horoscope)


नवपंचम योगाच्या प्रभावामुळे धनु राशीच्या लोाकांना आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरं जावं लागू शकते. तसेच, तुम्ही हाती घेतलेल्या कामात तुम्हाला अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागू शकतो. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामावर नाराज असतील. तसेज, व्यापारी वर्गाने व्यवहार करताना त्यात सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे. अन्यथा तुमचं आर्थिक नुकसान होऊ शकतं. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


हेही वाचा :


Horoscope Today 12 May 2024 : आजचा रविवारचा दिवस खास! कर्क, सिंहसह 'या' राशींना मिळणार अचानक धनलाभाच्या संधी, वेळोवेळी मिळतील शुभ संकेत; वाचा सर्व 12 राशींचं राशीभविष्य