Astrology Panchang 30 October 2024 : आज 30 ऑक्टोबर बुधवारचा दिवस हा फार खास असणार आहे. आज अश्विन महिन्यातील कृष्ण पक्ष चतुर्दशी तिथी असल्या कारणाने तसेच, दिवाळी (Diwali 2024) असल्या कारणाने आजच्या दिवसाचं महत्त्व फार वाढलं आहे. तसेच, आजच्या दिवशी लक्ष्मी नारायण योग (Yog), सर्वार्थ सिद्धी योग आणि हस्त नक्षत्राचा शुभ संकेत जुळून आल्यामुळे आजच्या दिवसाचं महत्त्व फार वाढलं आहे.
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा परिणाम पाच राशींच्या लोकांवर होणार आहे. या राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात.
वृषभ रास (Taurus Horoscope)
वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक असणार आहे. आज तुमच्या आजूबाजूला सकारात्मक वातावरण असेल. तसेच, अनेक दिवसांपासून तुमचं जे काम रखडलं होतं ते आज पूर्ण होण्याची शक्यता आहे. आज समाजातील चांगल्या लोकांशी तुमच्या भेटीगाठी होतील. त्यामुळे तुमचा दिवस सकारात्मक जाईल. सणवाराचे दिवस असल्या कारणाने तुम्हाला धनलाभ देखील होण्याची शक्यता आहे.
कर्क रास (Cancer Horoscope)
कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभदायी असणार आहे. आज तुम्ही जे काम हाती घ्याल त्यात तुम्हाला चांगलं यश मिळेल. तसेच, जोडीदाराबरोबर तुमचा व्यवहार चांगला असेल. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांबरोबर तुमचे संबंध चांगले असतील. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तुमच्या कामाचं कौतुक केलं जाईल. तसेच, एखादी नवीन वस्तूची खरेदी करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे.
सिंह रास (Leo Horoscope)
सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी असणार आहे. आज अनेक दिवसांनंतर कुटुंबियांबरोबर तुमचा दिवस आनंदात जाईल. तसेच, आज कोणताही निर्णय घेताना तुम्ही सावध असण्याची गरज आहे. अन्यथा तुम्हाला तुमच्या निर्णयावर पश्चात्ताप करण्याची वेळ येईल.
धनु रास (Sagittarius Horoscope)
धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. आज तुम्ही हाती घेतलेल्या कामात नशिबाची पूर्ण साथ तुम्हाला मिळेल. देवी लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न असल्या कारणाने तुमची आर्थिक स्थिती देखील चांगली असणार आहे. आज तुम्हाला व्यवसायाशी संबंधित काही निर्णय घ्यावे लागू शकतात. तसेच, तुमच्या पार्टनरबरोबर संवाद साधून योग्य निर्णय घ्यावा लागेल.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खास असणार आहे. तसेच, कुटुंबियांबरोबर तुम्ही बाहेर जाण्याचा प्लॅन करु शकता. कामाच्या संदर्भात बोलायचं झाल्यास, तुमच्या परफॉर्मन्सवर तुमचा बॉस खुश होऊ शकतो. दिवाळीनिमित्त तुमचा वेळ खरेदी करण्यात जाईल. मात्र, तुम्ही फार खुश असाल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :