एक्स्प्लोर

New Year 2023 : नव्या वर्षात करा हे दहा संकल्प, सापडेल यशाची गुरुकिल्ली  

New Year 2023 : नव्या वर्षात काही संकल्प केले तर तुम्हाला नक्कीच यशाची गुरुकिल्ली सापडेल.  

New Year 2023 : नवे वर्ष सुरू होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. दर वर्षीप्रमाणे यंदा देखील जुने कॅलेंडल बदलून नवे कॅलेंडर प्रत्येक घरात येत असते. परंतु, फक्त घरातील कॅलेंडर बदलू नका, तर त्यापेक्षा काही सवयी बदलून चांगल्या सवयी अंगीकारण्याची गरज आहे. नवीन वर्ष 2023 मध्ये तुम्ही तुमचे ध्येय पूर्ण करण्यासाठी आणि यश मिळविण्यासाठी काही संकल्प केले पाहिजेत.

हे संकल्प तुम्हाला चांगले भविष्य आणि यशाकडे घेऊन जातील. पण जर तुम्ही असा विचार करत असाल तर तुम्ही कोणता संकल्प करावा. त्यामुळे काळजी करू नका, नवीन वर्षात या 10 संकल्पांचा अवलंब करून तुम्ही जीवनातील कोणतेही ध्येय साध्य करू शकता. 

नवीन वर्ष 2023 मध्ये हे 10 संकल्प करा

नकारात्मकतेपासून दूर राहा : 

नवीन वर्षाची सुरुवात सकारात्मक विचाराने करा, कारण जोपर्यंत तुम्ही सकारात्मक रहाल तोपर्यंत तुम्हाला कोणत्याही कामात अपयश मिळणार नाही. त्यामुळे नवीन वर्षात नकारात्मकतेपासून दूर राहून सकारात्मक विचारधारा अंगीकारण्याचा संकल्प घ्या.

निरोगी राहा : 

तुमचा सर्वोत्तम साथीदार म्हणजे तुमचे आरोग्य. त्यामुळेच निरोगी राहणे खूप महत्वाचे आहे. जर तुम्ही निरोगी राहाल तरच तुम्ही तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी आव्हानांना तोंड देऊ शकाल. त्यामुळे नवीन वर्ष 2023 मध्ये स्वतःला निरोगी ठेवण्याचा संकल्प घ्या.

योगाचा संकल्प : 

शरीर निरोगी ठेवण्यासाठी योग्य आहारासोबत योगासनेही खूप महत्त्वाची आहेत. त्यामुळे नवीन वर्ष 2023 मध्ये नियमितपणे योग करण्याचा संकल्प घ्या.

वाईट सवयींपासून अंतर ठेवा : 

नवीन वर्षात वाईट सवयी पूर्णपणे सोडून द्या. मात्र, वाईट सवयी कधीही लागू नयेत. परंतु, तुम्हाला कोणत्याही प्रकारची वाईट सवय किंवा वाईट गोष्टींचे व्यसन असेल तर नवीन वर्षाच्या सुरुवातीला ती सोडण्याचा संकल्प करा.

तणावापासून दूर राहा : 

परिस्थिती कशीही असो तुम्ही नेहमी आनंदी राहावे. जर तुम्ही आनंदी असाल तर कदाचित तुम्हाला तणावासारख्या परिस्थितीचा सामना करावा लागणार नाही. त्यामुळे या वेळी नवीन वर्षात निराशा आणि तणावापासून स्वतःला दूर ठेवण्याची शपथ घ्या.

अपूर्ण कामे पूर्ण करा : 

नवीन वर्षाच्या सुरुवातीला तुमची रखडलेली अपूर्ण कामे पूर्ण करण्याचा संकल्प करा. कोणतीही योजना अपूर्ण असल्यास ती पूर्ण करा.

कला-कौशल्य विकसित करा : 

प्रत्येक व्यक्तीकडे नक्कीच काहीतरी कला, कौशल्य किंवा ज्ञान असते. जर तुमच्यात काहीतरी करण्याचे कौशल्य असेल तर ते विकसित करा आणि 2023 मध्ये तुमच्या स्वप्नांना नवीन उड्डाण द्या.

नवीन काहीतरी शिका : 

नवीन वर्षात काहीतरी नवीन शिकण्याचा संकल्प करा. शिकण्यासाठी कधीही उशीर होत नाही. वयाच्या प्रत्येक टप्प्यावर शिकत राहिले पाहिजे. नवीन वर्षात, नवीन भाषा, नवीन काम, नवीन तंत्रज्ञान किंवा नवीन काहीही शिकण्याचा संकल्प केला पाहिजे.

आदर-सन्मान करा : 

लहान असो वा मोठ्या सर्व लोकांचा आदर करायला शिका. यातून संस्कृतीचे दर्शन घडते. इतरांना आदर दिल्याने माणसाचे गुण वाढतात. म्हणूनच सर्व लोकांचा आदर करायला शिका.

स्वतःवर टीका करणे थांबवा :

आपल्या चुका मान्य करणे ही चांगली गोष्ट आहे, परंतु प्रत्येक चुकीसाठी स्वतःवर टीका करणे नेहमीच योग्य नसते. त्यामुळे नवीन वर्ष 2023 मध्ये स्वतःवर टीका न करण्याचा संकल्प घ्या. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

महत्वाच्या बातम्या

Baba Vanga : बाबा वेंगाची 2023 साठी भविष्यवाणी, वाचून अनेकांची झोप उडेल 

https://twitter.com/dhanaji_surve
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 10 November 2026: आजचा दिवाळी पाडवा 7 राशींसाठी भाग्याचा! दुर्मिळ शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य...
आजचा दिवाळी पाडवा 7 राशींसाठी भाग्याचा! दुर्मिळ शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य...
Diwali 2026: उद्या दिवाळी पाडवा..पत्नीने पतीचं औक्षण करण्यामागचं कारण काय? धार्मिक महत्त्व, परंपरा, पौराणिक कथा..
उद्या दिवाळी पाडवा..पत्नीने पतीचं औक्षण करण्यामागचं कारण काय? धार्मिक महत्त्व, परंपरा, पौराणिक कथा..
Mangal Transit 2026: 12 नोव्हेंबरपासून 7 राशींच्या आयुष्यात मोठा टर्निंग पॉईंट! मंगळाचे संक्रमण,  करिअर, पैसा, प्रगतीच्या संधी...ज्योतिषशास्त्र...
12 नोव्हेंबरपासून 7 राशींच्या आयुष्यात मोठा टर्निंग पॉईंट! मंगळाचे संक्रमण,  करिअर, पैसा, प्रगतीच्या संधी...ज्योतिषशास्त्र...
Hindu Religion: देवाला अर्पण केलेला नारळ खराब निघाला तर शुभ की अशुभ? धार्मिक महत्त्व, मान्यता काय सांगते? जाणून थक्क व्हाल...
देवाला अर्पण केलेला नारळ खराब निघाला तर शुभ की अशुभ? धार्मिक महत्त्व, मान्यता काय सांगते? जाणून थक्क व्हाल...

व्हिडीओ

Vivekanand Patil Gokul Morcha Speech : कोरमचं कौतुक सांगू नका, गोकुळ मोर्चातील धमाल भाषण
Varsha Usgaonkar Majha Katta: कॉलेजचे किस्से ते सिनेमातील प्रवास,वर्षा उसगांवकरांसोबत दिलखुलास गप्पा
Raosaheb Danve Arjun Khotkar Jalna : कटुता 100 टक्के संपली, रावसाहेब दानवे - खोतकरांची फटकेबाजी
NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Modi Zelenskyy Phone Call : रशिया-युक्रेन युद्धामध्ये शांततेचा तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करू; पंतप्रधान मोदींचा झेलेंस्कींना फोन
रशिया-युक्रेन युद्धामध्ये शांततेचा तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करू; पंतप्रधान मोदींचा झेलेंस्कींना फोन
मोठी बातमी : अजित पवारांच्या घातपातप्रकरणी सुनील तटकरेंची चौकशी करा, तो राक्षसी माणूस, अंतुलेंनाही त्यांनीच संपवलं : रामदास कदम
अजित पवारांच्या घातपातप्रकरणी सुनील तटकरेंची चौकशी करा, तो राक्षसी माणूस, अंतुलेंनाही त्यांनीच संपवलं : रामदास कदम
Satej Patil : मातंग समाजाचे मिणचेकर पडले, मराठ्यांचे युवराज पाटील पडले, पण मुश्रीफांना फक्त त्यांचा मुलगा पडल्याचं दुःख, मग खरे जातीयवादी कोण? सतेज पाटलांचा सवाल
Satej Patil : मातंग समाजाचे मिणचेकर पडले, मराठ्यांचे युवराज पाटील पडले, पण मुश्रीफांना फक्त त्यांचा मुलगा पडल्याचं दुःख, मग खरे जातीयवादी कोण? सतेज पाटलांचा सवाल
Satej Patil on Gokul: सतेज पाटलांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट, महायुती सरकारने गुपित ठेवलेल्या चार संचालकांची नावंच सांगून टाकली, हसन मुश्रीफ-चंद्रकांत पाटलांबाबतही सनसनाटी दावा
सतेज पाटलांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट, महायुती सरकारने गुपित ठेवलेल्या चार संचालकांची नावंच सांगून टाकली, हसन मुश्रीफ-चंद्रकांत पाटलांबाबतही सनसनाटी दावा
Gokul President Election 2026 Court Hearing: गोकुळची निवडणूक उद्याच, शासन नियुक्त संचालक मतदान करणार, पण मतं बाजूला ठेवणार; अध्यादेश चूक की बरोबर हे न्यायालयाचं अद्याप ठरलं नाही
गोकुळची निवडणूक उद्याच, शासन नियुक्त संचालक मतदान करणार, पण मतं बाजूला ठेवणार; अध्यादेश चूक की बरोबर हे न्यायालयाचं अद्याप ठरलं नाही
Raju Shetti: तर जावयाला सुद्धा कोल्हापूरमध्ये पाऊल ठेवून देणार नाही; राजू शेट्टींचा थेट अमित शाहांना इशारा, अध्यादेशावरून सीएम देवेंद्र फडणवीसांवरही सडकून प्रहार
तर जावयाला सुद्धा कोल्हापूरमध्ये पाऊल ठेवून देणार नाही; राजू शेट्टींचा थेट अमित शाहांना इशारा, अध्यादेशावरून सीएम देवेंद्र फडणवीसांवरही सडकून प्रहार
Vivekanand Patil Kolhapur Gokul Morcha speech: मंत्रालयात कंस मामा बोटं मोडितो! गोकुळच्या मोर्चातील विवेकानंद पाटलांचं जळजळीत भाषण, महायुती सरकारला झोडपलं
मंत्रालयात कंस मामा बोटं मोडितो! गोकुळच्या मोर्चातील विवेकानंद पाटलांचं जळजळीत भाषण, महायुती सरकारला झोडपलं
दिवाळीच्या फटाक्यांना ब्रेक! मुंबई आणि ठाण्यात रॉकेट फटाक्यांवर बंदी, राज्य सरकारचा मोठा निर्णय, नियम मोडल्यास कारवाई
दिवाळीच्या फटाक्यांना ब्रेक! मुंबई आणि ठाण्यात रॉकेट फटाक्यांवर बंदी, राज्य सरकारचा मोठा निर्णय, नियम मोडल्यास कारवाई
Embed widget