Mercury Transit 2024 : बुध ग्रहाला ग्रहांचा राजा असं म्हटलं जातं. यश, संतुष्टी, चांगले आरोग्य आणि तल्लक बुद्धीचं प्रतीक बुध ग्रहाला मानण्यात आलं आहे. बुध ग्रह ठराविक अंतराने एका राशीतून दुसऱ्या राशीत संक्रमण करतो. बुधाच्या संक्रमणाचा सर्व 12 राशींवर परिणाम होतो. ग्रहांच्या या संक्रमणाने काही राशींच्या लोकांचं भाग्य उजळतं तर काही राशींना (Zodiac Signs) नुकसानीचा सामना करावा लागतो. यावेळी बुध ग्रह 19 जुलै रोजी सिंह राशीत संक्रमण करणार आहे. याचा परिणाम इतर चार राशींवर होणार आहे. या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात. 


मेष रास (Aries Horoscope)


बुध ग्रहाच्या संक्रमणाने तुम्हाला चांगलाच लाभ मिळणार आहे. या काळात तुमचं आरोग्य चांगलं असणार आहे. तुम्ही प्रचंड उत्साहित असाल. तसेच, जोडीदाराबरोबर तुमचा चांगला वेळ जाईल. तुम्हाला नोकरीत चांगली पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुमची आर्थिक बाजू चांगली असेल. मित्रांचा चांगला सहवास लाभेल. 


मिथुन रास (Gemini Horoscope)


या राशींच्या लोकांसाठी बुधाच्या संक्रमणाचा काळ चांगला जाणार आहे. जर तुम्ही नोकरी चेंज करण्याचा विचार करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी चांगला असणार आहे. तुम्हाला प्रमोशनसह दुसरीकडे ट्रांन्सफर देखील मिळण्याची शक्यता आहे. करिअरच्या निमित्ताने तुम्हाला परदेशी जाण्याची संधी मिळेल. या काळात धार्मिक यात्रेला देखील जाण्याचा चांगला योग आहे. 


तूळ रास (Libra Horoscope)


बुध राशीच्या संक्रमणाचा परिणाम तूळ राशीवर देखील होणार आहे. या काळात तुमच्या मान-सन्मानात चांगली वाढ झालेली दिसेल. तुम्हाला अचानक धनप्राप्ती होऊ शकते. तसेच, जर तुम्ही वाहन खरेदी करण्याचा प्रयत्न करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी चांगला ठरू शकतो. 


धनु रास (Sagittarius Horoscope)


बुधाच्या संक्रमणाचा धनु राशीवर देखील चांगला परिणाम होणार आहे. या काळात मित्रांच्या सहकार्याने तुमची अनेक कामे सोपी होतील तसेच पूर्णही होतील. तसेच, तुमच्या भावा-बहि‍णींबरोबर तुमचा चांगला ताळमेळ राहील. ज्या कामासाठी तुम्ही अनेक दिवसांपासून थांबलेलात ते काम तुमचं लवकरच पूर्ण होताना दिसेल. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


हेही वाचा :


Shani Dev : 15 नोव्हेंबरपर्यंत शनीची असणार वक्री चाल! 'या' राशीच्या लोकांना साडेसाती आणि ढैय्याचा करावा लागणार सामना