Shani Dev : ज्योतिष शास्त्रानुसार, शनीच्या (Shani Dev) वक्री चालीने अनेक राशींना संकटांचा सामना करावा लागतो. आपल्या सर्वांनाच माहीत आहे की, शनीला (Lord Shani) न्यायदेवता म्हटलं जातं. जर एखाद्या राशीवर शनीची वक्री दृष्टी पडली तर त्या राशीला अनेक संकटांचा सामना करावा लागतो. शनी ग्रह 17 जुलै 2024 रोजी कुंभ राशीत वक्री करणार आहे. तर, 15 नोव्हेंबरपर्यंत याच राशीत शनी स्थित असणार आहे. शनी ग्रहाचं हे संक्रमण 15 नोव्हेंबरपर्यंत काही राशीच्या लोकांसाठी सकारात्मक तर काही राशींसाठी (Zodiac Signs) नकारात्मक परिणाम घेऊन येणार आहे.
जर, तुमच्या कुंडलीत सध्या साडेसाती किंवा ढैय्या सुरु असेल तर या काळात तुम्हाला सावध राहण्याची गरज आहे. या दरम्यान तुम्ही काय करणं गरजेचं आहे याच संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.
'या' राशींना सावध राहण्याची गरज
मेष रास - मेष राशीच्या लोकांना करिअर, आरोग्य आणि कौटुंबिक जीवनात अनेक संकटांचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
वृषभ रास - वृषभ राशीच्या लोकांना या काळात धन-संपत्ती संदर्भात समस्या येऊ शकतात. त्यामुळे तुमच्या खर्चात देखील वाढ होण्याची शक्यता आहे.
मिथुन रास - या राशीच्या लोकांना नातेसंबंधात तणावाचा सामना करावा लागू शकतो.नात्यात गैरसमज वाढण्याची शक्यता आहे.
कर्क रास - कर्क राशीच्या लोकांना मानसिक तणाव, चिंता यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
सिंह रास - या राशीच्या लोकांना आरोग्याशी संबंधित काही तक्रारी जाणवू शकतात. तुम्हाला नोकरीत अडचण येण्याची शक्यता आहे.
कन्या रास - कन्या राशीच्या लोकांची अनेक दिवसांपासून कोर्ट कचेरी संदर्भात तर काही केस सुरु असेल तर त्याला अधिक वेळ लागण्याची शक्यता आहे. तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवा.
तूळ रास - तूळ राशीच्या लोकांना व्यवसायात संघर्षाचा काळ सहन करावा लागेल. तसेच, आरोग्याच्या अनेक तक्रारी जाणवतील.
'या' राशींच्या लोकांना लाभ मिळण्याची शक्यता
धनु रास - धनु राशीच्या लोकांवर जर साडेसाती आणि ढैय्याचा प्रभाव नसेल तर तुमच्या करिअरमध्ये चांगली प्रगती होईल. तसेच,धार्मिक कार्याचा शुभ योग जुळून येणार आहे.
मकर रास - मकर राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती सुधारेल. तुमच्या पदोन्नतीत वाढ होण्याची शक्यता आहे.तसेच, समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल.
कुंभ रास - या दरम्यान तुमची आर्थिक वृद्धी होईल. कुटुंबीयांचा तुमच्या प्रत्येक कार्यात सहभाग असेल.
मीन रास - मीन राशीच्या लोकांच्या आरोग्यात चांगली सुधारणा दिसून येईल. कुटुंबात सुख-शांती नांदेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :