Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीचा दुसरा टप्पा शुक्रवारी संपला. 2019 च्या निवडणुकीच्या तुलनेत पहिल्या टप्प्याप्रमाणेच शुक्रवारी रात्री 10 वाजेपर्यंत 88 मतदारसंघातील मतदानाच्या आकडेवारीत घट दिसून आल्याने धक्का कोणाला बसणार? याची चर्चा रंगली आहे. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार दुसऱ्या टप्प्यातील मतदान शांततेत पार पडले.


अंदाजे 63 टक्के मतदान झाल्याचा अंदाज


निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार मतदानाची नोंद 64.2 टक्के झाली असली, तरी वाढण्याची अपेक्षा होती. राजस्थान, पश्चिम बंगाल, केरळ, कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये संध्याकाळी 6 वाजेच्या सुमारास मतदार मतदानासाठी रांगेत उभे होते. मतदानाची अधिकृत वेळ संपण्यापूर्वी शेवटच्या मिनिटापर्यंत रांगेत उभे राहणाऱ्यांना मतदानाच्या वेळेच्या पुढेही मतदान करण्याची परवानगी आहे. 2019 मध्ये शुक्रवारी मतदान झालेल्या 88 पैकी 85 जागांवर 69.64 टक्के मतदान झाले होते. आसाममधील पाच जागांसाठी मतदानाची तुलना करणे कठीण झाले आहे. कारण, गेल्या वर्षी सीमांकनानंतर जागांची सीमा बदलली आहे. 19 एप्रिल रोजी 102 जागांसाठी पहिल्या टप्प्यातील मतदानादरम्यान, दिवसअखेरीस तात्पुरते मतदान अंदाजे 63 टक्के होते आणि परवा अंतिम आकडा 66 टक्के होता.


राज्यस्थान, केरळ, त्रिपुरात मतदान पूर्ण


'द इंडियन एक्स्प्रेस'शी बोलताना, निवडणूक आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मुख्यत: तीन राज्यांमध्ये म्हणजेच महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये कमी मतदानामुळे एकूण मतदानाची संख्या कमी झाली. शुक्रवारी रात्रीपर्यंत, महाराष्ट्रात 59.6 टक्के, बिहारमध्ये 57 टक्के आणि उत्तर प्रदेशात 54.8 टक्के मतदान झाले. जे 2019 मध्ये अनुक्रमे 63 टक्के, 63 टक्के आणि 62 टक्के होते. या 88 जागांवर एकूण 16 कोटी मतदार मतदान करण्यास पात्र होते. दुसऱ्या टप्प्यात एकूण 543 जागांपैकी एक तृतीयांश जागांसाठी मतदान संपले आहे. दुसऱ्या टप्प्यात राजस्थान, केरळ, त्रिपुरा आणि मणिपूर ही राज्ये आहेत जिथं मतदान पूर्ण झालं आहे. 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांव्यतिरिक्त जिथे पहिल्या टप्प्यात मतदान पूर्ण झाले.


मतदान पूर्ण झालेली राजे 



  • उत्तराखंड

  • तामिळनाडू

  • सिक्कीम

  • पुद्दुचेरी

  • मेघालय

  • मणिपूर

  • लक्षद्वीप

  • अरुणाचल प्रदेश

  • अंदमान आणि निकोबार बेटे

  • केरळा

  • राजस्थान

  • त्रिपुरा


केरळमध्येही कमी मतदान


पहिल्या टप्प्यात 12 आणि दुसऱ्या टप्प्यात 13 जागा असलेल्या राजस्थानमध्ये रात्री 11 वाजता दुसऱ्या टप्प्यासाठी 64.07 टक्के मतदान झाले, तर 2019 मध्ये त्याच जागांवर मतदान 68 टक्के होते. लोकसभेच्या सर्व 20 जागांसाठी शुक्रवारी मतदान होत असलेल्या केरळमध्ये रात्री 11 वाजता 67.15 टक्के मतदान झाले, तर 2019 मध्ये त्याचे मतदान 78 टक्के होते. 28 जागांपैकी निम्म्या असलेल्या कर्नाटकात शुक्रवारी रात्री 11 वाजता 68.38 टक्के मतदान झाले होते, तर याच 14 जागांवर 2019 मध्ये 67 टक्के मतदान झाले होते. राज्यातील उर्वरित 14 मतदारसंघांमध्ये तिसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे. त्रिपुरातील एकमेव जागेवर जेथे शुक्रवारी मतदान झाले होते तेथे 2019 मधील 82.9 टक्क्यांच्या तुलनेत 79.59 टक्के मतदान झाले.


पहिल्या टप्प्यात 102 जागांसाठी मतदान


सात टप्प्यातील लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 102 जागांसाठी मतदान झाले. निवडणूक आयोगाने अद्याप अंतिम मतदानाची आकडेवारी जाहीर केलेली नसताना, त्या जागांवर एकूण मतदान 66 टक्के असण्याचा अंदाज आहे. 2019 मध्ये त्याच जागांवर झालेल्या मतदानापेक्षा चार टक्के कमी हा आकडा आहे. पहिल्या टप्प्यानंतर आयोगाने हवामान परिस्थितीचे मूल्यांकन करण्यासाठी आणि उष्णतेच्या लाटेचा प्रभाव कमी करण्यासाठी बैठक घेतली. दुसऱ्या टप्प्यासाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलेला नव्हता, असे मतदान समितीने म्हटले होते. 


इतर महत्वाच्या बातम्या