Mars Transit 2022 : श्रावण (Shravan 2022) महिना लवकरच सुरू होणार आहे, भावा-बहिणीच्या अतूट प्रेमाचा सण रक्षाबंधनही (Rakshabandhan 2022) याच श्रावण महिन्यात 11 ऑगस्टला येणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, रक्षाबंधनाच्या एक दिवस आधी एक मोठा ग्रह आपली राशी बदलणार आहे. 10 ऑगस्ट रोजी मंगळ (Mars) मेष राशीत प्रवेश करेल. ज्योतिष शास्त्रानुसार तो 10 ऑगस्ट रोजी रात्री 9.32 वाजता वृषभ राशीत प्रवेश करेल. या राशीच्या लोकांना त्यांच्या या राशीत प्रवेशामुळे मोठे लाभ मिळणार आहेत.


वृषभ : मंगळाच्या संक्रमणामुळे या राशीच्या लोकांना शुभ परिणाम मिळतील. शत्रूंचा पराभव होईल. उत्पन्न वाढेल. गुंतवणुकीसाठी वेळ चांगला आहे. जुने वाद मिटतील. आत्मविश्वास वाढेल.


कर्क : कर्क राशीच्या लोकांसाठी हा काळ शुभ राहील. जुन्या कर्जातून त्यांची सुटका होईल. नोकरीत प्रगती होईल. उत्पन्न वाढेल. कामाच्या ठिकाणी सर्वांचे सहकार्य मिळेल. जे विद्यार्थी परीक्षेची तयारी करत आहेत. त्यांना चांगली बातमी मिळू शकते.


सिंह : या राशीच्या लोकांसाठी मंगळ संक्रमणाचा प्रभाव फलदायी ठरेल. कोणत्याही कामात तसेच प्रत्येक गोष्टीत यश मिळेल. या काळात आर्थिक प्रगतीची शक्यता आहे. त्यांचा पराक्रम आणि धैर्य वाढेल.


तूळ : मंगळाच्या संक्रमणामुळे या राशीच्या लोकांना अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. त्यांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल. आर्थिक स्थिती चांगली राहील. कायदेशीर बाबींमध्ये यश मिळेल.


धनु: कामाच्या ठिकाणी त्यांची प्रशंसा होईल. त्यांच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. नवीन लोकांशी भेट होईल. ही बैठक भविष्यात फायदेशीर ठरणार आहे.


कुंभ: कुंभ राशीच्या लोकांच्या प्रेम जीवनात नवीन ऊर्जा येईल. नवीन वाहन किंवा इमारत लकी ठरेल.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.) 


हेही वाचा :