Dream Interpretation : झोपेत पडणाऱ्या स्वप्नांकडे दुर्लक्ष करू नये. स्वप्न शास्त्रानुसार भविष्यात घडणाऱ्या चांगल्या-वाईट घटनांचे संकेत स्वप्नात दडलेले असतात. स्वप्नात दिसणार्या गोष्टी वेळीच समजल्या तर कधी-कधी मोठी संकटेही टळू शकतात. इतकंच नाही तर स्वप्नात दिसलेल्या गोष्टींमधून आपण जीवनातील यश-अपयश शोधू शकतो. प्राचीन ग्रंथांमध्ये स्वप्नांबद्दल वर्णन आहे. उपनिषदांमध्येही स्वप्नांच्या संदर्भात काही गोष्टी सांगितल्या आहेत.
सुंदर वस्त्रांनी सजलेली सुंदर विवाहित स्त्री स्वप्नात दिसली तर कामात यश मिळते आणि भविष्यात समृद्धी प्राप्त होते.
स्वप्न शास्त्रानुसार स्वप्नात सुंदर स्त्री दिसणे हे यशाचे लक्षण मानले जाते. जर एखादी विवाहित स्त्री एखाद्याच्या स्वप्नात आली तर याचा अर्थ असा होतो की तो करत असलेल्या किंवा करू इच्छित असलेल्या कामात नक्कीच यश मिळेल.
अशी स्वप्नेही येतात ज्यामुळे मन अस्वस्थ होते. अशुभ स्वप्न पाहून पुन्हा झोपावे, असे केल्याने अशुभ परिणाम नष्ट होतात असे मानले जाते. असे मानले जाते की पहाटे चार ते सहा या वेळेत जी स्वप्ने दिसतात ती पुढील काळातील अनेक गोष्टींचा साक्षात्कार देते. या कालावधीत जर तुम्ही पैशाशी संबंधित स्वप्न पाहत असाल तर पैसे मिळण्याची शक्यता वाढते. अनेक जण स्वप्नांकडे दुर्लक्ष करतात. परंतु, या सवयींमुळे मोठे नुकसान होण्याची शक्यता असते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.)
महत्वाच्या बातम्या :