Margshirsh Amavasya 2024 : मार्गशीर्ष अमावस्येला हिंदू धर्मात फार महत्त्व आहे. या दिवशी उपवास करणे, पितरांचं पूजन करणं आणि योग-ध्यान केल्याने व्यक्तीला पुण्य मिळतं अशी मान्यता आहे. मार्गशीर्ष अमावस्येला दान करणं देखील शुभ मानलं जातं. दान-धर्म केल्याने देवी-दैवतांबरोबरच पितरांचाही आशीर्वाद मिळतो. 2024 वर्षाची शेवटची तिथी 1 डिसेंबर रोजी आहे. या दिवशी काही शुभ योगदेखील (Yog) जुळून येणार आहेत. याच्या प्रभावाने डिसेंबर महिन्यात काही राशींना शुभ परिणाम मिळणार आहे. या शुभ योगांबद्दल आणि त्याच्या परिणामाबद्दल जाणून घेऊयात.
मार्गशीर्ष अमावस्येला जुळून येणार 'हे' शुभ योग
मार्गशीर्ष अमावस्येच्या दिवशी सकाळपासूनच सुकर्मा योग असणार आहे. संध्याकाळी 4 वाजून 34 मिनिटांनी हा योग समाप्त होणार आहे. त्यानंतर धृति योग लागणार आहे. या दोन योगांनाच ज्योतिष शास्त्रात शुभ मानलं जातं. त्याचबरोबर 1 डिसेंबरच्या दिवशी बुधादित्य योग आहे. तसेच, चंद्र आणि गुरुच्या मध्ये दृष्टी संबंध सुद्धा असणार आहे. हा फार शुभ संयोग मानला जातो. ग्रहांची स्थिती आणि शुभ योगांमुळे मार्गशीर्ष अमावस्येनंतर हा काळा काही राशींसाठी फार शुभकारक असणार आहे. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.
वृषभ रास (Taurus Horoscope)
वृषभ राशीच्या लोकांसाठी डिसेंबर महिन्याची सुरुवार फार चांगली असणार आहे. या काळात तुम्हाला ऑफिसमधून कोणतंच टेन्शन नसणार आहे. तसेच, जे तरुण नवीन नोकरीच्या शोधात आहेत त्यांना चांगली नोकरी मिळण्याची शक्यता आहे. तसेच, ग्रहांच्या स्थितीमुळे तुमच्यात उत्साह टिकून राहील. तुम्ही हाती घेतलेल्या प्रत्येक कार्यात तुम्हाला चांगलं यश मिळेल. तसेच, तुमच्यात मानसिक रुपात बदल झालेला दिसेल.
कर्क रास (Cancer Horoscope)
कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे. त्यामुळे या काळात तुमच्यात चांगले बदल घडून येतील. करिअरमध्ये तुमची चांगली प्रगती दिसून येईल. रोजगाराच्या अनेक नवीन संधी तुमच्यासाठी उपलब्ध होतील. तसेच, या काळात विद्यार्थ्यांनी मन लावून अभ्यास करण्याची गरज आहे. आई-वडिलांच्या आशीर्वादाने तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल.
तूळ रास (Libra Horoscope)
तूळ राशीच्या लोकांसाठी हा काळ चांगला असणार आहे. या काळात तुम्ही तुमच्या योग्यतेचा योग्य वापर करणं गरजेचं आहे. ग्रहांची स्थिती चांगली असल्या कारणाने याचे शुभ परिणाम तुम्हाला मिळतील. एखाद्या शुभ कार्यात तुम्ही सहभागी होण्याची शक्यता आहे. तसेच, तुम्हाला धनलाभही होण्याची शक्यता आहे.
मकर रास (Capricorn Horoscope)
मकर राशीच्या लोकांसाठी हा काळ फार शुभ असणार आहे. या काळात तुम्हाला अनेक चांगले अनुभव येतील. तसेच, विवाहाचे अनेक शुभ योग जुळून येणार आहेत. तुम्हाला विविध स्त्रोतांमधून धनलाभ मिळेल. तसेच, या काळात तुम्हाला शुभवार्ता मिळण्याची शक्यता आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: