Shani Gochar 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, न्यायदेवता शनी (Shani Dev) पुढच्या वर्षी राशी परिवर्तन करणार आहे. शनीच्या (Lord Shani) राशी परिवर्तनाने अनेक राशींच्या लोकांना चांगला लाभ मिळतो. तर अनेक राशींच्या लोकांवर शनीची ढैय्या आणि साडेसाती सुरु होते. त्यामुळे शनीच्या राशी (Zodiac Signs) परिवर्तनाने कोणत्या 3 राशींवर ढैय्या आणि साडेसातीचं सावट असणार आहे या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.
शनी राशी परिवर्तन 2025
ज्योतिष शास्त्रानुसार, न्यायदेवता शनी 29 मार्च 2025 रोजी रात्री 11 वाजून 01 मिनिटांनी कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करणार आहे. या राशीत शनी अडीच वर्षांपर्यंत स्थित असणार आहे. त्यामुळे याचा सर्व 12 राशींवर परिणाम होण्याची शक्यता आहे. मात्र, या 3 राशी कोणत्या ते पाहूयात.
मेष रास (Aries Horoscope)
शनीच्या राशी परिवर्तनाने मेष राशीच्या लोकांवर शनीची साडेसाती सुरु होणार आहे. या राशीवर साडेसातीचं पहिलं चरण सुरु असेल. त्यामुळे या राशीच्या करिअर आणि व्यवसायावर याचा चांगलाच परिणाम होणार आहे. तुम्हाला व्यवसायात अनेक चढ-उतार पाहायला मिळतील. तसेच, या काळात कोणतंही काम करताना कुटुंबियांचा सल्ला घ्या.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
शनीच्या मीन राशीत संक्रमणाने कुंभ राशीच्या लोकांवर साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरु राहील. सध्याच्या काळात शनी कुंभ राशीत विराजमान आहे त्यामुळे या राशीवर साडेसातीचा परिणाम आधीपासूनच पाहायला मिळतोय. या काळात तुम्हाला धनहानी होऊ शकते. तसेच, तुम्ही जे काम हाती घ्याल ते बिघडण्याची शक्यता आहे. यासाठी आत्तापासूनच सावध राहा.
मीन रास (Pisces Horoscope)
शनीदेव मीन राशीत परिवर्तन करणार आहे. त्यामुळे या राशीत शनीच्या साडेसातीचा पहिला चरण सुरु राहील. तसेच, या काळात तुम्हाला मेंटली स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. कोणीही तुमच्या बौद्धिक क्षमतेचा फायदा घेऊ शकतं. त्यामुळे जरा सावध राहा. तसेच, या काळात कोणतंही नवीन काम हाती घेऊ नका. ते काम पूर्णपणे बिघडण्याची शक्यता आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :