Mars Transit In Aries : ज्योतिषशास्त्रानुसार, मंगळ आपल्या मूळ राशीत, म्हणजेच मेष राशीत प्रवेश करणार आहे. 1 जूनला मंगळ मेष राशीत प्रवेश करेल. मंगळ हा धैर्य, पराक्रम आणि शौर्याचा कारक मानला जातो. मंगळाच्या चालीचा परिणाम हा प्रत्येक राशीवर होत असतो. 1 जूनला मेष राशीत असलेल्या मंगळ प्रवेशामुळे 3 राशींचं भाग्य उजळेल, त्यांना या वेळी आर्थिक फायदा होऊ शकतो. तसेच नोकरीत पदोन्नती आणि वाढ होण्याची शक्यता आहे. आता नेमक्या कोणत्या राशींना    संक्रमणाचा फायदा होणार? जाणून घ्या


मेष रास (Aries)


मंगळाच्या राशीतील बदल तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो, कारण मंगळ तुमच्या राशीचा स्वामी आहे. तसेच मंगळ तुमच्या राशीतून स्वर्गीय घरामध्ये प्रवेश करणार आहे. त्यामुळे यावेळी तुमचं धैर्य आणि शौर्य वाढेल. या काळात तुम्हाला पैसा, व्यवसाय, मालमत्ता आणि कौटुंबिक बाबींमध्ये लाभ मिळेल. या काळात तुम्ही कोणतीही मालमत्ता किंवा वाहन खरेदी करू शकता. यावेळी, विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन छान असेल, तर अविवाहितांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात.


धनु रास (Sagittarius)


धनु राशीच्या लोकांसाठी मंगळाचा राशी बदल अनुकूल ठरू शकतो. कारण हे संक्रमण तुमच्या राशीतून पाचव्या घरात होणार आहे. त्यामुळे यावेळी तुम्हाला तुमच्या मुलाशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. तुमच्या करिअरच्या दिशेने तुम्ही जी काही पावलं टाकाल ती तुम्हाला यश मिळवून देतील. या राशीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक स्पर्धेत यश मिळेल. तसेच, ज्या जोडप्यांना अपत्यप्राप्तीची इच्छा आहे, त्यांना अपत्यप्राप्ती होईल.


मीन रास (Pisces)


मंगळाचं संक्रमण तुमच्यासाठी शुभ ठरू शकतं, कारण मंगळ तुमच्या कुंडलीतील धन आणि वाणी घरात प्रवेश करणार आहे, त्यामुळे यावेळी तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. याशिवाय, प्रत्येक गोष्टीत तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्यांकडून पूर्ण सहकार्य आणि आर्थिक लाभ मिळेल. या काळात तुमचं व्यक्तिमत्व सुधारेल. तसेच या काळात तुमच्या बोलण्यात सुधारणा होईल, ज्यामुळे लोक प्रभावित होतील, तुमच्याकडे आकर्षित होतील. यावेळी नोकरदारांना बढती मिळण्याची शक्यता आहे. अडकलेले पैसे देखील तुम्हाला परत मिळतील.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा:


Rajyog : तब्बल 12 वर्षांनंतर कुबेर राजयोग बनल्याने 'या' राशींची होणार भरभराट; सोन्यासारखा पैसा येणार, सर्व स्वप्न पूर्ण होणार