Mangal Gochar 2024 : ज्योतिषशास्त्रात मंगळ (Mars) ग्रहाला ग्रहांचा सेनापती म्हटलं जातं. नवग्रहांमध्ये मंगळ ग्रहाला अधिक शक्तिशाली समजलं जातं. अशात मंगळ ग्रहाच्या राशी बदलाचा परिणाम सर्व राशींवर होतो. मंगळ ऑक्टोबरपर्यंत मिथुन राशीत राहील. दरम्यान, 16 सप्टेंबरला मंगळाची आंशिक शक्ती 12 अंश असेल. या काळात मंगळ पूर्णपणे तारुण्यात असेल. मिथुन राशीमध्ये मंगळाच्या उपस्थितीमुळे कोणत्या राशींना सर्वाधिक फायदा होईल? जाणून घेऊया.
वृषभ रास (Taurus)
मंगळ तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. या काळात तुमच्या जीवनात अधिक सकारात्मक ऊर्जा असेल, अशा स्थितीत तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवे स्रोत उघडतील. तुम्ही पैशांची बचत करण्यात यशस्वी होऊ शकता. आर्थिक परिस्थितीबाबत मोठा निर्णय घेऊ शकता. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून तुम्हाला आता लाभ मिळू शकतो. वडिलोपार्जित संपत्तीतूनही लाभ मिळू शकतो. मंगळाच्या प्रभावामुळे तुमच्या मोठ्या इच्छा आणि स्वप्नं पूर्ण होऊ शकतात. तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल आणि तुमच्या कुटुंबावर पैसा खर्च कराल. या काळात मुलांच्या चांगल्या भविष्याबाबत कोणताही निर्णय घेतला जाऊ शकतो. विद्यार्थी अभ्यासावर लक्ष केंद्रित करतील. लव्ह लाईफसाठी हा काळ चांगला असेल.
सिंह रास (Leo)
सिंह राशीच्या लोकांसाठी मंगळ ग्रहाची स्थिती खुप फायद्याची ठरेल. या काळात या राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती चांगली राहील. सध्या चालू असलेल्या पैशाशी संबंधित समस्या संपू शकतात. आता केलेल्या कोणत्याही गुंतवणुकीतून तुम्हाला भरपूर फायदा मिळू शकतो. तुम्हाला अपत्य होण्याची शक्यता आहे. ज्यांना आधीच मुलं आहेत त्यांना मुलांकडून आनंद मिळू शकतो. तुम्ही पैसे वाचवण्यातही यशस्वी होऊ शकता. व्यवसायातही भरपूर नफा मिळण्याची शक्यता आहे. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. यासोबतच तुमच्या आरोग्याबाबत थोडं सावध राहा.
धनु रास (Sagittarius)
धनु राशीच्या लोकांसाठी मंगळाचं तारुण्य खूप फायदेशीर ठरू शकतं. या राशीच्या लोकांना करिअर आणि बिझनेसमध्ये खूप फायदा होणार आहे. तुमची प्रदीर्घ प्रलंबित कामं पूर्ण होऊ शकतात. याद्वारे तुम्ही अपार संपत्ती मिळवू शकता. नोकरीतही तुमचा दिवस चांगला जाईल. मंगळ ग्रहाच्या स्थितीमुळे या राशीच्या लोकांना खूप फायदा होईल. याशिवाय उच्च स्तरावर यश मिळू शकतं.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :