Mangal Gochar 2024 : ग्रहांचा सेनापती मंगळ ग्रहाने (Mangal Gochar) 20 ऑक्टोबर 2024 रोजी संक्रमण करुन नीच राशीत म्हणजेच कर्क राशीत प्रवेश केला होता. यामुळे शनीबरोबर षडाष्टक योग निर्माण झाला आहे. हा योग खरंतर फार अशुभ मानला जातो. पण. 4 राशी अशा आहेत ज्यांच्यासाठी हा योग फार शुभ आहे. 


ज्योतिष शास्त्रानुसार, मंगळ ग्रह 23 जानेवारी 2025 पर्यंत कर्क राशीत असणार आहे. यामुळे जुळून आलेला षडाष्टक योग देशभरात अडचणींचं कारण ठरणार आहे. त्याचबरोबर अनेकांच्या आयुष्यात यामुळे चढ-उतार निर्माण होतील. षडाष्टक योग कोणत्या राशींसाठी शुभ ठरणार आहे ते जाणून घेऊयात. 


वृषभ रास (Taurus Horoscope)


वृषभ राशीच्या लोकांसाठी हा काळ फार चांगला असणार आहे. तुमच्या साहसात चांगली वाढ होईल. त्यामुळे या काळात तुम्ही तुमची सर्व कामे वेळेत पूर्ण करु शकता. नोकरदार वर्गातील लोकांना या काळात चांगली बातमी मिळू शकते. तसेच, तुमच्या आत्मविश्वासात चांगली वाढ झालेली दिसेल. दान-धर्माची वृत्ती तुमच्यात जागृत होईल. तसेच, सामाजिक कार्यात तुम्ही पुढे असाल.  


मिथुन रास (Gemini Horoscope)


मंगळ ग्रहाच्या संक्रमणाने जुळून आलेला षडाष्टक योग मिथुन राशीच्या लोकांसाठी फार लाभदायक ठरणार आहे. या काळात तुमच्या कामाचं कौतुक केलं जाईल. तुमचा मान-सन्मान वाढेल. तसेच, नवीन नोकरी शोधण्याचा प्रयत्न संपेल. जोडीदाराबरोबर नातं अधिक घट्ट होईल. या राशींच्या विद्यार्थ्यांसाठी देखील हा काळ लाभदायक असणार आहे. विद्यार्थ्यांना परिक्षेत चांगले गुण मिळतील.


तूळ रास (Libra Horoscope)


तूळ राशीच्या लोकांसाठी हा काळ फार अद्भुत असणार आहे. या काळात तुम्हाला चांगली लॉटरी लागू शकते. तुमच्या उत्पन्नात चांगली वाढ होईल. तसेच, करिअरमद्ये तुम्ही उच्च ध्येय गाठाल. तुमचा बॅंक बॅलेन्स वाढेल. तसेच, तुमचे रखडलेले पैसे तुम्हाला परत मिळू शकतात. 


कुंभ रास (Aquarius Horoscope)


मंगळ ग्रहाचं राशी परिवर्तन कुंभ राशीच्या लोकांसाठी फार शुभ ठरणार आहे. या काळात तुमच्या नोकरी-व्यवसायात तुम्हाला चांगला लाभ मिळेल. नवीन कार्य सुरु करण्यासाठी हा काळ चांगला आहे. तुमच्या आयुष्यात सुख नांदेल. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  


हेही वाचा :


Shani Gochar 2024 : शनीच्या शश योगाचा 'या' 3 राशींवर होणार भयंकर परिणाम; ऐन दिवाळीत सावध राहण्याचा इशारा