Malavya Rajyog 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रात, अनेक राजयोग आणि महापुरुष राजयोगाचं (Rajyog) वर्णन करण्यात आलं आहे. आपल्या कुंडलीत हे राजयोग असल्याने व्यक्तीच्या सुख समृद्धीत चांगली भरभराट होते. त्याचबरोबर, ती व्यक्ती धनवान होते. प्रत्येक ग्रह ठराविक काळाच्या अंतराने संक्रमण करुन राजयोग निर्माण करतात. या ठिकाणी आपण मालव्य राजयोगाबद्दल जाणून घेऊयात. ज्याचा थेट संबंध शुक्र ग्रहाशी (Shukra Gochar) जोडण्यात आला आहे. 

Continues below advertisement


ज्योतिष शास्त्रानुसार, नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच शुक्र ग्रह संक्रमण करुन मालव्य राजयोग निर्माण करणार आहे. यामुळे काही राशींचं भाग्य उजळण्याची शक्यता आहे. या लकी राशी कोणत्या ते जाणून घेऊयात. 


धनु रास (Saggitarius Horoscope)


मालव्य राजयोग जुळून आल्याने धनु राशीच्या लोकांना याचा चांगला लाभ मिळणार आहे. तसेच, जर तुम्ही पैशांची गुंतवणूक करणार असाल तर त्यासाठी हा काळ उत्तम असणार आहे. या राशीच्या अकराव्या स्थानी शुक्राचं संक्रमण होणार आहे. त्यामुळे तुम्हाला उत्पन्नातून चांगला लाभ मिळेल. शेअर बाजार किंवा जुन्या योजनेतून तुम्हाला चांगला लाभ मिळेल. तसेच, तुम्हाला तुमच्या मुलांकडून शुभवार्ता ऐकायला मिळेल. 


मकर रास (Capricorn Horoscope)


मकर राशीसाठी मालव्य राजयोग लाभदायी ठरणार आहे. या राशीच्या दहाव्या स्थानी हा योग जुळून येणार आहे. त्यामुळे नोकरी व्यवसायात तुमची चांगली प्रगती दिसून येईल. कामाच्या ठिकाणी तुमच्यावर नवीन जबाबदाऱ्या सोपवण्यात येतील. देवी लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या धनसंपत्तीत चांगली वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच, तुम्ही जे कार्य हाती घ्याल त्यात तुम्हाला चांगलं यश मिळेल. 


तूळ रास (Libra Horoscope)


तूळ राशीसाठी मालव्य राजयोग फार अनुकूल ठरणार आहे. कारण हा राजयोग तुमच्या लग्न स्थानी आहे. त्यामुळे या काळात तुमच्या व्यक्तिमत्त्वात चांगले बदल घडून येतील. तुमचं वैवाहिक जीवन पूर्वीपेक्षा सुरळीत चालेल. पती-पत्नीच्या नात्यात सामंजस्य टिकून राहील. तसेच, या काळात तुम्हाला एखादी शुभवार्ता मिळू शकते. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


हेही वाचा :                                             


Shani Vakri 2025 : दिवाळीला 'या' 3 राशींना लागली लॉटरी; शनिच्या वक्री चालीने लवकरच सुरु होतील सोन्याचे दिवस, एकामागोमाग टळेल संकट