Makar Sankranti 2025 Wishes In Marathi: मकर संक्रांती हा हिंदू दिनदर्शिकेतील एक महत्त्वाचा सण आहे, या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, नवीन हंगामाची आणि आनंदाची सुरुवात करतो. हा दिवशी लोक पतंग उडवण्याचा, तीळ-गूळ आणि पारंपारिक पदार्थ खाण्याचा आनंद घेतात. मकर संक्रांतीचा सण समृद्धी, आनंद आणि सकारात्मकतेचा संदेश घेऊन येतो तसं पाहायला गेलं कर हिंदू धर्मात प्रत्येक सणाचे विशेष असे महत्त्व आहे; पण वर्षाच्या सुरुवातीलाच येणारा मकर संक्रांत सण अधिक खास मानला जातो. या दिवशी सूर्य देव मकर राशीत प्रवेश करतो आणि त्यामुळे या सणाला मकर संक्रांत, असे म्हणतात. या सणाच्या निमित्ताने अनेक ठिकाणी पतंग उडवण्याचा आनंद घेतला जातो, तिळगुळाचे लाडू वाटून एकमेकांना गोड शुभेच्छा दिल्या जातात. यंदा 14 जानेवारी रोजी मंकर संक्रांतीचा सण साजरा केला जात आहे. त्यानिमित्ताने तुम्ही तुमच्या प्रियजनांना गोड शुभेच्छा अन् शुभेच्छापत्र पाठवून या सणाचा गोडवा आणखी वाढवू शकता. मकर संक्रांत सणानिमित्त तुम्ही तुमचे प्रियजन, नातेवाईक यांना प्रत्यक्ष भेटू शकत नसला ऑनलाइन शुभेच्छा नक्की पाठवू शकता. मकर संक्रांतीच्या गोड गोड अन् काही हटके अशा मराठमोळ्या शुभेच्छा…


कणभर तीळ, मणभर प्रेम
गुळाचा गोडवा, ऋणानुबंध वाढवा
तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!


झाले-गेले विसरुनी जाऊ, तिळगूळ खात गोड गोड बोलू..!
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!


तुमच्या यशाचा पतंग उंचच उंच उडत राहो हीच सदिच्छा!
शुभ मकर संक्रांती, तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला!


तीळ आणि गुळासारखी राहावी
आपली मैत्री घट्ट अन् मधुर
नात्यातील कटुता इथेच संपवा
तिळगूळ घ्या नि गोड गोड बोला!


जपू तिळाप्रमाणे स्नेह, वाढवू गुळाप्रमाणे गोडवा, 
निर्माण करू भेद-भावमुक्त समाज प्रेरणा, 
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा! 
तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला!


विसरुनी जा दु:ख तुझे हे,
मनालाही दे तू विसावा,
आयुष्याचा पतंग तुझा हा
प्रत्येक क्षणी गगनी भिडावा
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!


एक तिळ रुसला, फुगला,
रडत रडत गुळाच्या पाकात पडला,
खुदकन हसला, हातावर येताच बोलू लागला,
तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला!


वर्ष सरले, डिसेंबर गेला,
हर्ष घेऊनी जानेवारी आला,
निसर्ग सारा दवाने ओला,
तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला
मकर संक्रांतीच्या संदेशरूपी गोड गोड शुभेच्छा!


तिळाची गोडी, प्रेमाची माडी,
माडीचा जिना, प्रेमाच्या खुणा, मायेचा पान्हा,
साऱ्यांच्या मना, म्हणूनच एक तीळ सात जना,
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!


नात्यातील कटुता इथेच संपवा… 
तिळगूळ घ्या नि गोड गोड बोला
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!


मराठी अस्मिता, मराठी मन,
मराठी परंपरेची मराठी शान,
आज संक्रांतीचा सण,
घेऊन आला नवचैतन्याची खाण!
तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला! 


 


हेही वाचा>>>


Shani Dev: शनिदेव 'या' राशींवर छडी उगारणार! 365 दिवस वाढणार अडचणी? कसं मुक्त व्हाल? ज्योतिषशास्त्रात म्हटलंय..


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )