Astrology 14 January 2024 : ज्योतिषशास्त्रानुसार, मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर, म्हणजेच 14 जानेवारीपासून (Makar Sankranti 2025) अनेक ग्रहांच्या चाली बदलत आहेत, ज्याचा परिणाम सर्व राशींवर होईल. वैदिक पंचांगानुसार, मकर संक्रांतीच्या दिवशी म्हणजेच 14 जानेवारीला पहाटे 5:32 वाजता मंगळ आणि गुरु ग्रह एकमेकांपासून 45 अंशांवर असतील, त्यामुळे अर्धकेंद्र योग तयार होईल. ज्याचा शुभ परिणाम 3 राशींवर होईल. 14 जानेवारीपासून या राशींच्या सुख-संपत्तीत अपार वाढ होईल. या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
कन्या रास (Virgo)
या राशीच्या लोकांसाठी गुरु आणि मंगळ यांच्यामध्ये तयार होणारा अर्धकेंद्र योग फलदायी ठरू शकतो. या राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते. प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेली कामं पूर्ण झाल्यास प्रत्येक क्षेत्रात उत्तुंग यश मिळेल. संवाद कौशल्य चांगले होतील. करिअरबद्दल बोलायचं झालं तर, तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ मिळेल. वरिष्ठ अधिकाऱ्यांचं पूर्ण सहकार्य मिळेल. व्यवसायातही नफा मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. वडिलोपार्जित मालमत्तेतून तुम्हाला भरपूर लाभ मिळू शकतो. तुमचं आरोग्य चांगलं राहील आणि तुम्ही पुरेपूर मज्जा करू शकाल.
तूळ रास (Libra)
तूळ राशीच्या लोकांसाठी अर्धकेंद्र योग देखील भाग्याचा सिद्ध होऊ शकतो. या राशीच्या लोकांना कामानिमित्त प्रवास करावा लागू शकतो. परंतु यासह आपण लक्षणीय यश मिळवू शकता. यासोबतच तुम्ही पैशांची बचत करण्यातही यशस्वी होऊ शकता. नोकरीत तुम्हाला थोडं दडपण जाणवेल. परंतु गुरूच्या कृपेने तुम्हाला नवीन नोकरीच्या संधी मिळू शकतात, त्यामुळे तुम्ही समाधानी असाल. व्यवसायाच्या क्षेत्रातही तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो, तुम्हाला भरपूर नफा मिळू शकतो. याच्या मदतीने तुम्ही चांगली कमाई कराल. लव्ह लाईफ चांगलं जाणार आहे. जोडीदारासोबत तुमचा वेळ चांगला जाईल. तुमच्या भावना त्याच्यासमोर उघडपणे व्यक्त करण्यात तुम्ही यशस्वी होऊ शकता. आरोग्य चांंगलं राहील.
कुंभ रास (Aquarius)
या राशीच्या लोकांसाठी गुरू आणि मंगळ ग्रहाने तयार केलेला अर्धकेंद्र योग अनुकूल ठरू शकतो. या राशीच्या लोकांना त्यांच्या मेहनतीचं फळ मिळेल. करिअरच्या क्षेत्रात तुम्हाला अनेक चांगल्या संधी मिळू शकतात. यासोबतच तुम्ही तुमची नोकरीही बदलू शकता. व्यवसायाच्या क्षेत्राबद्दल सांगायचं तर, तुम्ही काही चांगल्या लोकांसोबत भागीदारी करून व्यवसाय सुरू करू शकता. तुम्हाला चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. या काळात तुमचा आत्मविश्वास झपाट्याने वाढेल. यासोबतच तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. पण तुम्ही तुमच्या आईच्या तब्येतीची काळजी घेतली पाहिजे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: