Makar Sankrant 2025: नववर्षाचं आगमन होताच अनेक ग्रह-ताऱ्यांच्या राशी परिवर्तनामुळे अनेक लोकांच्या जीवनात खास घटना घडणार असल्याचं ज्योतिषशास्त्रानुसार सांगण्यात येतंय. मकर संक्रांतीचा सण हिंदू धर्मात खूप महत्त्वाचा आणि विशेष मानला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार, यंदा मकर संक्रांतीचा दिवस अधिक महत्त्वाचा आहे. या दिवशी होणारे सूर्याचे संक्रमण काही राशींसाठी खूप शुभ आणि लाभदायक असणार आहे. त्यामुळे ही मकर संक्रांत काही राशींसाठी एकदम खास ठरणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार जाणून घेऊया सविस्तर..
मकर संक्रांत अनेक राशींसाठी फायदेशीर ठरणार!
मकर संक्रांतीचा सण हिंदू धर्मात खूप महत्त्वाचा आणि विशेष मानला जातो. या दिवशी भगवान सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. मकर संक्रांतीचा दिवस भगवान सूर्याला समर्पित करण्यात आला आहे. हिंदू मान्यतेनुसार जो कोणी या दिवशी भगवान सूर्याची पूजा करतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. त्याचे नशीब सौभाग्यामध्ये बदलते. ज्योतिषशास्त्रानुसार, मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करेल आणि पुष्य नक्षत्रात प्रवेश करेल. सूर्याचे हे संक्रमण अनेक राशींसाठी फायदेशीर ठरणार आहे, परंतु काही राशी अशा आहेत, ज्यांना या काळात विशेष लाभ मिळणार आहेत. या राशींच्या लोकांचे आर्थिक संकट दूर होईल, नोकरी मिळण्याची शक्यता निर्माण होईल, जाणून घ्या..
मकर संक्रांत कधी आहे?
वैदिक दिनदर्शिकेनुसार, 2025 वर्षी सूर्य 14 जानेवारी रोजी सकाळी 8.44 वाजता मकर राशीत प्रवेश करेल. त्यामुळे मकर संक्रांतीचा सण 14 जानेवारीला आहे. याच्या एक दिवस आधी म्हणजे 13 जानेवारीला लोहरी सण आहे. उत्तर भारतातही हा सण पोंगळ म्हणून साजरा केला जातो.
सूर्य पुष्य नक्षत्रात संक्रमण करेल
मकर संक्रांतीला सूर्याचे संक्रमण पुष्य नक्षत्रात होणार आहे. त्यामुळे मकर संक्रांतीचा दिवस अधिक महत्त्वाचा झाला आहे. या दिवशी भगवान सूर्य मकर राशीत प्रवेश करेल आणि पुष्य नक्षत्रात संक्रमण करेल. भगवान सूर्याचे हे संक्रमण काही राशींसाठी खूप शुभ आणि लाभदायक असणार आहे. चला जाणून घेऊया त्या भाग्यशाली राशी कोणत्या आहेत.
मेष - उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळतील
मेष राशीच्या लोकांसाठी मकर संक्रांतीचा दिवस खूप फायदेशीर ठरू शकतो. मेष राशीच्या लोकांसाठी हा काळ खूप चांगला आहे जे सरकारी नोकरीची तयारी करत आहेत. तुम्हाला नवीन नोकरी देखील मिळू शकते. तुम्हाला उत्पन्नाचे नवीन स्रोतही मिळतील.
मकर - जीवनात अनेक बदल घडू शकतात
मकर संक्रांतीचा दिवस मकर राशीच्या लोकांसाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. या दिवशी मकर राशीच्या लोकांच्या जीवनात अनेक बदल घडू शकतात. कोर्टाशी संबंधित कामात यश मिळू शकते. आर्थिक समस्या संपतील. या काळात कोणावरही जास्त विश्वास ठेवू नका. असे करणे हानिकारक ठरू शकते.
सिंह - अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो
सिंह राशीच्या लोकांसाठी मकर संक्रांतीचा दिवस खूप खास असणार आहे. या दिवशी तुम्ही तुमच्या शत्रूंवर विजय मिळवू शकता. अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात.
हेही वाचा>>>
Surya Shani Yuti: 14 जानेवारीनंतर 'या' राशींची चांदीच चांदी! महायोगांमुळे नशीब फळफळणार? नोकरी, पैसा, विवाह, घर, चांगले दिवस येणार
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )