Makar Sankrant 2023 : सूर्य (Sun) मकर संक्रांतीला (Makar Sankrant 2023) मकर राशीत (Capricorn) प्रवेश करेल, म्हणून याला मकर संक्रांत म्हणतात. 14 जानेवारी 2023 च्या रात्री सूर्य मकर राशीत प्रवेश करणार असला तरी पुण्यकाळ 15 जानेवारीला असल्यामुळे या वर्षी मकर संक्रांती 15 जानेवारीला साजरी होणार आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान आणि दान करण्याचे खूप महत्त्व आहे. तिळगूळ खाणे आणि तिळाचे दान करणे या दिवशी सर्वात महत्त्वाचे मानले जाते. असे मानले जाते की, मकर संक्रांतीच्या दिवशी केलेले दान केवळ या जीवनात सुख-समृद्धीच देत नाही, तर अनेक जन्मांचे पुण्यही देते.



तिळाचे दान
मकर संक्रांतीला तीळ संक्रांत असेही म्हणतात. या दिवशी तीळ दान केल्याने खूप फायदा होतो. यामुळे शनिदोष दूर होतो. याशिवाय भगवान विष्णू, सूर्य आणि शनिदेव यांचीही पूजा या दिवशी करावी.



ब्लँकेट दान
मकर संक्रांतीच्या दिवशी गरीब व्यक्तीला ब्लँकेट दान करा. याने राहू दोष दूर होतो. गरीब, असहाय्य, गरजू लोकांना काळ्या रंगाचे ब्लँकेट दान करा.



गुळाचे दान
गुळाचा संबंध गुरू ग्रहाशी आहे. मकर संक्रांत गुरुवारी येत आहे, म्हणून या दिवशी गुळाचे दान केल्याने कुंडलीतील गुरु ग्रह बलवान होईल आणि जीवनात सौभाग्य, सुख आणि समृद्धी येईल.



खिचडीचे दान
मकर संक्रांतीच्या दिवशी खिचडी बनवणे खूप महत्त्वाचे आहे. देशाच्या काही भागात खिचडी बनवण्याची प्रथा आहे. मकर संक्रांतीच्या खिचडीमध्ये तांदूळ, उडीद डाळ आणि हिरव्या भाज्यांचा वापर केला जातो, या गोष्टी शनि, बुध, सूर्य आणि चंद्राशी संबंधित आहेत. या दिवशी खिचडी खाणे आणि दान केल्याने या सर्व ग्रहांची कृपा होते.



तुपाचे दान
मकर संक्रांतीच्या दिवशी तुपाचे दान करणे देखील खूप शुभ मानले जाते, कारण तुपाचा संबंध सूर्य आणि गुरूशी आहे. मकर संक्रांती हा सण सूर्याच्या उपासनेचा सण असून या वर्षी तो गुरुवारी येत आहे. अशा परिस्थितीत तूप दान केल्याने कुंडलीत सूर्य आणि गुरु बलवान होईल. हे दोन्ही ग्रह जीवनात यश, सुख, समृद्धी आणि सन्मान घेऊन येतात.


 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.) 


इतर बातम्या


Makar Sankrant 2023: यंदाची मकर संक्रांत विशेष! जाणून घ्या वेळेचे महत्त्व, स्नान-दान मुहूर्त