Mahashivratri 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज महाशिवरात्रीचा (Mahashivratri 2025) दिवस आहे. आजच्या दिवशी भगवान शंकराची पूजा करतात. असं म्हणतात, आजच्या दिवशी शंकराची मनोभावे पूजा केल्यास बाबा भोलेनाथ त्यांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करतात. तसेच, सर्व दु:खांपासून त्यांची सुटका करतात. 


वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज ज्या राशींवर भगवान शंकराची कृपा असले त्या राशींच्यां लोकांना कोणत्याही संकटांचा सामना करावा लागणरा नाही. तसेच, तुमच्या आयुष्यातील सर्व दु:ख दूर होतील. खरंतर, भगवान शंकराची सर्वच राशींवर कृपा असते. मात्र, पाच अशा राशी आहेत ज्यांच्यावर नेहमीच शंकराचा आशीर्वाद असतो. या 5 लकी राशी कोणत्या ते जाणून घेऊयात. 


वृषभ रास (Taurus Horoscope)


भगवान शंकराला वृषभ रास प्रिय आहे. या राशींच्या लोकांवर आज शंकराची कृपादृष्टी असणार आहे. तसेच, आजच्या दिवशी तुम्हाला अचानक धनलाभ देखील होण्याची शक्यता आहे. महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. तसेच, व्यवसायाचा विस्तार अधिक वाढलेला दिसेल. 


मिथुन रास (Gemini Horoscope)


मिथनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खास असणार आहे. मिथुन राशीला अर्धनारीश्वर रुपाशी जोडण्यात येते. भगवान शंकराच्या या रुपात शंकर आणि शक्ती दोघांचा वास असतो. या राशीच्या लोकांना करिअरमध्ये चांगलं यश मिळेल. तसेच, तुमच्या मनातील सर्व इच्छा लवकरच पूर्ण होतील.


कर्क रास (Cancer Horoscope)


कर्क राससुद्धा भगवान शंकराची प्रिय रास आहे. या राशीच्या लोकांना आजच्या दिवशी चांगला लाभ मिळेल. तुमच्या व्यवासायत तुम्हाला दुप्पट लाभ मिळेल. तसेच, तुमच्या मनातील सर्व इच्छा लवकरच पूर्ण होतील. त्यामुळे तुम्हाला आजच्या दिवशी कोणतीच चिंता करण्याची गरज नाही.  तसेच, तुमची आर्थिक स्थितीदेखील मजबूत असेल. 


धनु रास (Sagittarius Horoscope)


धनु राशीच्या लोकांसाठी देखील आजचा दिवस भाग्याचा असणार आहे. आज तुमचे अनेक दिवसांपासून रखडलेले पैसे तुम्हाला परत मिळतील. तसे, आज तुम्ही एखाद्या नवीन कार्याची सुरुवात करु शकतात. यामध्या तुम्हाला चांगलाच लाभ मिळेल. मित्र-मैत्रीणींचा चांगला सहवास लाभेल. 


कुंभ रास (Aquarius Horoscope)


भगवान शंकराची कुंभ रास प्रिय आहे. या राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती चांगली असेल. तसेच. मुलांना विशेष करुन आज चांगला लाभ मिळेल. तुमच्या पगारात चांगली वाढ झालेली दिसेल. तसेच, नोकरदाद वर्गातील लोकांना कामाच्या ठिकाणी तणावाचा सामना करावा लागणार नाही. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा:


Shani Dev Sade Sati 2025 : 29 मार्चपासून 'या' राशीवर सुरु होणार शनीची साडेसाती; पदोपदी करावा लागणार संकटांचा सामना